शिक्षक दिन भाषण (Teachers Day Speech in Marathi)

शिक्षक दिन भाषण (Teachers Day Speech in Marathi)

शिक्षक दिनानिमित्त भाषण (Teachers Day Speech in Marathi)

प्रस्तावना: भारतात शिक्षक दिन दरवर्षी ५ सप्टेंबर या दिवशी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्म दिनानिमित्त या दिवशी शिक्षकांप्रती असणारा आदर व्यक्त केला जातो . हा दिवस साजरा करण्यासाठी विद्यालयांमध्ये शिक्षक दिन भाषण तसेच निबंध स्पर्धा देखील आयोजित केल्या जातात.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन कोण होते?

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि त्यांनतर दुसरे राष्ट्रपती होते. उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती होण्यापूर्वी ते एक विद्वान, तत्त्वज्ञ आणि विसाव्या शतकातील भारतातील नामांकित शिक्षक होते. तसेच भारत सरकारने राधाकृष्णन यांना भारत रत्न देऊन सन्मानित केले आहे. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ या दिवशी झाला होता. यांच्या जयंतीनिमित्त भारतात दरवर्षी ५ सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.

Teachers Day Speech in Marathi (Speech 1)

Teachers Day Speech in Marathi
Teachers Day Speech in Marathi

आज ५ सप्टेंबर… शिक्षकांप्रति आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी मुलांना त्यांच्या आयुष्यातील शिक्षकांचे महत्व समजावून सांगितले . एक शिक्षक म्हणून त्यांनी खुप महत्वाचे कार्य करत त्यांचे संपूर्ण जीवन वाहिले म्हणून त्यांचा जयंती दिवस शिक्षक दिवस म्हणून साजरा केला जातो. इथपर्यंत अशी भाषणाची सुरूवात असायची, ती उमेद, तो साहसीपणा दिला कुणी? इतका आत्मविश्वास आला कुठून? समोर मुलांची इतकी गर्दी असुन तिला न घाबरता आपले विचार जे चारचौघात मांडतो तेच जेव्हा समोर जनसमुदाय असतो तिथे व्यक्त करण्यासाठी व्यासपीठावरती उभं राहणं, उठावदार शब्दात समोरच्याला गुंतवून ठेवणं आणि आठवणीत राहील असा भाषणाचा गोड शेवट करणं आणि मग त्या कौतुकाच्या टाळ्यांचा कानात गुंजनारा आवाज हा प्रवास सुद्धा शिक्षकांच्या ठाम पाठिंब्याने पार पडला. त्यांनी तयारीच तशी करून घेतली आणि सगळं घडलही तसंच.

एका यशस्वी व्यक्ती मागे पाया भक्कम करायला जर कुणी जबाबदार असेल तर ती व्यक्ती शिक्षक च आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास जर साधायचा असेल तर त्यांच्या निर्गुणाला सांधण्याचं काम एक शिक्षकच करतो. इमारत जरी कितीही गगनचुंबी असली तरी त्याचा पाया भक्कम असनं गरजेचं असतं आणि मुळं जेंव्हा घट्ट रोवून बसतील तेंव्हाच येणाऱ्या प्रत्येक वादळांना सामोरं जायची ताकद असते अगदी तशीच शिकवण शिक्षकांची असते विदयार्थी घडवण्यात.

जशी भावना आज आपल्या मनात असते तोच आदरभाव, प्रेम, कृतज्ञता पदोपदी आठवायला हवी कारण शिक्षक एकमेव व्यक्ती अशी आहे जी स्वतः आहे तिथंच थांबते आणि विद्यर्थ्याला मोलाचं ध्येयासाठी मार्गदर्शन करते आपले आयुष्य योग्य मार्गदर्शनाशिवाय अर्थहीन, अपूर्ण आहे म्हणून शिक्षकाना अनन्यसाधारण महत्व आहे. आपल्याला अनमोल मार्गदर्शन करणाऱ्या, आकार, उकार, वेलांटी समजावून सांगून अल्पविराम व पूर्णविराम याचं आयुष्यात महत्व सांगणाऱ्या शिक्षकांना माझी शब्दपुष्पांजली आणि वंदन. जीवनात जेंव्हा अल्पविराम येतो तेव्हा पुन्हा भरारी मारायला शिकवणारे आणि पूर्णविराम येतो अस वाटत तेव्हा आत्मविश्वास वाढवणारे माझे आदरणीय शिक्षक.

Speech for Teachers Day in Marathi
Teachers Day Speech in Marathi

एक शिल्पकार जसे घाव घालतो सुंदर मूर्ती साकारण्यासाठी अगदी तसंच एक उत्तम नागरीक व माणुसकीची जिवंत मूर्ती घडवण्याचं काम शिक्षक करतात. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जग उध्दारी असं म्हणतात हो ते खरय आणि आई हा पहिला गुरू असतेच की सगळं व्यवहार ज्ञान तीच तर शिकवते .अगदी तसच बाहेरच्या जगात बिथरून न जाता प्रबळ इच्छाशक्ती, आत्मविश्वासाने जगाला सामोरं जाण्याची कला शिकवतं कोण? शाळेतले शिक्षकच ना! देशाला घडवण्यात, देशाची प्रगती करण्यात मोलाचा वाटा कोणाचा असेलच तर तो पहिले शिक्षकांचा आहे कारण देशभक्ती, सुवर्ण इतिहास, आदर्श अर्थशास्त्र, सुंदर भौगोलिक प्रदेश, नागरिक हक्क इ .सगळं समजावून सांगतात ज्यामुळे आज ढोबळमानाने का होईना कोणतं ठिकाण कुठंय, बाजारातील नागरी हक्क, घरातलं बजेट, आणि जयंत्यांचं महत्त्व नक्कीच समजलंय आणि उमगलं पण !

अक्षर वाचनापासून ते माणुसकीची भावना वाचण्यापर्यंत आणि शब्दाक्षर गिरवण्यापासून ते देशभक्ती चे धडे गिरवण्याच्या प्रवासात मोठं कार्य जे अव्याहत पणे सुरू ठेवतात ते शिक्षक होत . सत्यात घडलेलं पुस्तकात मांडलेलं पुन्हा सत्यात उतरवून रंजकपणे समजणाऱ्या भाषेत जो व्यक्ती सांगू शकतो तो म्हणजे शिक्षक होय. ज्ञानाचं संततधार अस्तित्व म्हणजे शिक्षक होय. उज्वल देशाच्या उज्वल भविष्यासाठी उजाड माळरानावर शिक्षणाची धुरा सांभाळणारा संयमी धगधगता सूर्य म्हणजे शिक्षक होय आणि घडणारे सुजाण नागरिक म्हणजे माळराणावरची सुंदर फुले होय आपले अमुल्य योगदान देऊन अमुल्य वेळेची किंमत राखणारा एक उत्तम खेळाडू जो जीवनपटावर शांत आणि संयमाने खेळेल रचतो तो म्हणजे शिक्षक होय.

Speech for Teachers Day in Marathi (Speech 2)

आई जरी माझा प्रथम गुरु असली तरी माझ्या बौध्दिक आकलन क्षमतेच श्रेय हे सर्वस्वी माझ्या शिक्षकांचं आहे.आज या ठिकाणी उभा राहून बोलण्याच धाडस मला आजवरच्या प्रवासात भेटलेल्या माझ्या शिक्षकांचं आहे. त्यांच्या ज्ञानजोतीतून मिळणाऱ्या दिव्य प्रकाशामुळे आज माझ्या शब्दांना विचाराची धार आहे. इथून पाठीमागचा इतिहास नजरेखालून घातला तर आपल्याला दिसून येईल की प्रत्येक यशस्वी व्यक्तीचा कोणी ना कोणी गुरु आहे. तर असच एक नात होत छञपती शिवाजी महाराज आणि त्यांचे गुरु थोर संत तुकाराम महाराज यांच. त्यांच्या गुरु शिष्याच्या अलौकिक नात्याचा एक प्रसंग तुमच्यासमोर कथन करत आहे.

तर.. राजांच्या राज्याभिषेकाची तयारी चालली होती. गडावर धामधूम चालू होती. सर्व नामांकित सरदारांना मानाचे खलिते शिकामोर्तब उमटून स्वारांकडून रवाना करण्यात आले. पण राजांच्या मनात एक त्यांच्या जवळचं आणि मानाच आमंत्रण देन बाकी होत ते म्हणजे त्यांच्या गुरुंना म्हणजेच संत तुकाराम महाराजांना. राज्यांना स्वतः जाऊन आपल्या गुरुंचे मंगल प्रसंगी आशीर्वाद लाभवेत म्हणून मानाच आमंत्रण द्यायचं होत. राजांचा बेत पक्का झाला आणि राज्यांनी थेट आळंदी गाठली.

राजांची जेव्हा केव्हा जगतगुरूंशी भेट व्हायची तेव्हा त्यांचं मन प्रसन्न होत असे. त्यांच्या सर्व शंकांचे निरसन होत असे. राजांनी तुकाराम महाराजांचे दर्शन घेतले रायगडाहून आपण राज्याभिषेकाचे आमंत्रण देण्यासाठी आलो आहोत असे सांगितले. आणि या मंगल प्रसंगी तुमचे कृपा आशीर्वाद लाभावेत अशी विनंती केली.

Teachers Day Speech in Marath । Shikshak Din bhashan
Teachers Day Speech in Marathi । शिक्षक दिन भाषण

तेव्हा तुकाराम महाराज म्हणाले, राजे आमचे आशीर्वाद सदैव तुमच्या सोबत आहेतच मग सोबत चलण्याचा मोह का.? राजे उत्तरले, महाराज तुम्ही आमचे गुरुबंधू तुमच्या उपस्थिती शिवाय इतका मोठा मंगल प्रसंग कसा होईल. जगद्गुरु म्हणाले, राजे आमचं काम वाट चुकलेल्या एका वाटसरु च्या हातातील बत्तीसारख. त्याने आपल्या प्रकाशाच्या जोरावर आपल्या शिष्याच्या आयुष्यातील अंधार दूर करून प्रकाशाच्या वाटा उघडणं इतकच आहे.आज तुम्ही अभिशिक्त राजे होत आहात. तुम्ही रयतेच्या मनात तुमच्याविषयी एक प्रेमाचं आपुलकीचं नातं निर्माण केल आहे. तुमच्या राज्याभिषेकाचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून ओसांडून वाहत आहे. यावरूनच समजते की तुम्ही आजवर आम्ही शिकवलेली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक विचार आत्मसात केला आणि आचरणात आणला सुद्धा. इथेच आमचे गुरु पण सिद्ध झालं आम्ही धन्य झालो. आता तुम्हाला गरज आहे ती रयतेच्या प्रेमाची त्यांच्या तुमच्याप्रती असलेल्या विश्वासाची. राजे नेहमी लक्षात ठेवा, गुरूच्या अस्तित्व हे शिष्याच्या सोबत असंन नसतं तर गुरूच्या शिकवणीचा शिष्याने त्याच्या आयुष्यात सत्क्रमानसाठी केलेला वापर याच्यावर अवलंबून असतं.
यावरून राजे भरून पावले. त्यांच्या नेत्रकडा पानवल्या होत्या.राज्यांनी मनःपूर्वक गुरुंचे चरण स्पर्श केले आणि त्यांचा निरोप घेतला.
यावरून जाणवत की गुरूच्या ज्ञानाचा झरा हा वाऱ्यासारखा सदैव आपल्या सोबतच असतो. आणि जेव्हा केव्हा आपल्या आयुष्यात संकटे येतात तेव्हा याच ज्ञानाच्या जोरावर आपण त्यांच्यावर सहज मात करतो. तसं गुरूंविषयी बोलायला गेलं तर आयुष्य कमी पडेल शेवटी एवढंच म्हणेल की

ज्ञानप्रसारक, सहशोधक, प्रशिक्षक कृतीदर्शक कौशल्यदाता संस्कारदाता स्फूर्तिदाता समुपदेशक…. असतो तो फक्त एक गुरूच..
धन्यवाद….

इतर महत्वाच्या पोस्ट्स:

3.5/5 - (8 votes)

SwaRani

लिहण्याचा माझा छंद, जसा फुलातील मकरंद, लेखणीतून माझ्या उतरवते शब्दसुगंध !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *