दिवाळी निबंध मराठी मध्ये Best Essay on Diwali in Marathi

दिवाळी निबंध मराठी मध्ये Best Essay on Diwali in Marathi

जर तुम्ही दिवाळी निबंध मराठीमध्ये । Diwali Essay in Marathi । Essay on Diwali in Marathi शोधत असाल तर अगदी योग्य ठिकाणी आला आहात. या पोस्ट मध्ये आपण दिवाळी निबंध मराठी मध्ये अगदी योग्य शब्दात पहाणार आहोत. Essay on Diwali in Marathi सोबत इतरही निबंध वाचायला विसरू नका. दिवाळी हा भारतातील प्रमुख सणांपैकी असल्याने शाळेमध्ये आपल्याला हमखास यावर निबंध परीक्षेमध्ये विचारला जातो. सोबत इतर निबंध स्पर्धांमध्ये हा विषय हमखास असतोच. यासाठी तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत दिवाळी या भारतीय सणावर मराठीत निबंध (Diwali Nibandh in Marathi)

दिवाळी निबंध मराठी मध्ये ।
Essay on Diwali in Marathi
(जास्त शब्दांमध्ये)

दिवाळी निबंध मराठी मध्ये । Diwali Essay in Marathi | Diwali Nibandh in Marathi
दिवाळी निबंध मराठी मध्ये | Essay on Diwali in Marathi | Diwali Nibandh in Marathi

आपला भारत देश हा सणांचा देश आहे आणि प्रत्येक समाज सण आणि उत्सवांच्या निमित्ताने एकत्र येऊन आपला आनंद व्यक्त करतो. दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा सण आहे. दिवाळी हा शब्द संस्कृत भाषेतून घेतला गेला आहे. ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात दिवाळी साजरी केली जाते. तसे पहायला गेले तर दसऱ्यापासूनच घराघरात दिवाळीची तयारी सुरु होत असते. दिवाळी पूर्ण भारतभर मोठ्या दिमाखात आणि थाटामाटात साजरी केली जाते. दिवाळीमध्ये लोकांमध्ये खूप उत्साह संचारतो. पण दिवाळी केवळ भारतातच साजरी होते असे काही नाही तर भारताबाहेरही साजरी केली जाते. भारताबाहेर राहणाऱ्या भारतीय लोकांमुळे दिवाळी भारताबाहेरही प्रसिद्ध आहे. दिवाळीसंदर्भात असलेल्या गमतीदार माहितीने पुराणात तसेच इतिहासात आपले स्थान निर्माण केले आहे. म्हणूनच हा सण एखाद्या विशिष्ट समूहाचा ना राहता संपूर्ण राष्ट्राचा बनला. दिवाळी विषयी बऱ्याच गमतीजमती आहेत. दिवाळी हा सण साजरा करण्यामागे बरीच करणे आहेत जी हिंदू पुराणांमध्ये तसेच इतर साहित्यातही आहे.

प्रभू रामचंद्रांनी रावणाचा पराभव केल्यानंतर अयोध्येला परतत असताना त्यांच्या वाटेवर लोकांनी दिवे लावून स्वागत केल्याचे त्रेतायुगात सांगितले आहे. श्रीकृष्णाने अत्याचारी नरकासुराचा वाढ केल्यानंतर गोकुळवासियांनी आपला आनंद दिवे लावून व्यक्त केल्याची कथा प्रचलित आहे. दिवाळीच्या एक दिवस अगोदर म्हणजे चतुर्थीला श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता. यामुळे दुसऱ्या दिवशी गोकुळवासियांनी दिवे लावून आनंद साजरा केला होता.

देवीने महाकालीचे रूप धारण करून राक्षसाचा वध केला होता. त्याचा वध केल्यानंतरही महाकालीचा क्रोध कमी झाला नव्हता, तेव्हा भगवान श्री शंकराने स्वतः देवीच्या चरणी लोटांगण घातले. तेव्हा महाकालीचा राग शांत झाला होता. त्याची आठवण म्हणून लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी तिच्या रौद्ररूपाची पूजा करण्याची प्रथा आहे.

बळीराजाने आपल्या पराक्रमाच्या जोरावर त्रिलोकात विजय मिळवला होता. या विजयाने भयभीत झालेल्या देवांनी भगवान विष्णूची प्रार्थना केली. त्यांची प्रार्थना ऐकून वीसहून वामन रूप धारण करून बळी राजाला तीन पायात दान मागितले. विष्णूने तीन पायाने त्रिलोक घेतले. बळीच्या दानशूरपणा मुळे प्रसन्न झालेल्या वीसहून त्याला पाटलाचे राज्य देऊन भू-लोकवासी त्याची आठवणीनिमित्त प्रत्येक वर्षी दिवाळी साजरी करतील असे आश्वासन दिले.

शिखांचे सहावे गुरु हरगोविंदसिंग बादशाह जहांगीरच्या कैदेतून सुटून कार्तिक अमावास्येच्या दिवशी अमृतसरला आले होते. त्यामुळे शिख लोकही हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. अमृतसर येथील सुवर्णमंदिराचे बांधकाम दिवाळीच्या दिवशी सुरू झाले होते.
इसवी सन पूर्व ५०० वर्षांपूर्वी मोहेंजोदडो येथे सापडलेल्या अवशेषांमध्ये एका मातीच्या मूर्तीनुसार त्याकाळी दिवाळी साजरी केली जात असल्याचे समजले जाते. मूर्तीच्या दोन्ही बाजूला दिवे जळत असावेत असे दिसून आले आहे. इसवी सन पूर्व २५०० वर्षांपूर्वी गौतम बुद्धांच्या अनुयायांनी त्यांच्या स्वागतासाठी लाखो दिवे लावून दिवाळी साजरी केली होती अशी आख्यायिका आहे. त्यामुळे बौद्ध धर्मात या दिवाळीला खूप महत्व आहे. इसवी सन पूर्व चौथ्या शतकातील कौटिल्य म्हणजेच चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळातील चाणक्य यांच्या अर्थशास्त्रानुसार कार्तिक अमावस्येच्या दिवशी मंदिरात आणि घाटावर म्हणजेच नदी किनारी मोठ्या प्रमाणात दिवे लावले जात.

दिवाळी निबंध मराठी । Essay on Diwali in Marathi | Diwali Nibandh in Marathi । Diwali Crackers
दिवाळी निबंध मराठी । Essay on Diwali in Marathi | Diwali Nibandh in Marathi

सम्राट विक्रमादित्य या राजाचा राज्याभिषेक दिवाळीच्या दिवशी झाला होता. त्याच दिवशी तेथील प्रजेने खूप मोठ्या प्रमाणात दिव्यांची रोषणाई राज्यभर केली होती. प्रजेने दिवे लावून आपला आनंद व्यक्त केला होता.जैन धर्माचे चोविसावे तीर्थंकर भगवान महावीर यांनी दिवाळीच्या दिवशीच बिहारमधील पावापुरी येथे आपल्या शरीराचा त्याग केला होता. ‘महावीर संवत’ त्यांच्या दुसऱ्या दिवशी सुरु होते. त्यामुळे अनेक प्रांतातील लोक याला नवीन वर्षाची सुरुवात मानतात. प्राचीन जैन ग्रंथात दीपोत्सवाचे वर्णन आहे. महावीर निर्वाणामुळे जी अंतरज्योती कायमची विझून गेली होती, तिची कमतरता पूर्ण करण्यासाठी आपण बहिर्ज्योतीचे प्रतीक म्हणून दिवे लावू या असे कल्पसूत्रात सांगितले आहे.

पंजाबमध्ये जन्मलेल्या स्वामी रामतीर्थ आणि महाप्रयाण या दोघांचा जन्म दिवाळीच्या दिवशी झाला होता. त्यांनी दिवाळीच्या दिवशी गंगाकिनारी स्नान करताना ‘ओम’ म्हणून समाधी घेतली होती. महर्षी दयानंद यांनी दिवाळीच्या दिवशीच अजमेर जवळ समाधी घेतली होती. त्यांनी आर्य समाजाची स्थापना केली होती, मोगल सम्राट अकबराच्या काळात दौलतखान्यात ४० गज उंच बांबूवर एक मोठा आकाशकंदील लटकविला जात असे. यावेळी बादशहा देखील दिवाळी मोठ्या आनंदाने साजरी करत असे. मोगल वंशाचे शेवटचे सम्राट बहादूरशहा जफर दिवाळी सणाच्या रूपात साजरी करत असत आणि यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होत असत. शाह आलम दुसरा याच्या काळात संपूर्ण शाही महाल दिव्यांनी सजविला जात असे आणि लाल किल्ल्यावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात हिंदू-मुसलमान सहभागी होत असत.

दिवाळी या सणाचे मूळचे नाव ‘यक्षरात्री’ असे होते हे हेमचंद्राने नोंदवले आहे, तसेच वात्साययनाच्या कामसूत्रात हेच नाव नोंदलेले आहे. ‘नीलमत’ या ग्रंथात या सणाला “दीपमाला” असे म्हटले आहे. कनोजचा राजा हर्षवर्धन याने नागानंद या नाटकात या सणाला “दीपप्रतिपादूत्सव” असे नाव दिले आहे. ज्योतिषरत्नमाला या ग्रंथात “दिवाळी” हा शब्द वापरला आहे. भविष्योत्तर पुराणात दिवाळीला “दिपालीका” म्हटले आहे, तसेच कालविवेक या ग्रंथात तिचा उल्लेख “सुखरात्रि” असा येतो. व्रत प्रकाश नावाच्या ग्रंथात “सुख सुप्तिका” म्हणून दिवाळी ओळखली जाते.

दिवाळी आल्याचा निसर्गाला बरोबर कस काय कळतं? कसा हलकेच हवेत गारवा येतो? चोरपावलांनी हळूच मागे येऊन डोळे झाकत मिठी घालणाऱ्या सखीसारखी थंडी बरोबर पहाटे कशी आपल्या दुलईत शिरते? दसऱ्याच्या आधी नदीवर धुवून वाळवलेल्या गोधडीसारखी सगळी झाडं- पान -फुलं एकदम अशी हिरवी स्वच्छ दिसू लागतात कशी? निसर्गात दिवाळी आधी येते आणि मग ती हळूच आपल्या तनामनात उतरते, हे खरं . आपले सगळे सण निसर्गाशी नातं जोडून आहेत. म्हणूनच तर चार महिने दंगा घालणारा पाऊस हलके हलके एक्झिट घेतो आणि थंडीचे आगमन होते. दसऱ्यानिमित्त घरातील जळमटे निघालेले असतात. कोपरा कोपरा साफ झालेला असतो. पंख्यावरची, कपाटावरची धूळ झटकलेली असते.

दिवाळीनिमित्त बाजारही रंगलेला असतो. मग सुखाची साधनं घरात येतात. सर्वांच्या चेहऱ्यावर एक नवीन येत . सारा आसमंत या उत्साहात न्हाऊन जातो. घरासमोर टांगलेला आकाश कंदील, पणत्यांची रांग, फुलबाज्या, भुईचक्र, मुख्य प्रवेशद्वाराच्या चौकटीला लावलेला आंब्याच्या पानाचे आणि झेंडूच्या फुलाचे तोरण, दारासमोर मोठमोठ्याल्या रांगोळ्या हे सगळे पहिले कि दिवाळीला सर्व सणांची राणी का म्हणतात हे समजत. मुलं घरासमोर मातीचे छोटे-छोटे किल्ले बांधतात. घरात लाडू, करंज्या, चकल्या, चिवडा यांचा घमघमाट सुटलेला असतो. मिठाईचे डब्बे घरी येतात.

आपला देश हा कृषीप्रधान देश. आपली संस्कृती सुद्धा सर्वांवर प्रेम करायला शिकवणारी. म्हणूनच कि काय वसुबारस या दिवशी आपण गाय आणि वासरू यांची पूजा करतो. त्यांना गोडाचा घास खाऊ घालतो. दूध-दुभत्यासाठी होणार गायीचा उपयोग शेतीच्या कमी बैलाची होणारी मदत या गोष्टी लक्षात घेऊन त्या गोधनाची कृतज्ञतेने केलेली ही पूजा. धनत्रयोदशीला तिन्हीसांजेला केली जाणारी धनाची पूजा, नैवेद्याला ठेवला जाणा धने-गुळाचा प्रसाद याला ही फार मोठे महत्व आहे. याच दिवशी एक दिवा तयार करून तो यमदेवतेसाठी लावेल जातो. दक्षिण दिशा ही यमाची दिशा म्हणून त्या दिवशी त्या दिव्याची ज्योत ही दक्षिणेला केली जाते. नरकचतुर्दशी हा मुख्य दिवाळीचा पहिला दिवस. या दिवशी पहाटे उठून उटणे,सुगंधी तेल लावून मोठी साबणाने स्नान करायचे. नवीन कपडे घालून देवदर्शन घ्यायचे आणि सर्वांनी एकत्र मिळून केलेला फराळ खायचा. घरातील सोने नाणे, रोकड यांची पूजा केली जाते. या धनलक्ष्मीच्या पूजनाबरोबरच त्या दिवशी आरोग्य लक्ष्मी (केरसुणी) हिची पण पूजा करतात. लक्ष्मी पूजनानंतर फटाक्यांची आतषबाजी केली जाते.

दिवाळी निबंध मराठी । Essay on Diwali in Marathi | Diwali Nibandh in Marathi
दिवाळी निबंध मराठी । Essay on Diwali in Marathi | Diwali Nibandh in Marathi

पाडवा म्हणजे बलिप्रतिपदा, साडेतीन मुहुर्तातला एक मुहुर्त. या दिवशी अनेक नवे प्रकल्प चालू केले जातात. पाडव्याच्या दिवशी पत्नी पतीला ओवाळते. पती पत्नीला पाडव्याची भेट म्हणून वस्तू, दागिना, साडी भेट करतो. कार्तिक सुद्धा द्वितीयेला यमद्वितीया किंवा भाऊबीज असे म्हणतात. बहीण भावाच्या उत्कट प्रेमाचा हा दिवस, बहीण भावाला स्नान घालते, गोड भोजन देते, ओवाळते आणि भाऊ बहिणीला ओवाळणी घालतो.

अशाप्रकारे दिवाळीचे तीन ते चार दिवस अगदी मजेत जातात. शाळेलाही सुट्टी असल्याने मुलेही खूप आनंदी असतात पण त्यांना शाळेच्या अभ्यासापासून सुटका मिळत नाही कारण दिवाळी चा गृहपाठ शाळेने दिलेला असतो त्यामुळे सुट्टी असली तरी अभ्यास हा करावाच लागतो. मग थोडा वेळ खेळ, थोडा अभ्यास, थोडा आराम करत दिवस जातो. काही मुले गावी जाऊन या सणाचा आनंद घेतात. रानावनात जाऊन हा दिवस सर्व परिवारासोबत साजरा करतात. गावाकडे सगळी भावंडे वर्षातून एकदा भेटतात. घरातील वातावरण उत्साहाचे असते. सारे मिळून फराळ खातात. तसेच लांब असलेल्या नातेवाईकांना भेटवस्तू, शुभेच्छा पात्र इ. देऊन आनंद व्यक्त केला जातो. घरोघरी फराळाचे डबे भरून दिले जातात. अशाप्रकारे आनंद एकमेकांना वाटला जातो.

आजकाल सगळ्यांनी गावाला एकत्र येऊन दिवाळी प्रमाण तसे कमी आले आहे. त्याऐवजी लोक आता पर्यटनस्थळी दिली साजरी करतात.शहरातल्या गजबजाटापासून दूर जावसं वाटतं आणि निसर्गाच्या सान्निध्यात गेल्यावरच दिवाळी वाटणं, हे स्वाभाविकच आहे. नातलग एकत्र येण्याचा प्रमाण शहरात तरी कमी होत चालल आहे त्यामुळे पूर्वीसारखी रंगत पाहायला मिळत नाही. दिवाळी साजरी करायची पद्धत बदलत चालली आहे. आजकाल बाजारात हवे ते पदार्थ वर्षभर उपलब्ध असतात त्यामुळे दिवाळीच्या वेळीच ते पदार्थ खाण्याच अस काही अप्रूप राहत नाही. पूर्वी नवीन कपडे घेण्यासाठी दिवाळीची वाट पाहावी लागायची तशी आता पहिली जात नाही. कधीही शॉपिंग करून आपण ते घेऊ शकतो.

अज्ञानाचा नाश आणि ज्ञानाचा प्रकाश देणारी ही दिवाळी सर्वांना प्रिय आहे. तो तो आपापल्या परीने ती साजरी करतो आणि आनंद लुटतो. दिवाळी म्हणजे परमोच्च सुखाचा अत्यंत आनंदी सण. सुखद दीपावलीच्या अनेक आठवणी पुढे अनेक दिवस मनात रेंगाळत राहतात.

आशा आहे की दिवाळी निबंध मराठी मध्ये । Essay on Diwali in Marathi | Diwali Nibandh in Marathi तुम्हाला नक्की आवडला असेल. या निबंधा सोबत खालील निबंध वाचायला विसरू नका.

इतर विषयांवरील निबंध आणि भाषणे :

१. शिक्षक दिन भाषण (Teachers Day Speech in Marathi)

२. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मराठी निबंध (Best: Independence Day Essay in Marathi)

३. निबंध: कोरोना महामारी (Corona Essay in Marathi)

४. छत्रपती शिवाजी महाराज माहिती मराठी मध्ये

५. पावसाळा निबंध मराठीमध्ये (Essay on Rainy Season in Marathi)

६. निबंध: रंगपंचमी (रंगपंचमी Essay in मराठी)

७. माझा आवडता प्राणी मराठी निबंध Best Essay on my favourite animal in Marathi

८. माझी आई निबंध मराठी (Top 3 Essay on my mother in Marathi)

९. माझी शाळा निबंध मराठी (Best My School Essay in Marathi for Class 6 to 9)

इतर

मराठी भाषण कसे करावे? मराठी भाषणासाठी लागणाऱ्या 11 महत्वाच्या टिप्स!..

Rate this post

Chetan Jasud

मी एक पूर्ण-वेळ डिजिटल मार्केटर आणि अर्धवेळ ब्लॉगर आहे ज्याला लिहायची, प्रवासाची तसेच या टेकनॉलॉजीच्या युगात अपडेटेड राहायची आवड आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *