Best Marathi Ukhane for Female | Marathi Ukhane for Male (150+)
Marathi Ukhane for Female | Marathi Ukhane for Male : मराठी लग्न सोहळ्यांमध्ये मराठी उखाणे घेण्याची परंपरा खूप पूर्वी पासून आहे. लग्नातील मराठी उखाणे ऐकल्याशिवाय लग्न पार पडल्यासारखे वाटतच नाही. मित्र मैत्रिणी देखील नवरीला उखाणे घेण्यास आग्रह करीत असतात, त्याचबरोबर नवरदेवाकडून देखील चांगल्या उखानांची अपेक्षा असतेच. याचसाठी आपल्या समोर प्रस्तुत करीत आहोत दर्जेदार मराठी उखानांची यादी List of Marathi Ukhane. उखाणे आवडल्यास हि पोस्ट मित्र मैत्रिणीनं मध्ये शेअर करायला विसरू नका.
- List of Marathi Ukhane for Female and Male
- Marathi Ukhane for Female । Marathi Ukhane for Bride (मुलींसाठी / नवरीसाठी मराठी उखाणे)
- Traditional Marathi Ukhane for Female (नवरीसाठी पारंपरिक मराठी उखाणे)
- Marathi Ukhane Funny । Marathi Ukhane Comedy (मुलींसाठी गमतीशीर मराठी उखाणे)
- Marathi Ukhane Chavat । Ukhane in Marathi Comedy (चावट – गमतीशीर मराठी उखाणे)
- Marathi Ukhane for Male । Marathi Ukhane for Groom (मुलांसाठी / नवरदेवासाठी मराठी उखाणे)
List of Marathi Ukhane for Female and Male
ह्या पोस्ट मध्ये तुम्हाला विविध प्रकारचे मराठी उखाणे मिळतील. खालील यादी मध्ये नवरीसाठी मराठी उखाणे Marathi Ukhane for Female, नवरदेवासाठी मराठी उखाणे Marathi Ukhane for Male तसेच गमतीशीर मराठी उखाणांचा समावेश असेल.
Marathi Ukhane for Female । Marathi Ukhane for Bride
(मुलींसाठी / नवरीसाठी मराठी उखाणे)
नवरीला उखाणे घेण्याची विनंती हमखास होतच असते. नवरदेवाकडील मंडळींकडून तर हमखास उखाणे घेण्याची विनंती नक्कीच केली जाते. उखाणे सुचविण्यासाठी लग्न झालेल्या स्त्रिया नेहमी तयार असतात पण Marathi Ukhane for Female चा संग्रह तुम्हाला क्वचितच सापडेल.
श्री गणेश आहे शिव पार्वती चा पुत्र,
….रावांच्या नावाचे घालते मंगळसुत्र.
सोन्याच्या दागिन्यांनी सजली नवरी
नवरीच्या गळ्यात नाजुकशी सरी
मोठ्यांदा बोलते नका टवकारु कान
….. रावांचे नाव घेते राखून तुमचा मान
फुलात फुल मदनबाण …….. राव माझे जीव कि प्राण.
दिवसापाठी रात्र येते हा पाठशिवणीचा खेळ……… रावांचा वृक्ष तेथे माझे जीवन वेल
वसंतातली डाळपन्हे देती थंडावा …….. रावांच्या सहवासात मला आपला आशीर्वाद हवा.
सोन्याचे ताट,चंदनाचा पाट, पंचपंक्वानांचा थाटमाट……… रावांचा नाव घेते सोडा माझी वाट
विद्यादायिनी, विद्यावर्धिनी, शुभ्रवस्त्राधारिणी, वीणावादीनी, शुभ्राहंसवासिनी सरस्वतीच्या वीणावादनावर थुई थुई नाचतो मोर ….. रावांचे नाव घेते वडिलधाऱ्यांसमोर.
गणपतीच्या सोंडेला शेंदुराचा रंग….. राव असतात नेहमी कामात दंग
सोन्याच्या ताटात चांदीचा घास, माहेरच्या तांदळाला बासमतीचा वास …. रावांच नाव घेते तुमच्यासाठी खास
मनाच्या वृंदावनात डोलते भावनेची तुळस
….. रावांच नाव घ्यायला मला नाही
आळस
कपाटाच्या खणात ठेवला पैका ……. रावांच नाव घेते सर्वजण ऐका.
नूतन वर्षाचा शुभारंभ करिन येतो पाडवा ……. रावांच्या सान्निध्यात राहो सदैव गोडवा.
मातापित्यांचे कर्तव्य संपले कर्तव्याला झाली माझ्या सुरुवात …… रावांचे सहकार्य लाभो माझ्या जीवनात.
शिक्षणाने विकसित होते संस्कारिक जीवन ……. च्या संसारात राखीन सर्वांचे मन.
लावीत होते कुंकू, त्यात सापडला मोती ……. पती मिळाले म्हणून भाग्य मानू किती.
जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने …. रावांचे नाव घेते बायको या नात्याने.
सौभाग्याचं लेणं, काळ्या मण्याची पोट ……. च्या जीवनात उजाळीन जीवनज्योत
अलंकारात अलंकार मंगळसूत्र मुख्य ……..रावांचा आनंद हेच माझे सौख्य.
(मुलींसाठी / नवरीसाठी मराठी उखाणे)
देवापुढे लावला ऊद, वास सुटला छान…… रावांचे नाव घेते ऐका देऊन कान
सायंकाळच्या वेळी मनस्कार करते देवाला…… चे नाव घेताना आनंद होतो मनाला
सावित्रीच्या पातिव्रत्याने सत्यवानाला लाभे जन्म…… रावांचे सौभाग्य लाभो जन्मोजन्म
रूप्याच्या वाटीत सोन्याचा चमचा……. चे नाव घेऊन आशिर्वाद मागते सर्वांचा
प्रेमळ शब्दांमागे पण भावना असते कौतुकाची ….रावांच्या साथीने सुरुवात करते सहजीवनाची
शब्द तिथे नाद, कवि तिथे कविता……माझे सागर मी त्यांची सरिता.
चंदनाच्या देव्हाऱ्यात सोन्याचे देव, देवाने दिली मला हिऱ्यांची ठेव, हिऱ्यांच्या ठेवीहून थोर पतीदेव,……. रावांचं नाव घेते करताना हळदीकुंकवाची देवघेव.
संध्यासमयास आतुरलेले जीव घरी घेतात धाव सर्वांच्या आग्रहास्तव घेते ….. . रावांचे नाव
संसाराचे टिपण हृदयाच्या वहीत…… ना आयुष्य मागते सुदृढ आरोग्यासहित
आकाशात दिसते इंद्रधनुची रंगत न्यारी…… च्या साथीने चढते संसाराची पायरी
आरशाची खोली तिथे सोन्याची दिवली…….ना पहाताच तहान भूक निवली
सुख समाधान, शांती तेथे देवाची वस्ती ……….ना आयुष्य मागते माझ्यापेक्षा जास्ती
निळ्या-निळ्या आकाशात शोभून दिसतात चंद्र-तारे………रावांच्या संगतीने उजळले जीवन सारे.
मनाला समाधान देते देवापुढची सांजवात संसाराच्या सुखी वाटचालीकरिता. .रावांच्या हाती दिला हात
संगमरवरी देवळात बसवली रामाची मूर्ती…… रावाशी लग्न झाले, झाली इच्छापूर्ती
गरिबीची करू नये निंदा, श्रीमंतीचा करू नये गर्व………च्या नावावर अर्पिले जीवन सर्व
चांदीच्या तबकात ठेवले नवसाचे पेढे . …..रावांच्या दर्शनाने मन झाले वेडे
हृदयात असावे प्रेम, प्रेमात असावी निष्ठा निष्ठेत असावी कृती, कृतीत असावी कला……… च्या संसारात काय कमी मला.
पायातल्या जोडव्यात माहेरची स्मृती, मिळाले……. पती म्हणून आभार मानू किती
जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने …….रावांचे नाव घेते खऱ्याखुऱ्या प्रेमाने
संसाररूपी सागरात प्रीतीच्या लाटा…… च्या सुखदुःखात उचलीन अर्धा वाटा.
संसार करावा नेटका आणि युक्तीने …….रावांचे नाव घेते अपार भक्तीने
संसाररूपी सागरात प्रेमरूपी सरोवर आयुष्याचा प्रवास करते….. रावांच्या सोबत
वसंत चाहुली हळदीकुंकू करतात सुवासिनी……. रावांनी भरला आनंद जीवनी
चंद्राचा उदय, समुद्राला भरती, …….च्या शब्दाने सारे श्रम हरती
गुलाबाचे फुल देवीला वाहिले ……रावांच्या साथीने मी संसारात रमले
सावित्रीच्या पातिव्रत्याने सत्यवानाला मिळाला पुनर्जन्म …. रावांचे सौभाग्यछत्र लाभो जन्मोजन्म
माहेर सोडताना पावलं होतात कष्टी …….च्या संसारात करीन सुखाची वृष्टी
महादेवाला वाहतात बेल, कृष्णाला तुळशी ………. रावांचे नाव घेते च्या दिवशी
किनखापांची गादी त्याला भरगच्च रेशमी लोड …….रावांचे बोलणे अमृतासारखे गोड
हेमंताचं सरलं राज्य, वसंताचे झाले आगम
स्त्रीला भूषविते तिची शालिनता………..रावांच्या जीवनात करीन कर्तव्याची पूर्तता
नव्या दिशा नव्या आशा, नव्या घरी पदार्पण, …….च्या जीवनी माझे सर्वस्व अर्पण
आला आला रुखवत त्यात होते लाडू, लाडवात होते मोतीचूर, मोतीचूर झाले खुसखुशीत,……. रावांचं नाव घेते येऊन भलत्या खुशीत
अत्तरदाणी गुलाबदाणी माळ घातली विडे ठेवले करून,…….. रावांना माळ घातली कुलस्वामिनीला स्मरून.
स्वाती नक्षत्रातील थेंबाचे शिंपल्यात होती मोती ……… राव मिळाले पती म्हणून ईश्वराचे आभार मानू किती
सुखदुःखाच्या धाग्यांनी जीवन वस्त्र विणले……… च्या संसारात भाग्य माझे हसले
रूप्याच्या वाटीत सोन्याचा चमचा …..चे नाव घेऊन आशिर्वाद मागते सर्वांचा
यज्ञ, धर्म, कीर्ती, ऐश्वर्य आणि संपत्ती …….चे यश हीच माझी स्वप्नपूर्ती
उगवला सूर्य मावळली रजनी, ………चे नाव सदैव माझ्या मनी
नूतन वर्षाचा शुभारंभ करीत येतो पाडवा …… रावांच्या सान्निध्यात राहो सदैव गोडवा
वाकून नमस्कार करताना दिसते स्त्रीची शालीनता……. रावांच्या हास्यात दिसते जीवनाची सफलता
श्यामल वर्ण मेघातून कोसळतात मोत्यांच्या सरी …..रावांचं नाव घेते आले मी सासरी
लहानशा भिंती चित्र काढू किती
सासूबाईंच्या पोटी…. राव आहेत मोठी
बारा वर्षे तुळशीला नेमाने घातले पाणी
…….. रावांची झाले मी राणी
सगवणी पेटीला सोन्याची चुक
…. रावांच्या हातात कायद्याचे बुक
Traditional Marathi Ukhane for Female
(नवरीसाठी पारंपरिक मराठी उखाणे)
गोठ केल्या पाटल्या केल्या आरसापेठी करायची ………च्या नावाला मागे नाही सरायची
रामाने राज्य जिंकले शक्तीपेक्षा युक्ती ने…… रावांच नाव घेते प्रेमापेक्षा भक्तीने
पंढरपुरात आहे रुक्मिणी अन् विठोबा,…….
रावांचे नाव घेते कार्यक्रमाला आली शोभा.
प्रेम आणि विश्वासाचे प्रतिक आहे मंगळसूत्र, ……रावांचे नाव घेते कृष्ण आहे देवकी चा पुत्र.
श्रेष्ठ होते कुंतीचे पुत्र पांडव, घालते मांडव.
……रावांचे नाव घेते. लग्नाचा घालते मांडव
देवापाशी ठेवते भरली घागर, …..रावांचे नाव घेते वाण करण्यासाठी जावे गंगा सागर.
काळा चंद्रकळा त्याला नेसण्याची खुबी …….रावांची मूर्ती माझ्या हृदयात उभी
काळा चंद्रकला त्याला खसखशीची चांदण्या……… रावांचं नाव घेते…….. ची कन्या
राम राज्यात मारले रावण कृष्ण राज्यात खाल्ले दही…….. रावांच्या अंगठी वर माझी सही
गोट केल्या पाटल्या केल्या मध्ये भरते दालच्या…….. रावांच्या नावा लागतात तेलच्या
रुसव्या राधिकेला कृष्ण म्हणतो हास…… रावांच नाव घेते तुमच्या करता खास
राम गेले वनवासात सीता जाते पाठी……… नाव घेते खास विड्यासाठी
आशीर्वादाची फुले वेचते वाकून……. नाव घेते तुमचा मान राखून
रातराणीच्या सुगंधाने नीशिगंध होतो मोहित…….. नाव घेते दोन्ही मुलासहित
चारशे दिले गाईला 200 दिले दाव्याला…… ने बहीण दिली …… च्या सेवेला
संक्रांतीच्या दिवशी तिळला येते गोडी …….रावांच्या जीवावर वापरले वापरते म्हणी मंगळसूत्राची जोडी
सातारा गाव त्यांगले त्यांगल्यात बंगले बंगल्याला घर, दाराला कड्या कड्याला कुलपे, कुलपाला याच्या नाव घे मुली, माशा समया लावल्या 360. एक समई मोराची…….. रावांच नाव घेते कन्या आहे…….. ची.
तीळ तांदूळ पिकतात मावळात…….. नाव घेते गणपतीच्या देवळात
जाई जुई च्या झाडाखाली नाग नागिन घेते विसावा ……रावांच्या नावाला आशीर्वाद असावा
नेहरू मेले स्वर्गी गेले दुःखी झाली इंदिरा……. नाव घेते मांडवाच्या मंदिरा
नेहरू मेले स्वर्गी गेले दुःखी झाली इंदिरा……. नाव घेते मांडवाच्या मंदिरा
जाईजुईच्या झाडाखाली नाग नागिन ची वस्ती…… रावांच्या औक्ष मागते माझ्यापेक्षा जास्ती
Marathi Ukhane Funny । Marathi Ukhane Comedy
(मुलींसाठी गमतीशीर मराठी उखाणे)
एसटी स्टँडवर मॅडम पेरू खाती…….. रावांना पाहून एसटी उभी राहती
इंग्रजी भाषेत बटाटा याला म्हणतात पोटॅटो …….रावांच्या हाती रामकृष्ण चा फोटो
सूर्य गेला मावळायला चंद्र आहे ढगात …….रावांचे नाव घेते धन्य झाले जगात
कानातल्या कुडीला मोती लावले सवाई……..ना वडिलांनी केले जावई
पेरूच्या बागेत राघू आले गमतीला……… नाव घेते सवासणी च्या पंक्तीला
आत्तर आत्तर झाड त्याला कत्तर कत्तर पान वडील हिंडले हिंदुस्तान पण……. राव मिळाले रत्नाचे खाण
जरीच्या ब्लाऊज वर चप्पल हाराची लहिण ….रावांच नाव घेते…… ची बहीण
गांधी मेले स्वर्गी गेले टिळकांनी केली कमाल …. रावांच्या हाती जरीकाठी रुमाल
गोट केल्या पाटल्या केल्या केली सोन्याची सरी …….. रावांच्या जीवावर काळी पोतच बरी
हजाराची साडी तिला पाचशेचा पदर …….रावांच्या जीवावर करते हळदीकुंकू चा गजर
गोठ केल्या पाटल्या केल्या , मध्ये भरते बिलवर…… राव बसले पत्याला हुकुम
बोलते किलवर
मणी मंगळसूत्राच्या दोन वाटया सासर माहेरच्या होतो भास……. नाव घेते तुमच्या करता खास
उंच उंच घार तिचे गारुळे डोळे…….रावांची मूर्त माझ्या हृदयात खिळे
Marathi Ukhane Chavat । Ukhane in Marathi Comedy
(चावट – गमतीशीर मराठी उखाणे)
अत्रावळ पत्रावळ होती वांग्याची फोड, ….. हसतात गोड, पण डोळे वटरायची भारीच खोड.
….. मुळे झाली माझी सेकण्ड इनिंग सुरु, हसत खेळत आम्ही आता …. टूर करू.
बदामाचा केला हलवा त्यात टाकले काजू किसुन, …. राव बिड्या पितात संडासात बसून
एका हातात पर्स दुसऱ्या हातात रुमाल, जेव्हा आहेत ….. राव, मग कशाला हवा हमाल
रेशमाचा सदरा त्याला प्लास्टिकचे बक्कल, …. राव एवढे हँडसम पण डोक्यावर टक्कल.
MSEB च्या तारेवर टाकला होता आकडा, लग्नच माझे ठरले नाही तर नाव कोणाचे घेऊ रे माकडा.
वड्यात वडा बटाटेवडा, …. नी मारला खडा म्हणून जमला आमचा जोडा.
चांदीच्या ताटात मुठभर गहू, लग्नच नाही झालं तर नाव कसं घेऊ
चांदीच्या ताटाला चंदनाचा वेढा, मी आहे म्हैस तर तो आहे रेडा
सुंदर सुंदर हरिणाचे इवले इवले पाय, आमचे …. अजून कसे नाही आले, गटारात पडले की काय
Marathi Ukhane for Male । Marathi Ukhane for Groom
(मुलांसाठी / नवरदेवासाठी मराठी उखाणे)
उखाणे घेणे मुळातच मुलींमध्ये जास्त दिसून येत असले तरी मुलांना, नवरदेवाला देखील परंपरे नुसार उखाणे घ्यावे लागतात. Marathi Ukhane for Groom ची कमतरता जरी असली तरी आपल्यासाठी खालील मराठी उखाणे (Marathi Ukhane) जरूर उपयोगी पडतील.
कपाटाच्या खणांत ठेवला पैका……… चे नांव घेतो सर्वजणी ऐका.
गंगेची वाळू चाळणीने चाळू, चल चल……. आपण सारीपाट खेळूं.
नावामध्ये आहे काय ? नका हट्ट करू, माझा उखाणा जुळत नाही……काय ग करू ?
मातीच्या चुली घालतात घरोघर………. झालीस माझी आतां चल बरोबर.
आरशाची खोली तिथे सोन्याची दिवली …… ला पाहतांच तहान भूक निवली.
चंद्राला पाहून भरती येते सागराला……. .ची जोड मिळाली संसाराला.
जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने,…….. च्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो प्रेमाने.
हिऱ्याचा कंठा मोत्याचा घाट ।…….. च्या हौशीसाठी केला सगळा थाट
कपाळाचे कुंकू जशी चंद्राची कोर … …. च्या मदतीवर माझा सगळा जोर
गणपतीच्या सोंडेला शेंदूराचा रंग । माझी ……….नेहमी घरकामांत दंग
पुढें जाते वासरू मागून चालली गाय । माझ्या …….. ला आवडते दुधावरची साय
सोन्यांत सोने बावनकशी । माझी……. मस्तानीच जशी
वसंत ऋतु येतांच कोकिळा गातात गोड । माझी…….. माझ्या तळहातावरची फोड
जाईजुईचा वेल पसरला दाट ……. च्या नोकरीमुळे पडत नाही गांठ.
चंदनाच्या झाडाला नागिणीचा वेढा …… चं नाव घेतो माझी वाट सोडा
पान, सुपारी, कात आणि चुना याचा बनविला विडा ……. चे नाव घेतो वाट माझी सोडा.
क्रिकेट फुटबॉल पुरुषांचा खेळ ……. ला मंडळांतून यायला झाला वेळ.
नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री …….. आजपासून माझी गृहमंत्री.
श्रावण महिन्यात दिसते इंद्रधनुची रंगत न्यारी, …… च्या साथीसाठी केली लग्नाची तयारी.
बुद्धीबळाच्या पटावर हस्तीदंती प्यादी, ……माझी जीवनसाथी.
सीतेसारखे चारित्र्य रंभेसारखे रुप ……. ला मिळाली आहे अनुरुप.
आई वडील भाऊ बहिणी, गोकुळासारखे घर या सुखामध्ये….. ची पडली भर.
श्यामल वर्ण मेघांतून कोसळतात मोत्यांच्या सरी, ……..च नाव घेतो….. च्या घरी.
घरोघरी त्याच परी. कोणाला सांगायचे काय? ……..चे नांव घेतो, पण माझ्याकडे बघत नाय.
घटका गेली, पळे गेली, राम का म्हणना ……..चे नाव घेतो, पण थांबवा ठणाणा.
खडी साखरेचा खडा खावा तेव्हां गोड ………. च्या रुपात नाहीं कुठेंच खोड
हत्तीच्या अंबारीवर मखमालीची झूल माझी……..नाजुक जैसे गुलाबाचे फूल
कोरा कागद काळी शाई ……. ला रोज देवळांत जाण्याची घाई
जाईच्या वेणीला चांदीची तार ।
माझी ……..म्हणजे लाखांत सुंदर नार
उगवला सूर्य मावळली रजनी, ……. चे नाव सदैव माझ्या मनी.
देशाचा कारभार करावा युक्तीनें
…….चं नांव घेतो मनापासून भक्तीनें.
दारी होते कोनाडे त्यांत होती पळी ।
माझी ……. व्यवहाराच्या बाबतींत अगदी खुळी
तासगांवच्या गणपतीचा गोपूर बांधणारे होते कुशल । ……. चं नांव घेतो तुमच्याकरितां स्पेशल
नांव नांव नांवाची काय बिशाद मी आहे …… गेली ऑफिसात.
फुलांत फूल मदनबाण माझी……… जीव की प्राण.
भाजीत भाजी मेथीची…….. माझ्या प्रितीची
कोवळी काकडी कुरकुर वाजे, काळी चंद्रकळा……. ला साजे
पाण्याच्या हंड्यावर रुप्याचें झांकण ।
……….च्या हातांत हिन्याचें कंकण
रुप्याची लोटी सोन्याची झारी । असली काळीसावळी तरी…… माझी प्यारी
काळी गळसरी गळाभर ।
……………ला पाहीन डोळाभर
सायंकाळच्या आकाशाचा निळासर रंग ……….नेहमी घरकामांत दंग
चौकोनी आरशाला वाटोळी फ्रेम ।
माझ्या लाडक्या ……. वर माझे खरे प्रेम.
आशा आहे कि तुम्हाला वरील Marathi Ukhane for Female / Marathi Ukhane for Bride, Marathi Ukhane for Male/ Marathi Ukhane for Groom तसेच Marathi Ukhane Chavat । Ukhane in Marathi Comedy ह्या प्रकारातील उखाणे आवडली असतीलच. तुम्हाला वरील उखाणे कसे वाटले हे कमेंट मध्ये नक्की कळवा.
-
150+ Best Marathi Ukhane for Female/ Marathi Ukhane for Bride
1) सोन्याचे ताट,चंदनाचा पाट, पंचपंक्वानांचा थाटमाट……… रावांचा नाव घेते सोडा माझी वाट
2) सोन्याच्या ताटात चांदीचा घास, माहेरच्या तांदळाला बासमतीचा वास …. रावांच नाव घेते तुमच्यासाठी खास
3) नूतन वर्षाचा शुभारंभ करिन येतो पाडवा ……. रावांच्या सान्निध्यात राहो सदैव गोडवा.
4)
मातापित्यांचे कर्तव्य संपले कर्तव्याला झाली माझ्या सुरुवात …… रावांचे सहकार्य लाभो माझ्या जीवनात. -
150+ Best Marathi Ukhane for Male/ Marathi Ukhane for Groom
1) जाईच्या वेणीला चांदीची तार ।माझी ……..म्हणजे लाखांत सुंदर नार
2) रुप्याची लोटी सोन्याची झारी । असली काळीसावळी तरी…… माझी प्यारी
3) देशाचा कारभार करावा युक्तीनें…….चं नांव घेतो मनापासून भक्तीनें.
4) कोरा कागद काळी शाई ……. ला रोज देवळांत जाण्याची घाई
इतर विषयांवरील निबंध आणि भाषणे :
१. शिक्षक दिन भाषण (Teachers Day Speech in Marathi)
२. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मराठी निबंध (Best: Independence Day Essay in Marathi)
३. निबंध: कोरोना महामारी (Corona Essay in Marathi)
४. छत्रपती शिवाजी महाराज माहिती मराठी मध्ये
५. पावसाळा निबंध मराठीमध्ये (Essay on Rainy Season in Marathi)
६. निबंध: रंगपंचमी (रंगपंचमी Essay in मराठी)
७. माझा आवडता प्राणी मराठी निबंध Best Essay on my favourite animal in Marathi
८. माझी आई निबंध मराठी (Top 3 Essay on my mother in Marathi)
९. माझी शाळा निबंध मराठी (Best My School Essay in Marathi for Class 6 to 9)
१०. दिवाळी निबंध मराठी मध्ये Best Essay on Diwali in Marathi
इतर
मराठी भाषण कसे करावे? मराठी भाषणासाठी लागणाऱ्या 11 महत्वाच्या टिप्स!..
मी एक पूर्ण-वेळ डिजिटल मार्केटर आणि अर्धवेळ ब्लॉगर आहे ज्याला लिहायची, प्रवासाची तसेच या टेकनॉलॉजीच्या युगात अपडेटेड राहायची आवड आहे.