छत्रपती शिवाजी महाराज माहिती मराठी मध्ये

छत्रपती शिवाजी महाराज माहिती मराठी मध्ये

मराठा साम्राज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या भारत देशाच्या इतिहासातील एक उत्तम शासक म्हणून ओळखले जाणारे राजे आहेत. त्यांची यशोगाथा आदर्श राज्य करण्यासाठी नेहमीच प्रेरणादायी राहील. शिवाजी महाराजांची ख्याती ही जगभर पसरली आहे, विदेशातील लोकही ज्यांचा आदर करून प्रशासनाच्या कार्यात त्यांचा वसा जपतात असे आपले सर्वांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज माहिती मराठी मध्ये

छत्रपती शिवाजी महाराज हे उत्तम शासका सोबत जनतेचे कैवारी होते म्हणून त्यांना जाणता राजा असे संबोधले जाते. धिप्पाड अश्या अफझलखानाचा कोथळा काढणे, आग्र्यातून सुटका, पन्हाळगडावरून चकवा देऊन सुटका तसेच पुण्याच्या शाहिस्तेखानाच्या तुकडीत घुसून केलेली सर्जिकल स्ट्राईक.. अशा अनेक धाडसी पराक्रम महाराजांच्या इतिहासात गणल्या जातात व आजही तब्बल ३०० पेक्षा जास्त वर्षांनंतरही लोकांच्या मनात एक श्रद्धेचे स्थान पक्के केलेले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज माहिती मराठीमध्ये (क्रमानुसार)

Table Of Contents
  1. छत्रपती शिवाजी महाराज माहिती मराठीमध्ये (क्रमानुसार)
  2. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म, पूर्ण नांव, जन्म ठिकाण
  3. छत्रपती शिवाजी महाराज यांचे कुटुंब
  4. मराठा साम्राज्यात योगदान दिलेल्या महापुरुषांची, प्रमुख सरदारांची नांवे
  5. महाराजांनी जिंकलेले/ निर्माण केलेले किल्ले (जिल्ह्यानुसार)
  6. छत्रपती शिवाजी महाराज माहिती मराठीमध्ये (कविता रूपात)
  7. शिवाजी महाराजांच्या आदर्शवात जीवनातील काही ठळक बाबी

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म, पूर्ण नांव, जन्म ठिकाण

छत्रपती शिवाजी महाराज माहिती मराठी
छत्रपती शिवाजी महाराजांचे ओरिजनल चित्र (कलर मध्ये रूपांतरित केलेले)

छत्रपती शिवाजीराजे भोसले.


कालखंड:- 1642–1680.


पूर्ण नाव :- शिवाजी शहाजी भोसले.


कुळ :- क्षत्रियकुलावंत, कुल्वादी भूषण


जन्म:- १९ फेब्रुवारी 1630


जन्म ठिकाण :- शिवनेरी गड, पुणे, महाराष्ट्र, भारत.

भाषा: – राजेंना मराठी सोबत पोर्तुगीज, उर्दू, संस्कृत, फारसी, कन्नड सोबत इतरही भाषा येत होत्या.


आईचे नांव :- जिजाबाई शहाजी भोसले

वडिलांचे पूर्ण नांव :- शहाजी मालोजी भोसले

शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मावेळी आई जिजाबाई आणि वडील शहाजी महाराज अहमदनगर सल्तनत मध्ये लष्करी विभागात काम करत होतो. त्यांनतर वेगवेगळ्या काळात त्यांनी विजापूर आणि मुघल सल्तनत मध्ये काम केले होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे कुटुंब

महाराजांच्या धर्मपत्नी-
१. सई बाई (निंबाळकर)
२. सोयराबाई (मोहिते)
३. पुतळाबाई (पालकर)
४. लक्ष्मीबाई (विचारे)
५. काशीबाई (जाधव)
६. सगुणाबाई (शिर्के)
७. गुनवातीबाई (ईन्गले)
८. सकवारबाई (गायकवाड)

मुले – संभाजी, राजाराम,
मुली – सखुबाई निंबाळकर, राणूबाई जाधव, अंबिकाबाई महाडिक, दिपाबाई, राजकुंवरबाई शिर्के, कमलबाई पालकर

मराठा साम्राज्यात योगदान दिलेल्या महापुरुषांची, प्रमुख सरदारांची नांवे

संताजी घोरपडे
फोटो: संताजी घोरपडे
नांवे साम्राज्यासाठी दिलेले योगदान
छत्रपती शिवाजी महाराज मराठा साम्राज्य संस्थापक आणि पहिले छत्रपती. शिवाजी महाराजांनी साम्राज्य उभे करून परिसरातील किल्ले आपल्या कुशल नीतीने लढाई करून जिंकले होते. त्यांनी कोकणभागातील तसेच समुद्र तट तसेच परकीयांपासून संरक्षणासाठी स्वतःचे नौदल उभे केले होते. महाराजांना भारतीय नौदलाचे जनक म्हणतात.
छत्रपती संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे दुसरे शासक होते. छत्रपती संभाजी महाराज हे शिवाजी महाराजांचे थोरले पुत्र असून पहिल्या पत्नी महाराणी सईबाई यांच्याकडून झालेले सुपुत्र आहेत. छत्रपती संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांननंतर ९ वर्षे यशस्वीरीत्या नऊ वर्षे राज्य चालवून अनेक किल्ले फत्ते केलेले.
महादजी शिंदे महादजी शिंदे हे ग्वालियर येथे शासन चालवून बिर्टिशांना पहिल्या अँग्लो-मराठा युद्धात पराभूत केले होते.
पहिले बाजीराव (बाजीराव पेशवा) १७२०-१७४० या दोन दशकात पहिल्या बाजीरावांनी मराठा साम्राज्य ३% टक्के वरून ३०% टक्यांपर्यंत वाढविले होते. त्यांच्या मृत्यपूर्वी त्यांनी एकूण ४१ प्रमुख लढाया लढल्या होत्या. त्यांना युद्धात कधीही न हरलेला योद्धा असे आजही सम्बोधले जाते.
ताराबाई भोसले १७०० ते १७०८ या दरम्यान त्यांनी आपले पती राजाराम भोसले यांच्या नन्तर औरंगजेबाचे मराठा साम्राज्यावर आक्रमण करण्याचे स्पप्न धुळीस मिळवले होते.
दर्यासारंगयांनी महाराजांच्या काळात मराठा नौदलाचे कार्य सांभाळले होते.
धनाजी जाधवयांनी संताजी घोरपडे यांच्यासोबत मुघलांसोबत अनेक लढाया करून त्यात यशस्वी देखील झाले होते.
हैदर अली कोहरीमहाराजांच्या विश्वासातील व्यक्ती, यांनीं सेक्रेटरी म्हणून काम पार पाडले होते.
हंबीरराव मोहितेमराठा साम्राज्याचे सरदार सेनापती, सोयराबाईंचे (महाराजांची पत्नी) बंधू
सिद्धी इब्राहिम खानतोफखानीचे प्रमुख
कवी कलश संभाजी महाराजांचे वयक्तिक मार्गदर्शक
नेताजी पालकर महाराजांच्या काळातील स्वराज्याचे सरनौबत
प्रतापराव गुजर स्वराज्याचे तिसरे सेनापती ज्यांनी गनिमी काव्याच्या सहाय्यांने अनेक युद्धे जिंकली होती.
येसाजी कंक छत्रपती शिवाजी महाराजांचे लहानपणीचे मित्र याचसोबत यांनी स्वराज्यात सरनोबत – सेनापती म्हणून काम केले होते. यांनी छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराज या दोघांसोबत काम केले होते. येसाजी कंकांचा सहभाग शाहिस्तेखानावरील हल्ला, अफझलखानाचा वध, सुरतेची स्वारी, फोंडा युद्ध अशा युद्धात सहभाग होता. त्यांची गोलकोंडा मधील हत्तीसोबतची लढाई खूप प्रसिद्ध आहे.
बाजीप्रभू देशपांडे बाजीप्रभू देशपांडे हे मराठा सेनेचे कमांडर होते तसेच यांच्या पावनखिंडीतील घनघोर लढाई सर्वानाच माहीत आहे. पावनखिंडीच्या लढाईत बाजीप्रभूंच्या छोट्याशा ३०० मावळ्यांच्या सहाय्याने तब्बल १०००० बिजापुरी सैन्यासोबत झुंझ दिली होती.
तानाजी मालुसरे कोंढाण्याची केलेली सर तसेच उदयभानाच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी केलेली लढाई हि या स्वराज्याच्या शिलेदाराने केले होते.
या सारख्या स्वराज्याच्या अनेक शूरवीरांनी या मातीसाठी तसेच स्वराज्य उभे करण्यासाठी योगदान दिले आहे.

महाराजांनी जिंकलेले/ निर्माण केलेले किल्ले (जिल्ह्यानुसार)

अहमदनगर जिल्ह्यातील किल्ले

अहमदनगरचा भुईकोट किल्ला
पेडगावचा बहादूरगड
रतनगड

औरंगाबाद जिल्ह्यातील किल्ले

देवगिरी-दौलताबाद.
कुलाबा जिल्हा (रायगड जिल्हा)
अवचितगड
उंदेरी
कर्नाळा
कुलाबा
कोथळीगड (पेठचा किल्ला)
कोरलई
कौला किल्ला॑
खांदेरी
घोसाळगड
चंदेरी
तळेगड
तुंगी
धक
पेब
प्रबळगड
बिरवाडी
भिवगड
मंगळगड-कांगोरी
मलंगगड
माणिकगड
मानगड॑
रतनगड
रायगड
लिंगाणा
विशाळगड
विश्रामगड
सांकशी
सागरगड
सुरगड
सोनगिरी

कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले

पन्हाळा
पावनगड
बावडा
भूधरगड
रांगणा
सामानगड

गोंदिया जिल्ह्यातील किल्ले

गोंदियाचा प्रतापगड

चंद्रपूर जिल्ह्यातील किल्ले

किल्ले चंद्रपूर
बल्लारशा

जळगाव जिल्ह्यातील किल्ले

अंमळनेरचा किल्ला
कन्हेरगड
पारोळयाचा किल्ला
बहादरपूर किल्ला

ठाणे जिल्ह्यातील किल्ले

अर्नाळा
अशीरगड
असावगड
अलिबाग
इंद्रगड
उंबरगांव
कल्याणचा किल्ला
कामनदुर्ग
काळदुर्ग
केळवे-माहीम
कोंजकिल्ला
गंभीरगड
गुमतारा
गोरखगड
जीवधन
टकमक
ठाणे किल्ला
डहाणू
तांदुळवाडी किल्ला
तारापूर
धारावी
दातिवरे
दिंडू
नळदुर्ग
पारसिक
बल्लाळगड
बळवंतगड
बेलापूर
भवनगड
भैरवगड
भोपटगड
मानोर
माहुली
व्ररसोवा
वसईचा किल्ला
शिरगांवचा किल्ला
संजान
सिद्धगड
सेगवाह

नागपूर जिल्ह्यातील किल्ले

आमनेरचा किल्ला
उमरेडचा किल्ला
गोंड राजाचा किल्ला
नगरधन(रामटेक)(भुईकोट
किल्ला)
भिवगड
सिताबर्डीचा किल्ला

नाशिक जिल्ह्यातील किल्ले

अंकाई
अचलगड
अंजनेरी
अलंग
अहिवंत
इंद्राई
कंक्राळा
कंचना
कन्हेरा
कर्हेगड
कावनई
कुलंग
कोळधेर
गाळणा
घारगड
चांदोर
जवळ्या
टंकाई
त्रिंगलवाडी
त्रिंबक
धैर
धोडप
पट्टा
बहुळा
ब्रह्मगिरी
भास्करगड
मार्किंडा
मुल्हेर
रवळ्या
राजधेर
रामसेज
वाघेरा
वितानगड
हर्षगड
हातगड

पुणे जिल्ह्यातील किल्ले

अंकाई
अचलगड
अंजनेरी
अलंग
अहिवंत
इंद्राई
कंक्राळा
कंचना
कन्हेरा
कर्हेगड
कावनई
कुलंग
कोळधेर
गाळणा
घारगड
चांदोर
जवळ्या
टंकाई
त्रिंगलवाडी
त्रिंबक
धैर
धोडप
पट्टा
बहुळा
ब्रह्मगिरी
भास्करगड
मार्किंडा
मुल्हेर
रवळ्या
राजधेर
रामसेज

रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ले

कुवारी
चाकण
चावंड
जीवधन
तिकोना
तुंग
नारायणगड
पुरंदर
प्रचंडगड (तोरणा)
मल्हारगड
राजगड
राजमाची
विचित्रगड
विसापूर
लोहगड
शिवनेरी
सिंहगड
हडसर

शिवनेरी किल्ला
शिवनेरी किल्ला

सांगली जिल्ह्यातील किल्ले

तेरदाळ
दोदवाड
मंगळवेढे
शिरहट्टी
श्रीमंतगड
सांगली
येलवट्टी

सातारा जिल्ह्यातील किल्ले

अजिंक्यतारा
कमालगड
कल्याणगड
केंजळगड
चंदन
जंगली जयगड
गुणवंतगड
प्रचितगड
प्रतापगड
पांडवगड
बहिरवगड
भूषणगड
भोपाळगड
मकरंदगड
मच्छिंद्रगड
महिमंडणगड
महिमानगड
सज्जनगड
संतोषगड
सदाशिवगड
सुंदरगड
वर्धनगड
वंदन
वसंतगड
वारुगड
वैराटगड

छत्रपती शिवाजी महाराज माहिती मराठीमध्ये (कविता रूपात)


माझ्याही शिवबांच एक राज्य होत,
जगाहून सुंदर अस ते स्वराज्य होत ||
सुख शांती समाधान नांदत जिथे,
अस ते एक बहूजन स्वराज्य होत ||
जाती धर्म पंथाचा भेदभाव नव्हता,
न्याय हा सर्वांसाठी एक समान होता ||
न्यायासाठी प्राण गेला तरी चालेल,
पण अन्याय कुणावर झाला नव्हता ||
राज्यांचा राज्य कारभार असा होता,
गवताची कडी सुद्धा गहाण नव्हती ||
स्वतःसाठी सारेच जगतात या जगी,
रयतेसाठी जगणारे शिवराय होते ||
स्वराज्यासाठी अर्पीले प्राण ज्यांनी,
अवघा महाराष्ट्र घडविला हो त्यांनी ||
कितीही गुणगान केले तरी कमीच,
असे अमुचे छत्रपती शिवराय होते ||

शिवाजी महाराजांच्या आदर्शवात जीवनातील काही ठळक बाबी

शिवछत्रपती हे आपल्या भारत देशाच्या इतिहासातील एक उत्तम शासक म्हणून ओळखले जाणारे राजे आहेत. त्यांची यशोगाथा आदर्श राज्य करण्यासाठी नेहमीच प्रेरणादायी राहील. शिवाजी महाराजांची ख्याती ही जगभर पसरली आहे, विदेशातील लोकही ज्यांचा आदर करून प्रशासनाच्या कार्यात त्यांचा वसा जपतात असे आपले सर्वांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्यांच्या आदर्शवत जीवनातील काही बाबी पाहणार आहोत :

१. महाराजांचं नाव शिवाजी हे शिवाच्या नावावरून पडले आहे का?

नाही शिव शंकराच्या नावावरून नाही तर ते नाव शिवाई देवीच्या नावावरून व त्याचबरोबर राजांचा जन्म शिवनेरीवर झाला म्हणून त्यांचं नाव ‘शिवाजी’ ठेवण्यात आलं.

२. महाराजांची धर्मनिरपेक्षता !

महाराजांनी नेहमीच सर्व धर्मियांना समान नजरेने पाहिलं व त्यामुळेच सर्व प्रकारचे लोक त्यांच्या सैन्यात, सभेत असतं आणि ही त्यावेळची गोष्ट जेंव्हा कर्मठ लोक,सनातनी लोक जाती धर्माच्या भेदभावाचा बाजार मांडून बसले होते.त्यांच्या सैन्यात अनेक मुस्लिम मावळेही होते!

३. २००० ची १०००० मावळे संख्या !!!

शिवाजी महाराजांना त्यांच्या वडिलांनी २००० सैनिक म्हणजेच मावळे दिले होते त्याचे त्यांनी तब्बल १०००० मावळे केले.

४. युद्धनीती

मावळ्यांची संख्या खूपच कमी असल्याने व शत्रू सैन्य अफाट असल्याने महाराजांनी एक युक्ती लढवली जिला “गनिमी कावा” असे म्हणतात ज्यामध्ये शत्रू गाफील असताना हल्ला करायचा.

५. लष्करी अधिकारी

सैन्यात महाराजांची दहशत नव्हे आदर होता त्याला कारणही तसेच होते ,महाराज स्वतः जातीने सैनिकांकडे लक्ष देत असत व शत्रुसैन्याशी कशी लढत द्यायची याचे योग्य प्रशिक्षण देत असत.

६. स्त्रीआदर

महाराजांची शिकवण हीच होती की परस्त्री मातेसमान! स्वराज्यात स्त्रिया मानाने फिरायच्या, बिनधास्त फिरायच्या कारण वाईट नजरेला महाराजांची कडक शिक्षा होती. स्त्रियांच्या सन्मानार्थ इतर राज्यकर्त्यांसारखं महिलांची अवहेलना व विनयभंग करण्याची परवानगी नव्हती, बलात्कार करणाऱ्याला कठोर शिक्षा महाराज देत असत.

७. नौदल स्थापना

महाराजांचे विचार हे उच्च पराकोटीचे होते ,स्वराज्य संरक्षण हे सुद्धा महत्वाचे होतेच त्यासाठीच त्यांनी मराठा नौदल स्थापन केले जे बाहेरून आक्रमण करणाऱ्या शत्रूवर बारीक नजर ठेवत असे , असा दूरदृष्टीचा विचार करणारे ते पहिलेच राजे होते.

८. एकेरी लढत

प्रचंड मोठा आकार आणि दिग्गज सैनिक अफजलखानाचा पराभव मोठ्या शिताफीने शिवाजी महाराजांनी केला, चतुराई आणि सावधगिरीने हल्ला केला व हल्ल्याचे प्रत्युत्तर देण्यासाठी महाराजांनी चिलखत परिधान केले होते. औरंगजेबाच्या मनात शिवाजी महाराजांविषयी नेहमीच दहशत होती की ज्यामुळे तो नेहमीच दचकून असायचा.

९. दयाळू राजा

महाराज इतर राजांपेक्षा अत्यंत कनवाळू व दयाळू होते. शरण आलेल्याला ते माफ करत असत व आपल्या सैन्यात भरती करून घेत असत. रराज्याच्या तिजोरीची चोख हिशेब असायचा मग ते राशन असो किंवा दारुगोळा नाहीतर मग हत्ती घोडे व हत्यारे असोत. धान्याची कोठारे,गोदामे नेहमीचं रयतेसाठी खुली असायची त्यामुळे कुणी उपाशी नाही राहायचं.

१०. चतुर व चाणाक्षपणा

शायिस्तेखानाची बोटे छाटनं असो किंवा औरंगजेबाच्या छावणीतून मिठाईच्या पेटाऱ्यातून सुटका असो, दिल्ली दरबारात औरंगजेबाची खिल्लत उधळून लावून स्वाभिमान जपणारे शिवाजी महाराज होते. ते नेहमीच दक्ष, चतुरपणे वागायचे.

इतर विषयांवरील निबंध आणि भाषणे :

१. शिक्षक दिन भाषण (Teachers Day Speech in Marathi)

२. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मराठी निबंध (Best: Independence Day Essay in Marathi)

३. निबंध: कोरोना महामारी (Corona Essay in Marathi)

४. छत्रपती शिवाजी महाराज माहिती मराठी मध्ये

५. पावसाळा निबंध मराठीमध्ये (Essay on Rainy Season in Marathi)

६. निबंध: रंगपंचमी (रंगपंचमी Essay in मराठी)

७. माझा आवडता प्राणी मराठी निबंध Best Essay on my favourite animal in Marathi

८. माझी आई निबंध मराठी (Top 3 Essay on my mother in Marathi)

९. माझी शाळा निबंध मराठी (Best My School Essay in Marathi for Class 6 to 9)

१०. दिवाळी निबंध मराठी मध्ये Best Essay on Diwali in Marathi

इतर

मराठी भाषण कसे करावे? मराठी भाषणासाठी लागणाऱ्या 11 महत्वाच्या टिप्स!..

Rate this post

SwaRani

लिहण्याचा माझा छंद, जसा फुलातील मकरंद, लेखणीतून माझ्या उतरवते शब्दसुगंध !

One thought on “छत्रपती शिवाजी महाराज माहिती मराठी मध्ये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *