माझी शाळा निबंध मराठी (Best My School Essay in Marathi)

माझी शाळा निबंध मराठी (Best My School Essay in Marathi)

शाळेचे सर्वांच्याच आयुष्यात अनन्यसाधारण महत्व आहे. माझी शाळा निबंध मराठी भाषेत (My School Essay in Marathi) उपलब्ध करून द्यावा असे बऱ्याच जणांनी विनंती केली होती. त्यानुसार मी या पोस्ट मध्ये हायस्कुल तसेच इयत्ता ६, ७, ८ वी साठी (my school essay in marathi for class 6 majhi shala nibandh) उपयोगी पडतील असे मराठी निबंध प्रस्तुत करत आहे.

माझी शाळा निबंध मराठी मध्ये (जास्त शब्दांमध्ये)
Majhi Shala Nibandh । My School Essay in Marathi

मज आवडते ही मनापासूनी शाळा| लाविते लळा ही जसा माउली बाळा ।।
हासऱ्या फुलांचा बाग जसा आनंदी ।
ही तशीच शाळा, मुले इथे स्वछंदी ।।

या ओळी “माझी शाळा” या प्र. के. अत्रे म्हणजे केशवकुमार यांच्या कवितेतील आहेत. साध्या आणि सोप्या शब्दात शाळेचे महत्व या कवितेच्या ओळीमध्ये सांगितले आहे. बागेत ज्याप्रमाणे फुले असतात त्याप्रमाणे शाळेत मुले असतात. हसत, खेळत, गोष्टी सांगत शिक्षक मुलांना शिक्षण देत असतात. आई प्रमाणे शाळा मुलाची काळजी घेते म्हणून आईनंतर गुरुचे स्थान शिक्षकाचे असते. शाळा एकमेकांवर प्रेम करायला शिकवते, सगळ्यांशी बंधुभावाने राहायला शिकवते. एकमेकांच्या हातात हात घालून प्रगती करायला शाळाच शिकवते. शाळा मुलांशिवाय अधुरी आहे तसेच मुलाचे आयुष्यही शाळेशिवाय घडणे नाही. शाळा हे ज्ञानाचे मंदिर असते.शाळा फक्त विद्यार्थ्यांना शिक्षण देत नाही तर चांगले संस्कारही करत असते. भारताचा सुजान नागरिक कसा तयार होईल याकडे शाळेचे लक्ष असते.

सुरुवातीला शाळेत जायला कोणालाच आवडत नाही. शाळेत जायचं म्हटलं की नाकं मुरडली जातात. काही जण तर शाळेत जाताना रडतात सुद्धा. पण नंतर शाळा हि जीवनाचा अविभाज्य भाग होऊन जाते. शाळा सुरु होणार म्हणलं कि मुलांसोबत पालकांचीही तारेवरची कसरत सुरु होते. नवं वेळापत्रक, वाढलेले तास, वाढलेल्या मधल्या सुट्ट्या. हे सगळं कामाच्या वेळेत कसा जमवून घ्यायचा हा मोठा प्रश्न आई पुढे असतो.

माझी शाळा निबंध मराठी मध्ये । majhi shala nibandh

माझी शाळा सुरु होते पावसाळ्यात, त्यामुळे मुलांना आयते पावसात भिजायला आणि मजा करायला मिळते शिवाय नवीन छत्री किंवा रेनकोट मिळतोच. शाळेत जाताना सगळ्या वस्तू नवीन मिळतात. दप्तर, पाण्याची बॉटल, खाऊचा डबा, नवी वही, पुस्तक, शालेय वस्तू इ. आणि बराच काही. काहींना तर शाळा, शाळेतील बाई, मित्रमैत्रीनीही नवीनच असतात त्यामुळे शाळेत जाण्याचा उत्साह वेगळाच असतो.
शाळेचा पहिला दिवस काही मजेदार असतो. एकतर पाऊस पडत असतो त्यात मजा घेत घेत शाळेत जायच. सोबत जर तीन चार मित्रमैत्रिणी असतील तर मग मौज विचारायलाच नको नाही का! मस्त दंगा मस्ती करत शाळेत जातात. शाळेत पोहोचल्यावर सगळे आनंदी चेहरे दिसायचे.. त्या आनंदाच्या भरात नवीन दप्तर, वह्या, कंपास पेट्या, वगैरे एकमेकांना दाखवताना मजा यायची. अनेक दिवसांनी सगळे भेटायचे त्यामुळे बर वाटायचं. सुट्टीमधल्या गप्पा गोष्टी एकमेकांना सांगायचे त्यामुळे वर्ग चालू असला तरी गप्पांचा आवाज काही थांबायचं नाही. सुरुवातीच्या काही दिवसात अभ्यासही कमीच असतो त्यामुळे काही दिवस धमाल करण्यात जायचे.

माझी शाळा सकाळी भरते त्यावेळी प्रार्थना, प्रतिज्ञा, वगैरे घेतल्या जातात. जनगणमन घेतले जाते जेणेकरून मुलांवर सुरुवातीपासूनच देशप्रेमाचे संस्कार केले जातात. प्रार्थनेतून सर्वधर्मसमभाव याची शिकवण दिली जाते जी पुढच्या आयुष्यात खूप महत्वाची आहे. शाळेच्या पहिल्या काही वर्षातच मुलांच्या पुढील आयुष्याचा पाया रचला जातो. बंधुभाव, खरेपणा, समता ही मूल्ये मुलाच्या मनावर बिंबवण्याचा अवघड कार्य शाळा पार पडत असते. शिक्षक हे खूप परिश्रम घेऊन मुलांना शिकवत असतात, त्यांना प्रोत्साहन देत असतात. शाळा विविध स्पर्धा आयोजित करते व मुलांच्या कलागुणांना वाव देते. “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, हे दूध पिणारा घुरघुरल्याशिवाय राहणार नाही” हे बाबासाहेब आंबेडकरांचे वाक्य शिक्षणाची महती सांगते आणि असे शिक्षण मिळणे शाळेविना शक्य नाही. आपण जन्माला आल्यानंतर आपल्याला घडवण्यात तीन गोष्टींचा खूप वाटा असतो, एक म्हणजे आई, दुसरे आपला परिसर, तिसरा आणि सर्वात महत्वाचा भाग म्हणजे आपली शाळा. वाढताना जास्तीत जास्त वेळ आपण शाळेत घालवतो. आपल्या शाळेवर आपले पालक एक मोठी जबाबदारी टाकत असतात आणि सगळ्या शाळा ती जबाबदारी अगदी प्रामाणिकपणे पेलतात. म्ह्णून शाळा ही व्यक्ती आणि राष्ट्र घडवण्यात एक महत्वाचे कार्य करते.

माझी शाळा अशीच मला प्रिय आहे. माझ्या शाळेचे नाव सरस्वती विद्यालय आहे. खरेच सरस्वतीचे मंदिर आहे. तिची इमारत दोन नद्यांच्या संगमावर आहे. माझी शाळा अर्धा एकर च्या परिसरात वसली आहे. परिसर ऐसपैस आहे, त्यामध्ये शाळेची इमारत, मैदान आहे. माझी शाळा मराठी शाळा आहे, तसेच सेमी इंग्लिश विषयही आहे. आमच्याकडे १ ली ते १० वि असे १० वर्ग आहेत. प्रत्येक वर्गाच्या अ , ब, क, ड अशा तुकड्या आहेत. प्रत्येक तुकडीमध्ये सुमारे ५० विद्यार्थी आहे. आणि माझ्या शाळेची एकूण विद्यार्थी संख्या २००० च्या आसपास आहे. माझी शाळा तालुक्यात आहे त्यामुळे आसपासचे ग्रामीण भागातील मुलेही येते शिक्षणासाठी येतात. शाळेत मुलांप्रमाणेच मुलींची संख्या बरीच आहे. हा परिणाम माझ्या शाळेने मुलींच्या शिक्षणासाठी चालवलेल्या उपक्रमाचा आहे. शाळेचे मैदान हे खूप मोठे आहे. मैदानात विविध प्रकारचे खेळ घेतले जातात. शाळेतर्फे नानाप्रकारच्या स्पर्धा घेतल्या जातात आणि त्यातून नंबर काढून प्रोत्साहनात्मक बक्षीस दिले जाते. आमच्या शाळेत तालुकास्तरीय स्पर्धाही आयोजित केल्या जातात.

माझ्या शाळेबद्दल मला सगळ्यात जास्ती आवडणारी एक गोष्ट म्हणजे लिंग, धर्म, किंवा जातीच्या आधारावर भेदभाव केला जात नाही. सगळे जण एकोप्याने राहतात. सर्वधर्मियांना समान वागणूक दिली जाते. हा हुशार हा मठ्ठ असाही भेदभाव कधी केला जात नाही. प्रत्येक मुलाकडे जातीने लक्ष दिले जाते. मुलांचे छोटे छोटे गट करून त्यांच्या प्रगतीवर लक्ष ठेवले जाते. कोणीही कधीही अभ्यासाविषयी शंका विचारली तर शंकेचे निरसन शिक्षक तत्परतेने करतात. माझी शाळा शिस्तप्रिय आहे. विद्यार्थ्यांचे लाड आणि शिक्षा दोन्ही देण्यात माझी शाळा मागे पुढे पाहत नाही. कधी शिक्षा म्हणून पायाचे अंगठे धरायला लावत तर कधी छडी मारत. कोंबडा करणे हा प्रकारही शिक्षा म्हणून दिला जातो. या शिक्षेचा उपयोग चूक सुधारण्यासाठी जितका होतो तितकाच पुन्हा अशी चूक हातून होऊ नये यासाठी होतो. “छडी लागे छमछम विद्या येई घमघम” हे काही उगाच म्हणत नाही.

आमच्या शाळेच्या दिवसाची सुरुवात प्रार्थनेपासून होते. आम्ही सगळे वर्गातून रांगेने मधल्या हॉल मध्ये जमतो. तिथे राष्ट्रगीत, प्रतिज्ञा,संविधान, सरस्वती वंदना नंतर ओंकार आणि गायत्री मंत्र म्हटला जातो. त्यानंतर बाई दिनविशेष सांगतात. मग सुविचार सांगून प्रत्येकाला वर्गात सोडले जाते. शिकवणीचे तास झाले कि मधली सुट्टी होते.आम्ही सर्व मुले शाळे बाहेरच्या अंगणात गोल करून जेवण करतो. एकमेकांचे पदार्थ खातो.त्यांनतर पुन्हा शाळा भरायची घंटा होते. अशा आमच्या शाळेत तीन मधल्या सुट्ट्या होतात. दोन छोट्या आणि एक मोठी. असे करत करत शाळा सुटायची घंटा वाजते कधी याची वाट पाहत बसतो आम्ही मुले.

आमच्या शाळेत एकूण एक हुशार शिक्षक आहेत. त्यांना त्यांच्या विषयाची उत्तम माहिती आहे. आणि शिकवण्यात तर त्यांचा हात कोणी धरूच शकत नाही. ते फक्त धडे वाचून दाखवत नाहीत तर त्या अनुषंगाने जगभरची माहिती आम्हाला देतात. वेगवेगळी उदाहरणे देतात. सोप्या भाषेत समजावून सांगतात. त्यांचा भर हा विद्यार्थ्यांना पुस्तकी किडे ना करता सर्व माहिती असलेले करण्यावर असतो. आम्हाला एका विषयाचा धडा शिकवताना त्याबरोबर इतर विषयातील पण माहिती देतात. कोणीही शिक्षक नुसता भूगोल किंवा नुसते गणित असे एक्स्पर्ट नाही तर ते कोणताही विषय तितक्याच कुशलतेने शिकवतात. त्यामुळे सर्वगुणसंपन्न म्हणजे काय हे आम्हाला कळते आणि आम्हीपण सर्व विषयात रस घेतो.
आमच्या शाळेत विविध विषयांसोबत योग, व्यायाम, चित्रकला, कार्यानुभव असे विषय शिकवले जातात. व्यायाम शिक्षकांची तीक्ष्ण नजर मुलांमधील गुणांचा अवलोकन करीत असतात. त्याप्रमाणे त्या मुलाला विशिष्ट खेळाची सर्व माहिती देऊन प्रशिक्षक बोलवून त्याला प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे आंतरशालेय तसेच इतर देशांमध्ये पण आमच्या शाळेतील मुले चमकली आहेत. आम्ही खूप गर्वाने सांगतो कि हा खेळाडू आमच्या शाळेचा आहे. आमच्या शाळेचा निकाल नेहमी उत्तम असतो, मागच्या वर्षी दहावीच्या परीक्षेत ९८% यश प्राप्त केले आमची एक विद्यार्थिनी जिल्हा टॉपपेर आणि संस्कृतमध्ये राज्यात अव्वल आली . याचे श्रेया आमचे शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी, आणि मुख्याध्यापक यांना जाते.
माझी शाळा जरी तालुकास्तरावर असली तरी आम्ही खूप वेगाने आधुनिक शिक्षण पद्धती वापरात आणण्याचा प्रयत्न करत आहोत. गेल्या आठवड्यात मुख्याध्यापक यांनी सांगितले कि, या वर्षांपासून सर्व विज्ञान आणि गणित वर्ग संगणकीकृत प्रणालीवर घेतले जातील, शाळेने सॉफ्टवेअर आणि प्रोजेक्टर देखील खरेदी केले आहेत. पालकांनी या संकल्पनेचे कौतुक केले आहे, त्यांनी असे केवळ चित्रपटांमध्ये पाहिले होते, पालक खुश आहे कि त्यांच्या त्यांच्या मुलांचा गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत आहे.

असे वाटते शाळा सोडून जाऊ नये. पण नाही! आम्हाला पण आमच्या शाळेचे नाव उज्ज्वल करायचे आहे. मला अशा शाळेचा भाग असल्याचा खूप अभिमान आहे. मी आशा करतो आमची शाळा असेच गुणवंत विद्यार्थी तयार करत राहील, आणि आमचे भविष्य सुंदर बनविण्यात मदत करत राहील.

शाळा एक अविस्मरणीय
अशी आठवण
ज्याची प्रत्येकाने आपल्या आयुष्यात
करून ठेवलीय साठवण
शाळेला मनामध्ये
एक वेगळाच स्थान आहे
कितीही दूर गेलो तरी
शाळा आमची शान आहे.

माझी शाळा निबंध मराठी मध्ये (Majhi Shala Nibandh)
My School Essay in Marathi for Class 6 to 9

My School Essay in Marathi for Class 6 to 9 | majhi shala nibandh
My School Essay in Marathi for Class 6 to 9 । majhi shala nibandh

माझ्या शाळेचे नाव गोकुळ प्राथमिक शाळा आहे. माझी शाळा सातारा शहरातील मोक्याच्या जागी आहे. माझी शाळा नावाप्रमाणेच मुलांचे गोकुळ आहे. जसे श्रीकृष्णाचे गोकुळ होते तसेच माझ्या शाळेचे मुलांच्या मनात स्थान आहे. माझी शाळा कृष्णानगर इथे वसलेली आहे. शाळेत १ ली ते ७ वी पर्यंत वर्ग आहेत. प्रत्येक वर्गात अ, ब अशा दोन तुकड्या आहेत, परंतु तुकड्यांमध्ये कोणताही भेदभाव नाही. हि तुकडी हुशार हि कमी हुशार असे काही नाही. सर्व वर्गात एकसमान मुले आहे. माझ्या शाळेच्या आजूबाजूला औद्योगिक वसाहती आहेत त्यामुळे गावातील गरीब घरातील मुलांनाही उत्तम शिक्षण देण्याचा माझ्या शाळेचा प्रयत्न असतो.

माझी शाळा खूप मोठी नाही पण साधारण १००० च्या आसपास मुले माझ्या शाळेत आहेत. सवलतीच्या दारात माझी शाळा सर्व मुलांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करते. माझ्या शाळेची इमारत भव्य आहे. दोन माजली इमारतीमध्ये आमचे वर्ग भरतात. शाळेच्या समोर एक मोठे मैदान आहे. मैदानात रोज प्रार्थना होते. सर्व वर्गातील लहान मोठी मुले, शिक्षक एकत्र जमून राष्ट्रगीत, प्रार्थना म्हणतो. मैदान खूप प्रशस्त आहे. त्या मैदानात वर्षातून एकदा स्पर्धा होतात. माझ्या शाळेच्या सभोवती आंबा, पेरू हि फळझाडे आहे तसेच शोभेची फुले असलेली झाडे आहेत. फुलांचा सुगंध आजूबाजूला पसरलेला असतो त्याने प्रसन्न वाटते. माझ्या शाळेची प्रत्येक वर्गखोल्या प्रशस्त आणि स्वच्छ आहेत. आमच्या शाळेत बसायला बेंच आहेत. एका बेंच वर दोन मुले बसू शकतात इतके मोठे आहेत. शाळेच्या भिंतींवर चहुबाजूने फळे आहेत आणि त्यावर कविता गाणी लिहिलेली आहेत. प्रत्येक वर्गामध्ये पुरेसा प्रकाश यावा यासाठी लांब आणि मोठ्या खिडक्या आहेत.

माझ्या शाळेची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ५ अशी आहे. या वेळेत तीन सुट्ट्या असतात. दोन छोट्या आणि एक मोठी. सुट्ट्यांमध्ये डबा खाणे, खेळ खेळणे या गोष्टी मुले करतात. सोमवार ते शुक्रवार शाळा पूर्ण दिवस असते पण शनिवारी शाळा लवकर भरते आणि लवकर सुटते. सकाळपासून दर तासाला शिक्षक येऊन आम्हाला नवीन नवीन गोष्टी शिकवून जातात. माझ्या शाळेतील शिक्षक मुलांना सर्व गोष्टी नीट समजून सांगतात प्रसंगी कठोर होऊन कानउघाडणी करतात पण यामागे मुलांची प्रगती व्हावी हाच हेतू असतो. शाळेच्या इमारतीमध्ये मध्यभागी मुख्याध्यापकांची खोली आहे. मुख्याध्यापक अधूनमधून वर्गखोल्यांमध्ये जाऊन देखरेख करत असतात.

माझ्या शाळेत मुलींसाठी आणि मुलांसाठी एक ठराविक गणवेश ठरलेला आहे. दररोज तोच घालून शाळेत गणवेषासोबत टाय, कंबरेचा पट्टा, ओळखपत्र इ. असते त्याशिवाय शाळेत प्रवेश मिळत नाही. आठवड्यातील एक दिवस आपल्याला आवडेल तो गणवेश आपण घालून येऊ शकतो. माझ्या शाळेमध्ये खूप काटेकोरपणे शिस्तीने पालन केले जाते त्याला खूप महत्व दिले जाते. माझ्या शाळेमध्ये पहिली घंटा सर्व मुले प्रार्थनेला शाळेच्या मैदानात जमा होतात. आठवड्यातला ठराविक वर आमची स्वच्छता तपासणी होते त्यात हातापायाची नखे, दात तपासले जातात. आणि स्वच्छतेचे महत्व समजावून सांगितले जाते. माझ्या शाळेमध्ये वाचनालय आहे. त्यामध्ये वेगवेगळे पुस्तके आहेत. काही अभ्यासाची, काही गोष्टींची,काही गाण्याची आहे. आम्ही मुले नेहमी वाचनालयात जातो. वेगवेगळी अभ्यासाव्यतिरिक्त माहितीची पुस्तके वाचतो. त्यातून ज्ञान घेतो. आम्हाला आमचे शिक्षक पुस्तके वाचण्यासाठी नेहमी प्रोत्साहित करत असतात. माझ्या शाळेमध्ये प्रयोगशाळा आहे. विज्ञान विषयात खूप सारे प्रयोग असतात. आमचे शिक्षक त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला प्रयोग करायला शिकवतात. आमच्या शाळेत संगणक वर्ग देखील आहे. आमचे शिक्षक आम्हाला संगणक कसा वापरावा, त्यावर अभ्यास कसा करावा त्याबद्दल मार्गदर्शन करतात.

माझ्या शाळेत अभ्यासाबरोबरच मुलांच्या सर्वांगीण विकासाकडे देखील लक्ष दिले जाते. त्यासाठी शाळेमध्ये कब्बड्डी, खो-खो, धावणे, गोळा फेक, रस्सी उडी यासारखे अनेक खेळ घेतात. रोज खेळाचे शिक्षक आमचा तास घेतात. विविध खेळ आम्हाला शिकवतात. प्रत्येक मुलाच्या अंगी असलेल्या गुणांना समजून त्याप्रमाणे त्यांना पुढील वाटचालीस प्रवृत्त करतात. आमच्या शाळेत आठवड्यातून एकदा योग चा तास होतो त्यात आम्हाला व्यायाम कसा करावा, प्राणायाम कसे करावे, शरीर निरोगी कसे ठेवावे याविषयी धडे देतात. माझ्या शाळेचा निकाल नेहमी १०० टक्के लागतो. सर्व मुले खूप कष्टाने अभ्यास करतात. शिक्षक मुलांकडून बऱ्याच गोष्टी करून घेतात. कोणतीही गोष्ट समजली नाही तर पुन्हा पुन्हा सांगतात. गोष्टी सोप्या करून सांगण्याकडे माझ्या शाळेतील शिक्षकांचा हातखंड असतो. माझ्या शाळेतून शिक्षण घेतलेली मुले आज मोठ्या मोठ्या पदावर आहेत. खूप नाव कमावले आहे. माझ्या शाळेचे नाव आमच्या शहरात खूप नावाजलेले आहे.

आशा आहे कि तुम्हाला माझी शाळा निबंध मराठी | Majhi Shala Nibandhआवडला असेल. पहिला माझी शाळा निबंध मराठी हा सामान्य दृष्टी कोनातून लिहिला आहे तर जो दुसरा माझी शाळा निबंध मराठी मध्ये लिहिला आहे तो ६ वी ते ९ वी (My School Essay in Marathi for Calss 6 to 9) च्या विद्यार्थ्यांना उपयोगी होईल या दृष्टीने लिहिला आहे. दोन नंबरच्या मराठी निबंधात तुम्ही तुमच्या शाळेचे नांव आणि गाव दोन्ही नांवें बदलू शकता. हा निबंध आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये शेयर करायला विसरू नका.

इतर विषयांवरील निबंध आणि भाषणे :

१. शिक्षक दिन भाषण (Teachers Day Speech in Marathi)

२. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मराठी निबंध (Best: Independence Day Essay in Marathi)

३. निबंध: कोरोना महामारी (Corona Essay in Marathi)

४. छत्रपती शिवाजी महाराज माहिती मराठी मध्ये

५. पावसाळा निबंध मराठीमध्ये (Essay on Rainy Season in Marathi)

६. निबंध: रंगपंचमी (रंगपंचमी Essay in मराठी)

७. माझा आवडता प्राणी मराठी निबंध Best Essay on my favourite animal in Marathi

८. Best Marathi Ukhane for Female | Marathi Ukhane for Male (150+)

Rate this post

Chetan Jasud

मी एक पूर्ण-वेळ डिजिटल मार्केटर आणि अर्धवेळ ब्लॉगर आहे ज्याला लिहायची, प्रवासाची तसेच या टेकनॉलॉजीच्या युगात अपडेटेड राहायची आवड आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *