बिटकॉइनचा नफा परतावा पाहून खूप लोकांना प्रश्न पडला असले कि बिटकॉइन काय आहे? थोडक्यात सांगायचे तर ही एक डिजिटल करन्सी असून गुंतवणूकदारांना आकर्षक करणारी एक ट्रेंडिंग गुंतवणूक बनली आहे. यालाच क्रिप्टोकरन्सी असेही म्हणतात. बिटकॉइनच्या स्वरूपात आपण एकप्रकारे एकमेकांना पैसे पाठवू शकतो ते देखील बँकेचा आधार न घेता. त्याचप्रमाणे गुंतवणूक दार याला एक चांगली गुंतवणूक म्हणून देखील पाहत आहेत कारण बिटकॉइन मागील काही वर्षात इतका परतावा दिला आहे कि जो रियल इस्टेट आणि शेयर मार्केटने देखील दिलेला नाही. भारतात बिटकॉइन ला कायदेशीर मान्यता नसली तरी पूर्णतः बंदी देखील नाहीय. बिटकॉइन काय आहे ? तसेच बिटकॉइन इतके महाग असण्याचे कारण देखील आपण पहाणार आहोत.
बिटकॉइन काय आहे?
बिटकॉइन काय आहे? याचा शोध कोणी लावला?
What is Bitcoin in Marathi? Who invented Bitcoin?
बिटकॉइन ही एक प्रकारची डिजिटल करन्सी असून ही २००८ च्या आर्थिक संकटावेळी उदयास आली आहे. हे एक आभासी चलन असून बिटकॉइन मुळे आपण पैसे एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला बँकेचा आधार न घेता पाठवू शकतो. बिटकॉइन ही सर्व क्रिप्टोकरंसीची जननी आहे व ही ब्लॉकचेंन या तंत्रज्ञानावर आधारित आहे. ब्लॉकचेन ही ट्रांजक्शन ची शेयर केलेली यादी असते. यामध्ये प्रत्येक ट्रांजक्शन हे कन्फर्म तसेच एन्क्रिप्ट केले जाते. ब्लॉकचेन चे नेटवर्क हे काही लोकांकडून नियंत्रित केले जाते त्यांना मायनर्स (Miners) म्हणतात. मायनर्स चांगल्या ताकदीचे कम्पुटर्सचा वापर ट्रांजक्शन व्हेरिफाय करण्यासाठी करतात, प्रत्येक व्हेरिफिकेशन मागे ब्लॉकचेन त्या मायनर्स ना काही रक्कम देत असते.
बिटकॉइन ही विकेंद्रीकृत सिस्टीम वर आधारित असून यावर कोणत्याही व्यक्तीचा, सरकारी बँकेचा किंवा कम्पनीचा अधिकार नाही आहे. बिटकॉइनचा शोध ‘सातोशी नाकामोटो‘ नामक व्यक्तीने २००९ साली लावला होता. त्या व्यक्तीने त्यावेळी बिटकॉइन वर एक व्हाइटपेपर लिहिला होता जो भविष्यातील योजना तसेच बिटकॉइन मध्ये वापरात आलेल्या टेकनॉलॉजि चा उल्लेख केलेलाआहे. ते व्हाइटपेपर आजही आपल्या पहायला मिळते. Bitcoin Whitepaper हे आजही आपल्याला अधिकृत वेबसाईटवर पहायला मिळते. याचा शोध सातोशी नी लावला असला तरी ते अद्यापही गूढच राहिले आहे. कारण सातोशी नाकामोटो कधीही जगासमोर आलेले नाहीत. सुरुवातीच्या कालांनंतर सातोशीनी जगासमोर न येणंच पसंद केले आहे.
बिटकॉइन बाबतीत मला आवडलेली सर्वात चांगली गोष्ट ही त्याची विश्वासार्हता आणि कमी ट्रांजक्शन फी हे आहेत. एखाद्या व्यक्तीला जर रु . १०,००० जरी पाठवायचे असतील तर त्याची ट्रँजॅक्शन फी जवळपास ७० रुपये इतके असेल तेच जर तुम्ही १०,००,००,००० रु. (दहा कोटी रुपये) पाठवणार असाल तरीही तुम्हाला ट्रांजक्शन फी देखील रु.७० च द्यावे लागेल. हेच जर तुम्ही पेपाल किंवा इतर साधनांचा वापर करून पैसे ट्रान्सफर करण्यास निवडाल तर खूप पैसे फक्त ट्रांजक्शन फी म्हणून द्यावे लागतील.
बिटकॉइन कसे काम करते?
How Bitcoin Works?
बिटकॉइन हे आभासी चलन असून आपण त्याला स्पर्श करू शकत नाही. अर्थातच फिजिकल बिटकॉइन हे आपल्याला पहायला मिळणार नाही. हे बिटकॉइन पब्लिक लेजर वर ठेवलेले असतात आणि याचा वॉलेट ऍड्रेस हा पारदर्शी असतो. याचा अर्थ, जर मी xyz व्यक्तीला ०.३० बिटकॉइन पाठविले तर मी त्याचा वॅलेट ऍड्रेस घेऊन Blockchain Explorer वर ट्रांजक्शन पूर्ण झाले कि नाही हे पाहू शकतो. फक्त या प्रोसेस मध्ये कोणत्या व्यक्तीने कोणाला पैसे पाठविले हे बँकेप्रमाणे सांगू शकत नाही. कारण यामध्ये सॉफ्टवेअर ने तयार झालेल्या वॅलेट ऍड्रेस चा वापर केलेला असतो. जर एखादा घोटाळा झाल्यास किंवा चुकीच्या ऍड्रेस वर तुम्ही हे कॉईन्स पाठविला तर त्या वॅलेटच्या वापरकर्त्याला शोधणे खूपच कठीण आहे.
बिटकॉइनला भारतात मान्यता आहे का?
What is Bitcoin in Marathi?
ही डिजिटल करन्सी असल्याने बिटकॉइनचा वापर जगातून कुठूनही करू शकतो. भारतामधील स्तिथी पहाता, भारतात बिटकॉइनचा वापर हे लीगल टेंडर म्हणून करता येणार नाही असे कोर्टाच्या निकालात सांगण्यात आले आहे. म्हणजे, जर आपल्याला भारतात एखादे लाईटबील भरायचे असेल, काहीही कायदेशीर खरेदी करायची असेल तर अशा गोष्टींमध्ये हे चलन मान्य नसेल. भारतात अमेरिकन डॉलरची देखील हीच स्तिथी आहे, आपण डॉलरचा वापर करून कोणतेही व्यवहार भारतात करू शकत नाही.
याचा अर्थ भारतात बिटकॉइनला बंदी आहे असेल मुळीच नाही. काही महिन्यांपूर्वी रिजर्व बँक ऑफ इंडिया ने सर्व बँकांना सांगितले होते कि बिटकॉइन एक्सचेंजेस ला पेमेंट सुविधा पुरविणाऱ्या सर्व बँकांनी त्यांना सुविधा देणे बंद करावे. पण नन्तर काही महिन्यातच आपला निर्णय बदलून त्यांनी पुन्हा सुविधा देण्याचा आदेश दिला. त्यामुळे जर तुम्ही गुंतवणूक करणार असाल तर चांगल्या एक्सचेंजेस चा वापर करून तुम्ही गुंतवणूक करू शकता.
बिटकॉइनची सध्याची किंमत किती आहे?
वरील चार्ट मध्ये तुम्हाला समजेल कि बिटकॉइन ने भरमसाठ परतावा बिटकॉइन गुंतवणूकदारांना दिलेला आहे. आज दिनांक ३० जानेवारी २०२१ रोजी बिटकॉइनचा दर प्रति कॉईन २४ लाख ३४ हजार रुपये इतका आहे. बिटकॉइन चांगला परतावा जरी देत असले तरी यामध्ये खूप अस्थिरता आहे. शेयर मार्केटच्या तुलनेत यामध्ये फायदा असला तरी अस्थिरता असल्याने तोटा सुद्धा होऊ शकतो.
आपण कमी रक्कमेचे बिटकॉइन कसे व कोठून खरेदी करू शकतो?
आजची बिटकॉइनची किंमत २४ लाखाच्या वर जरी असली तरी आपल्याला ते खरेदी करण्यासाठी तितकीच रक्कम हवी असे नाही. अगदी आपण रु. १०० चे देखील बिटकॉइन खरेदी करू शकतो. ते कसे ते आपण पाहूया…
एका बिटकॉइन हे १०,०००,००० (दहा मिलियन) सातोशी पासून बनले आहे. म्हणजे,
१ बिटकॉइन = १०,०००,००० सातोशी
अर्धे बिटकॉइन = ५,०००,००० सातोशी
जर आज आपण दहा हजार रुपयांचे बिटकॉइन घ्यायचे ठरविले तर आपल्याला 0.004009079153085878 इतक्या सातोशी म्हणजे बिटकॉइन मिळेल.
बिटकॉइनची किंमत इतकी जास्त का आहे?
What is Bitcoin in Marathi? Why Its so much costly?
जसे शेयर मार्केट मध्ये शेयर ची किंमत कंपनीच्या प्रोडक्टस तसेच नफ्यावर व आणखी गोष्टींवर अवलंबून असते तसे बिटकॉइन च्या बाबतीत काही घटक आहेत जे या क्रिप्टोकरंसीला मूल्यवान ठरवितात.
- मागणी आणि पुरवठा : आपल्या पारंपरिक चलनाप्रमाणे आपण कितीही बिटकॉइन छापू/तयार करू शकता नाही. एकूण फक्त २१,००० च बिटकॉईन्स तयार होणार असून सध्या जवळपास १७००० हजार च बिटकॉईन्स बाजारात आहेत. मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्याने बिटकॉइन चा दर दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
- टेक्नॉलॉजी : यामध्ये वापरली गेलेली ब्लॉकचेन टेकनॉलॉजि खूपच चांगली असून याचा वापर प्रगत तंत्रज्ञानानासाठी करता येत असल्याने गुंतवणूकदारांना ह्याचा भाव भविष्यात आणखी वाढेल असा विश्वास आहे. त्यामुळे लोक हे जितके शक्य होईल तितके खरेदी करत आहे.
आपण भारतात बिटकॉईन्स कुठे खरेदी करू शकतो?
सध्या भारतात तसेच भारताबाहेरून कार्यरत असणारे Exchanges आणि Wallet बिटकॉइन खरेदी करण्याची सोय केली आहे. जसे शेयर मार्केट साठी भारतात झेरोधा सारखे ब्रोकर असतात तसेच भारतात Bitbns, Wazirx आणि आंतरराष्ट्रीय बाजारात Binance ही अग्रगण्य exchanges आहेत.
बिटकॉइन चे तोटे / धोके
- जर आपल्या वॅलेट चा पासवर्ड सुरक्षित ठेवला नसल्यास बिटकॉइन चोरी होऊ शकतात.
- गुंतवणुकीच्या बाबतीत तसेच ट्रेडिंग च्या बाबतीत खूपच अस्थिर आहे.
- जर तुमचे कॉईन्स एक्सचेंज वेबसाईटवर असतील तर हॅकर कडून वेबसाईट्स हॅक झाल्यास बिटकॉईन्स गमावू शकतो (यासाठी आपण वयक्तिक वॅलेट वापरू शकतो ज्याचा पासवर्ड फक्त आपल्यालाच माहीत असतो)
- बिटकॉइनची टेक्नॉलॉजी हि समजण्यास कठीण आहे त्यामुळे दुसऱ्याला पटकन समजावून सांगणे कठीण आहे.
फार छान माहिती दीलीत ,धन्यवाद. तरीपण मला बिटकॉईन ची ‘ संपूर्ण ‘ माहिती ( मराठीतून)हवी आहे. आपण देऊ शकाल का ? माहीती मिळविण्याचे मार्ग ( सोर्सेस ) सांगितलंत तरी चालेल.
मी माझ्यावतीने माहिती देण्याचा प्रयत्न करेन. आपल्याला नेमकी कोणत्या विषयांवर माहिती हवी आहे?
I saw your blog well. If you visit my blog, you can get useful information.