माझा आवडता प्राणी मराठी निबंध Best Essay on my favourite animal in Marathi

माझा आवडता प्राणी मराठी निबंध Best Essay on my favourite animal in Marathi

लहान मुले असो मोठी मंडळी, सगळ्यांचा प्राण्यांचा लळा असतो. काही प्राणी असेही असतात जे माणसांना लळा लावतात. अशाच काही विविध प्राण्यांवर आज घेऊन येत आहोत माझा आवडता प्राणी मराठी निबंध (Essay on my favourite animal in Marathi). यामध्ये विशेषतः आपण माझा आवडता प्राणी कुत्रा, माझा आवडता प्राणी गाय तसेच इतर प्राण्यांवर मराठी निबंध पहाणार

माझा आवडता प्राणी मराठी निबंध Best Essay on my favourite animal in Marathi

माझा आवडता प्राणी कुत्रा मराठी निबंध
Essay on my favourite animal in Marathi on Dog

Essay on my Favorite Animal dog in Marathi
माझा आवडता प्राणी मराठी निबंध । माझा आवडता प्राणी कुत्रा-मराठी निबंध

प्रत्येकालाच कोणता ना कोणता प्राणी आवडतो त्यामागे बरीच कारणे असतात. कोणाला गाय आवडते तर कोणाला घोडा, कोणाला मांजर आवडते तर कोणाला हत्ती. कोणाला मांजर त्याच्या निरागसतेमुळे आवडते तर कोणाला घोडा त्याच्या चपळाई साठी आवडतो. काहींना हत्ती त्याच्या बलवान शरीरामुळे आवडतो. तऱ्हेतऱ्हेचे प्राणी या सजीव सृष्टीमध्ये आहेत. मानवाला त्या प्राण्यांचा खूप उपयोग होत असतो. काही बाबतीत माणसाला प्राण्यांवर अवलंबून रहावेच लागते. काही प्राणी घरातील सदस्य असल्यासारखे असतात. प्राणी हे माणसाचे मित्र आहेत त्यामुळे माणसाने त्याच्याशी मित्रत्वाने वागले पाहिजे तरच ते सुद्धा आपल्यावर प्रेम करतील.
माझा आवडता प्राणी कुत्रा आहे. कुत्रा हा पाळीव प्राणी माणसाचा मित्र म्हणून जास्त ओळखला जातो. आजकाल सगळ्यांच्या घरात कुत्रा आहे प्राणी अगदी घरातला सदस्य असल्यासारखा झाला आहे. कुत्रा पाळण्यामध्ये माणसाचा कोणता ना कोणता स्वार्थ दडलेला असतोच. माणसाला सोबत करायला, घराची राखण करायला, करमणूक म्ह्णून कुत्रा पळाला जातो. आपल्या थोड्या प्रेमाने सुद्धा कुत्रा आपल्यात नियंत्रणात येतो. तो मालक सांगेल तसे वागतो. आपण त्याच्यावर करत आलेल्या प्रेमामुळे काही दिवसातच तो आपल्या कुटुंबाचा भाग होऊन जातो आपल्या प्रेमळ इशाऱ्यांना तो लगेच समजतो आणि त्याप्रमाणे कृती करतो. आपण त्याला आपल्याजवळ बोलावले तर क्षणाचाही लावता अगदी तत्परतेने ते आपल्याकडे येतो आणि त्याला जायला सांगितले तर तो लगेच तिथून बाजूला होतो. इतका कुत्रा हा आज्ञाधारक आहे. उगाचच नाही कुत्र्याला इमानदार प्राणी म्हणत. कुत्रा हा आपल्या मालकाशी एकनिष्ठ असतो. कुत्रा हा अतिशय प्रामाणिक प्राणी आहे. जेव्हा कुत्र्याचा मालक बाहेरून दमून घरी येतो तेव्हा कुत्रा लाडिकपणे शेपटी हलवून मालकाचे जणू स्वागतच करतो. चांगल्या आणि वाईट गोष्टीची कमी वेळात पारख करण्यात कुत्रा हा तरबेज असतो.
आज जगात कुत्र्याच्या अनेक जाती आहेत. आज विविध भागामध्ये अनेक प्रकारच्या जातीचे कुत्रे दिसून येतात. त्यांचे रंग,रूप, आकार, वजन, केसांची लांबी, मऊपणा, नाक कान यांची ठेवणं, कानांची लांबी, स्वभाव इ. वेगवेगळे असतात. कोणत्या जातीचा कुत्रा हा लांब, तर कोणत्या जातीचा मोठा असतो. काही कुत्रे मांजराएवढे छोटे तर काही खूपच मोठे असतात. कुत्रे काळे, राखाडी, मातेरी रंगाचे असतात. जगात सर्व कुत्र्याच्या जातीची संख्या चारशेच्या आसपास असावी असा अंदाज आहे.
कुत्र्याचे तऱ्हेतरेचे उपयोग माणसाला आहेत जसे कि शिकारीसाठी कुत्र्यांचा बऱ्याच प्रकारे उपयोग होतो. कुत्रे हे वासावरून शिकार करण्यात हुशार असतात. कुट्याचे घ्राणेंद्रिये तीक्ष्ण असल्यामुळे विशेष शोधण्यासाठी चांगला उपयोग होतो. अशा रीतीने कुत्रे गुन्हेगाराचा पोलिसांना मग काढून देण्यात मदत करतात. मालमत्तेच्या रक्षणाकरिता राखणदार म्हणून त्यांचा उपयोग होतो. या कमी अल्सेशिअन, डॉबरमन या जाती उपयोगी पडतात.
आम्ही आमच्या गावाला कुत्रा पळाला आहे तो डॉबरमन जातीचा आहे. या जातीतील कुत्र्यांना शेपूट नसते, त्यांचे कान उभे असतात. ते जास्त करून लाल आणि काळ्या रंगात असतात. ते फारच चंचल असतात. आम्ही त्याचे नाव रॉकी ठेवले आहे. आमच्या घरातील तो सर्वांचा लाडका आहे. त्याची आणि माझी खूप चांगली मैत्री आहे आणि तो माझे सर्व काही हुशार आहे, आपण बोललेले त्याला सर्व समजते. जर मी त्याला शेक हॅन्ड असे म्हणले तर तो लगेच आपल्या पुढील पायाचा पंजा माझ्या हातात देतो आणि हस्तांदोलन करतो. रॉकी माझ्यासोबत खूप खेळतो, त्याला बाहेर घेऊन जावे लागते जसे त्याची रोज अंघोळ करावी लागते, रोज त्याला जेवण द्यावे लगे, तो त्याला बाहेर फिरायला न्यावे लागते आणि अजून खूप काळजी ठेवावी लागते. रोख्या मुळे आम्हाला घरात अजिबात कंटाळा येत नाही. कारण त्याची आमच्यासोबत सतत मस्ती चालू असते. आम्ही ट्रिप ला जाताना सुद्धा त्याला घेऊन जातो. समाज बाहेर कुठे जायची वेळ अली तर घरी त्याच्यासोबत कोणीतरी थांबते. आम्ही रॉकी ला कधीही एकटे सोडत नाही. आमच्या रॉकी चा आवाज खूप मोठा आहे. आमचा सगळं परिसर आवाजाने हादरून जातो. चोऱ्यामाऱ्या होण्याची शक्यताही खूपच कमी असते. आमच्या शेजारच्यांनाही रॉकी ची सवय झाली आहे.
कुत्रा म्हणले कि आपल्याला इमानदार आणि वफादार हि गोष्ट आपल्याला शिकायला मिळते कारण प्राण्यांपेक्षा इमानदार जास्त कोणीच नसते. आपण प्राण्यांचा आदर करायला हवा, आजकाल खूप सारे लोक प्राण्यांचे हाल करतात, त्यांना त्रास देतात तर ते पूर्णपणे चुकीचे आहे कारण ते आपले नाव घेत नाहीतर असे नाही कि आपण त्याचा फायदा उचलायला हवा. कारण त्या प्राण्याला जर आपण जीव लावला तर तो आपल्यासाठी जीव सुद्धा द्यायला तयार होऊन जातो. आपण कुत्रा दिसला कि त्याला दगड मारतो, त्याला हानी पोहोचेल अस काहीतरी करतो. असे ना करता आपण त्यांना खायला काहीतरी दिले पाहिजे.

माझा आवडता प्राणी गाय मराठी निबंध
Essay on my favourite animal Cow in Marathi

Essay on My Favourite Animal Cow in Marathi
माझा आवडता प्राणी मराठी निबंध । माझा आवडता प्राणी गाय-मराठी निबंध । Essay on my favourite animal Cow in Marathi

आपल्या शास्त्रात गायींना आईचा दर्जा दिला जातो. गायी या उपासना करण्यायोग्य मानल्या जातात. म्हणूनच भारतीय घरामध्ये पहिली भाकरी गोमातेला दिली जाते. प्राचीन काली, खेड्यांमध्ये गायींच्या संख्येने भरभराटीचे मूल्यांकन केले जाते. गायींचा उगम हा समुद्र मंथनातून झाला अशी मान्यता आहे. जेव्हा महादेव समुद्र मंथन करत होते तेव्हा गायीचा जन्म झाला. आपल्या पुराणात गायींच्या वैभवाचेही वर्णन केले आहे. पुराणात असे नमूद केले आहे कि माता कामधेनू सागर मंथनातून प्रकट झाली. कामधेनूला सुरभी असे नाव लावले होते. ब्रम्हदेव कामधेनूला जगात घेऊन गेले आणि मग ते लोकहितासाठी ऋषींच्या ताब्यात देण्यात आले.
गायीचे दूध खूप पौष्टिक असते. अगदी नवजात बाळाला, ज्याला काहीही ख्याल निषिद्ध आहे, त्याला गाईचे दूध देखील दिले जाते. बाल्यावस्थेत असल्यापासून ते वृद्धावस्तेपर्यंत सर्व गटातील लोकांनी गायीच्या दुधाचे सेवन केले पाहिजे. हे आपल्याला बऱ्याच रोगांशी तर विशेषतः गायीच्या दुधाचे सेवन केले पाहिजे. दुधात बरेच उपयुक्त मूल्ये असतात जसे कि, जीवनसत्वे, मूलद्रव्ये, प्रथिने शिवाय गायीचे शेणही तितकेच उपयुक्त आहे. शेणाचे अनेक औषधी उपयोग आहेत जसे कि, झाड, मनुष्य आणि इतर प्रयोजनासाठी फारच उपयोगी आहे. हे एक पवित्र वास्तूच्या रूपात मानले जाते आणि हिंदू धर्मात पूजा आणि कथा करताना याचा वापर केला जातो. गायीचे पंचगव्य म्हणजेच गोमूत्र, शेण, दूध, तूप आणि दही या गायीपासून मिळणाऱ्या पाच वस्तूंचे फायदे आणि उपयुक्तता यांवर अधिक संशोधन केले जात आहेत. गायीचे शेण हे गंधक, सोडिअम, मँगनीज, झिंक, फॉस्फरस, नायट्रोजन यांसारख्या तत्त्वांनी परिपूर्ण असून, हे केवळ खात म्हणून नव्हे तर औषधी म्हणूनही फायद्याचे आहे. जर काम करत असताना अचानक भाजले तर त्यावर गायीचे शेण हे रामबाण इलाज ठरते. त्याचबरोबर पाय मुरगळला, त्यावर सूज अली, किंवा पडल्यामुळे शरीरावर एखाद्या ठिकाणी मुका मर लागलं तर गाईचे शेण एक कपड्यामध्ये बांधून त्याची पुरचुंडी तयार करावी आणि हि पुरचुंडी तव्यावर गरम करून मुका कर लागलं आहे त्या ठिकाणी शेक घ्यावा. याने सूजही कमी येते आहे आरामही मिळतो.
गाय बारा महिन्यानंतर एक लहान वासराला जन्माला घालते. गाय आपल्या वासरूला चालणे आणि धावणे शिकवत नाही ते आपोआपच स्वतःच चालू आणि धावू लागते. वासरू काही महिन्यांपर्यंत तिंचे दूध पितो नंतर गायीसारखे जेवण करणे सुरु करतो. गाय सर्व हिंदूंसाठी एक पवित्र पशु आहे.
गायीचा स्वभाव खूप शांत असतो. गायीला चार पाय, दोन डोळे आणि एक शेपूट असते. तसेच दोन कान, एक नाक असत. गाय विभिन्न रांगांमध्ये आणि आकारामध्ये आढळून येते. गायी हा प्राणी सर्व ठिकाणी दिसतो. वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या जातीच्या गायी आढळतात. गायीच्या शरीराचा आकार खूप मोठा असतो.गायीच्या पिल्लाना वासरू किंवा पाडस म्हणले जाते.गाय या प्राण्याला गोठ्यात ठेवले जाते. नेहमी हवेशीर ठेवण्याची कामे शेतकरी करतो. गायीच्या बचावासाठी दोन शिंगे असतात. शिंगाचेही आकार वेगवेगळे असतात. गाय आपल्या झुपकेदार शेपटीचा उपयोग अंगावर बसणाऱ्या माश्या उडविण्यासाठी केला जातो. गायी ला खूप काही वेगळा आहार लागत नाही. गायीचा मुख्य आहार गावात आणि चारा आहे. त्याचप्रमाणे काही लोक हे गायीला कोंडासुद्धा खायला देतात. तसेच गाय हि तृणधान्ये आणि इतर पदार्थांचेही सेवन करते.
गायीच्या अनेक जाती असतात. पण भारत देशातील मुख्य म्हणजे साहिवाल. साहिवाल हि गाय पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश व बिहार इथे आढळते. गीर गाय दक्षिण काठियावार तसेच विदेशातील जातीमध्ये जर्सी गाय हि सर्वात लोकप्रिय आहे. जर्सी गाय इतर गायींपेक्षा जास्ती दूध देते. भारतीय गाय हि लहान असते तर परदेशी गायीचे शरीर हे वजनदार असते.
वर्तमान काळात गोहत्येचे प्रमाण अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अलीकडे काही लोक गायीची हत्या करून गायीचे मांस खाऊ लागले आहेत. लालसेपोटी तिची हत्या केली जाते. तिच्या मांसाला बीफ म्हणतात. मेल्यानंतर गायीच्या हाडांचा उपयोग केला जातो. त्यापासून वेगवेगळ्या शिल्पकला आणि आकृत्या बनवल्या जातात.
आपल्या सर्वांच्या जीवनात गायीला खूप महत्व आहे. आपण सर्वांनी गायीचा सम्मान केला पाहिजे. तसेच तिला कोणतीही दुखापत होईल असे आपण काही नाही केले पाहिजे. तिची काळजी घेतली पाहिजे. आपल्या भारत देशात उगीचच गायीला आईचा दर्जा नाही दिलेला त्यामागे कारण आहे. आई जशी निस्वार्थपणे आपल्या बाळाला काही ना काही देत असते तसेच गायी सुद्धा आपल्याला सतत काही ना काही देत असते. आपल्या देशात गायी ला गोमाता म्हणातात. गायीपासून आपण खूप काही शिकू शकतो जसे कि, गाय सर्वाना सारखे समजून प्रेम देते. कोणताही दुजाभाव करत नाही.

आशा आहे तुम्हाला माझा आवडता प्राणी मराठी निबंध आवडला असेल. जर आपल्याला एखाद्या विषयावर निबंध हवा असेल तर खाली कमेंट मध्ये निबंधाचा विषय सुचवू शकता. तसेच माझा आवडता प्राणी मराठी निबंध कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्कीच सांगू शकता तसेच आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका.

इतर विषयांवरील निबंध आणि भाषणे :

१. शिक्षक दिन भाषण (Teachers Day Speech in Marathi)

२. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मराठी निबंध (Best: Independence Day Essay in Marathi)

३. निबंध: कोरोना महामारी (Corona Essay in Marathi)

४. छत्रपती शिवाजी महाराज माहिती मराठी मध्ये

५. पावसाळा निबंध मराठीमध्ये (Essay on Rainy Season in Marathi)

६. निबंध: रंगपंचमी (रंगपंचमी Essay in मराठी)

Rate this post

Chetan Jasud

मी एक पूर्ण-वेळ डिजिटल मार्केटर आणि अर्धवेळ ब्लॉगर आहे ज्याला लिहायची, प्रवासाची तसेच या टेकनॉलॉजीच्या युगात अपडेटेड राहायची आवड आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *