New Rakshabandhan Essay in Marathi । रक्षाबंधन मराठी निबंध

New Rakshabandhan Essay in Marathi । रक्षाबंधन मराठी निबंध

Rakshabandhan Essay in Marathi रक्षाबंधन मराठी निबंध : रक्षाबंधन हा एक हिंदू सण आहे जो भाऊ आणि बहिणींमधील बंध साजरा करतो. “रक्षा” या शब्दाचा अर्थ संरक्षण, आणि “बंधन” म्हणजे बंधन किंवा बांध. या दिवशी, बहिणी आपल्या भावांच्या मनगटावर “राखी” नावाचा पवित्र धागा बांधतात आणि भाऊ आपल्या बहिणींना सर्व प्रकारच्या हानीपासून वाचवण्याची शपथ घेतात.

Rakshabandhan Essay in Marathi । रक्षाबंधन मराठी निबंध

Rakshabandhan Essay in Marathi

चंदनाच्या ताटी, उजळल्या ज्योती,

ओवाळीते भाऊराया रे, वेड्या बहिणीची वेडी हि माया

या ओळी वर्षातून दोन वेळा आपल्या कानी पडताना दिसतात, त्या म्हणजे एक तर भाऊबीज आणि दुसरे म्हणजे रक्षाबंधन. हे दोन्ही सण असतातच मुळात भावा-बहिणीसाठी. तर आपण आज रक्षा बंधन विषयी माहिती घेणार आहोत.

प्रत्येक घरातील भाऊ बहीण या सणाची अत्यंत आतुरतेने वाट पाहत असतात. कारण वर्षातून एकदा येणार हा सण हातात प्रेमरूपी धागा बांधून तो गावभर मिरवण्यात भावाला एक वेगळाच आनंद देऊन जाते. आणि भावाने दिलेले गिफ्ट किंवा भेटवस्तू कौतुकाने पाहण्यात दिवस घालवणारी बहीण या दोघांनाही हा सण अगदी जवळचा नाही का.

वर्षभर भांडण करण्यात दिवस घालवले जातात पण या दिवशी कोणी भांडत नाही. एका राखीचे महत्व खूप आहे. खरेतर तो एकाच धागा असतो पण त्यात बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी घेतलेला भाऊ दिसतो. राखीचा प्रत्येक धागा भावाला बहिणीप्रती असलेली आपली जबाबदारी ची जाणीव करून देतो. काहीही झाले, किती त्रास झाला तरी मी तुला कधीही एकटे सोडणार नाही हि असते शपत त्या धाग्यामागे घेतलेली.

अनेकदा तुझे माझे जमेना आणि तुझ्यावाचून करमेना अशी काहीशी अवस्था असलेले हे नाते त्या दिवशी मात्र वेगळ्याच प्रकारे खुलून येते श्रावण महिन्याची पौर्णिमा राखी पौर्णिमा या नावाने साजरी केली जाते. राखीपौर्णिमा जवळजवळ भारतातील प्रत्येक राज्यात साजरी केली जाते. मात्र या सणाला प्रांतानुसार वेगवेगळ्या नावाने सुद्धा ओळखले जाते.अवनी अवित्तम या नावाने हा केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश आणि ओरिसा या दक्षिण भारतातील राज्यांमध्ये साजरा केला जातो.

तसेच या दिवसाला तिथे उपकर्मम या नावाने देखील संबोधले जाते. हा सण तेथील ब्राह्मण लोकांसाठी विशेष जातो. कारण या दिवशी ब्राह्मण लोक पवित्र धागा आपल्या हातात घालतात. कजरी पौर्णिमा या नावाने मध्यप्रदेश, झारखंड, छत्तीसगढ, बिहार या राज्यांमध्ये साजरा केला जातो. इथे भावाबहिणीप्रमाणेच शेतकरी आणि मुलगा असलेल्या आईसाठी हा सण अत्यंत खास मानला जातो.

नारळी पौर्णिमा या नावाने महाराष्ट्रात हा सण साजरा केला जातो. फक्त महाराष्ट्रातच नाही तर पश्चिमेकडील गुजरात, गोवा,कर्नाटक या राज्यांमध्येही साजरा केला जातो.जे लोक समुद्रातून मिळणाऱ्या गोष्टींवर आपला उदरनिर्वाह करतात अशी लोक समुद्राला नारळ अर्पण करून नारळीपौर्णिमा मनोभावे साजरी करतात. यामुळे जे कोळी, मच्चीमार असतात ते लोक खूप धुमधडाक्यात हा सण साजरा करताना दिसून येतात.

गुजरातमध्ये या सणाला आणखी एक नाव आहे ते म्हणजे पवित्रपौर्णिमा. या दिवशी गुजराती बंधुभगिनी आपले आराध्य दैवत भगवान शंकराची पूजा करतात. राजस्थानमध्ये या सणाला पोवती पौर्णिमा असे म्हणतात. कापसाच्या सुताच्या नवसुती करून तिला आठ-बारा किंवा चोवीस जी सोयीची असेल तेवढी गाठ मारून त्यांच्या ठिकाणी ब्रह्मा, विष्णू, महेश, ओंकार, सूर्य इत्यादींचे आवाहन करून हे पोवते प्रथम देवास वाहून नंतर तसलीच पोवती कुटुंबातील माणसाच्या मनगटावर बांधली जाते.

रक्षाबंधनाची माहिती वाचताना काही ऐतिहासिक दाखलेही आपल्याला पाहावयास मिळतात त्यापैकी दोन कथा या जास्ती ऐकायला मिळतात त्या म्हणजे पहिली कथा कृष्ण आणि द्रौपदी ची आणि दुसरी कथा आहे ती म्हणजे हुमायून आणि कर्णावतीची.

पहिली कथा अशी आहे कि एकदा भगवान कृष्णाच्या हाताला जखम झाली आणि रक्त वाहू लागलं. तेच द्रौपदी हे पाहू शकली नाही. तिने तात्काळ आपल्या साडीचा तुकडा फाडून श्रीकृष्णाच्या हाताला तो बांधला. लगेच श्रीकृष्णाचा रक्तस्त्राव थांबला. काही काळानंतर जेव्हा दुःशासनाने द्रौपदी चे चीरहरण म्हणजेच वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा या बंधनाची परतफेड म्हणून श्रीकृष्णाने द्रौपदी चे रक्षण केले.

दुसरी कथा आहे मध्ययुगीन काळातील. चित्तोडगढची हिंदू राणी कर्णावतीने दिल्लीच्या मुघल बादशाह हुमायूनला आपला भाऊ मानून त्याला राखी पाठवली. हुमायूनने राणीची राखी स्वीकार केली. आणि वेळ आल्यावर राणीच्या सन्मान रक्षणासाठी गुजरातमधील एका राजाशी युद्धही केले . अशाप्रकारे हा सण खूप उत्साहात साजरा केला जातो.

इतर विषयांवरील निबंध आणि भाषणे :

१. शेतकरी जगाचा पोशिंदा,शेतकरी निबंध मराठीमध्ये Essay on Farmer

२. माझा आवडता नेता निबंध-हिंदुहृदय सम्राट श्री. बाळासाहेब ठाकरे

३. झाडे लावा झाडे जगवा निबंध Zade Lava Zade Jagva Essay in Marathi

४. छत्रपती शिवाजी महाराज माहिती मराठी मध्ये

५. Essay on Pollution in Marathi । प्रदूषण- एक जागतिक समस्या

इतर

१. Baby Girl Names in Marathi Starting A to Z | 700+ Unique Marathi

Rate this post

Chetan Jasud

मी एक पूर्ण-वेळ डिजिटल मार्केटर आणि अर्धवेळ ब्लॉगर आहे ज्याला लिहायची, प्रवासाची तसेच या टेकनॉलॉजीच्या युगात अपडेटेड राहायची आवड आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *