माझी आई निबंध मराठी (Top 4 Essay on my mother in Marathi)

माझी आई निबंध मराठी (Top 4 Essay on my mother in Marathi)

‘माझी आई’ या शब्दातच किती गोडवा आहे ना? माझी आई या शब्दातच भावुकता, आत्मीयता निर्माण होते. आई म्हणजे आपल्या आयुष्यातील व्यक्ती असते. लहान पणापासून बाळाला सगळ्यात प्रिय आपली आई असते. अगदी आपल्या अस्तित्वाच्या ९ महिन्या अगोदर पासून आपली आई आपल्यावर अतूट प्रेम करत असते. अशाच आपल्या आयुष्यातील महत्वाच्या व्यक्तीवर आज आपण ‘माझी आई निबंध मराठी / Essay on my mother in marathi / majhi aai marathi nibandh‘ 3 पद्धतीने बघणार आहोत.

माझी आई निबंध मराठी (Essay on my mother in Marathi)

माझी आई निबंध मराठी

Essay on my mother in Marathi | Majhi Aai Essay in Marathi

आईसारखे दैवत साऱ्या जगतात नाही
म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे अ आ ई
मुलांनो शिकणे अ आ ई
तीच वाढवी ती सांभाळी, ती करी सेवा तिन्ही त्रिकाळी
देवा नंतर नमवी मस्तक आईच्या पायी

‘आ’ म्हणजे आत्मा, ‘ई’ म्हणजे ईश्वर. ‘आई’ या शब्दातच किती मोठे अर्थ दडलंय नाही! किती मोठा सामर्थ्य आहे या शब्दात. आई हा शब्द जितका छोटासा वाटतो पण या शब्दात सर्वांचेच विश्व सामावलेले आहे. माँ, मम्मा,मॉम असे कित्येक तरी शब्दांचा अर्थ मात्र तितका जिवलग आणि प्रेमळ असतो. आई आणि मुलं यांच्या सारख गोड नातं शोधूनही सापडणार नाही. अस्तित्वाची लढाई हि प्रत्येकाची वेगवेगळी नक्कीच असते मात्र या लढाईत एक गोष्ट सारखी असते ती म्हणजे आई. आई आपली सोबत कधीच सोडत नाही. ती नेहमी आपल्या सोबत असते.प्रत्येकाच्या आयुष्यात तिचा स्थान सर्वोच्च असता. आज आपण जे आहोत त्यात मोठा वाट हा आपल्या आईचाच. आपल्या लहानपणापासून आजअखेर आलेल्या प्रत्येक सुख दुःखाला ती समोर गेलीय आणि तिच्या त्या धाडसाने इथवरच प्रवास आपण सोप्पं करत आलो आहोत. मुलांकडून कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता निस्सीम प्रेम करणारी जगातली एकमेव व्यक्ती म्हणजे आई. म्हणतात ना, देवाला सगळीकडे जात येणार नाही म्हणून त्याने आई निर्माण केली.

आई असेल तर घराला शोभा येते. आई नसली की घर खूप सुनंसुनं वाटतं. आई सतत आपल्या मुलाच्या भवितव्याचा विचार करत असते. सतत त्याच्यासाठी धडपडत असते. आपल्या मुलाला काही कमी पडायला नको याकडे तिच लक्ष असते. स्वतःच्या ताटातली भाकरी देऊन ती उपाशी राहील पण आपल्या बाळाचे पोट भरेल. आई वात्सल्याचा झरा असतो. सर्दी, ताप असताना औषध उपचार करण्याच्या आधी मायेने कपाळावर हात फिरवताच मुलाला बर वाटतं. पहाटे सर्वात आधी उठून स्वयंपाक घरात खुडबुड करणाऱ्या आईमुळे झोपमोड होते पण जेव्हा बिछान्यातून बाहेर येऊन ब्रश केल्यावर लगेचच स,र गरमागरम नाश्ता आणि वाफाळलेला चहाचा कप येतो तेव्हा उरल्यासुरल्या सुस्ती सोबतच चिडचिडेपणा निघून जातो. मग सुरु होते आईची धावपळ, आई अंघोळीसाठी पाणी काढ ना, आई माझे कपडे कुठेयत? डबा भरला का? मला नाही हि भाजी आवडत, बेसनची पोळी दे करून. किती ऑर्डर करतो आपण एकापाठोपाठ! पण काढिती त्रागा न करता आई सर्व फर्माईश पुरी करते. या मध्ये घरातील बाकी लोकांचेही वेगळेच आदेश असतात. आजी, आजोबा, बाबा यांच्या मागे धावावे लागते. त्यांना काय हवा नको ते पहाव लागत तेही ना थकता आणि कसलीही तक्रार न करता अगदी आनंदाने ती या गोष्टी आपल्या लोकांसाठी करत असते. कुठून आणते आई एवढा सगळं उत्साह आणि शक्ती देव जाणे!
जगात आई हीच एक देवता आहे कि जिच्याबद्दल कोणी नास्तिक नाही. वि.स.खांडेकर म्हणतात, “ आईचे मन किती वेडे असते! तिला वाटते आपल्या बाळाने लवकर मोठे व्हावे. मोठमोठे पराक्रम करावेत. विजयी वीर म्हणून सगळ्या जगात गाजावे! पण त्याचवेळी तिला वाटत असते की आपले बाळ आपल्या सावलीत सदैव सुरक्षित असावे. काळाला सुद्धा त्याच्या केसाला धक्का लावता येऊ नये.” अशा मातेचे ऋण कधी फिटेल का? छे! विनोबा भावे म्हणतात, “न ऋण फिटे”. आई या दोन अक्षरात श्रुती, स्मृती आहेत. सारी महाकाव्य आहेत. आई म्हणजे माधुर्याचा सागर आणि पावित्र्याचे आगर. फुलांची कोमलता, गंगेची पवित्रता, चंद्राची रामानीयता, सागराची अनंतता, दृष्टीची क्षमाशीलता. पाण्याची रसता जर तुम्हाला पाहायची असेल तर आईजवळ क्षणभर बस. तुम्हाला सारे मिळेल. म्हणून त्या आईची सेवा करा. मातेची सेवा करणाऱ्यांना दीर्घायुष्य, यश, स्वर्ग, कीर्ती, पुण्य, बळ, लक्ष्मी, सुख, इत्यादी प्राप्त होतात. ग.दि. माडगूळकर म्हणतात,

नको रे बाळा, करू मातेची हेळणा
नयनांचा केला दिवा, तळहाताच्या पाळणा.

माझी आई निबंध : माझी आई जणू ईश्वराची सावली

स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी….

कदाचित वरील ओळ तुम्ही कुठं ना कुठं कधीतरी वाचलीच असणार,सांगण्याचा अर्थच एवढा आहे की या जगातील विधाता माणूस जर त्याच्या जवळ आई नसेल तर तो भिकारी आहे. आई अशी आहे जी आपल्याला जन्म देतेच पण आपली काळजीही घेते. आईच्या या नात्याला जगात सर्वोच्च मान दिला जातो. यामुळेच जगातील बहुतेक जीवनदायी आणि आदरणीय वस्तूंना आईचे नाव देण्यात आले आहे, जसे की मदर इंडिया, मदर अर्थ, मदर अर्थ, मदर नेचर, मदर काउ इ. यासोबतच आईला प्रेम आणि त्यागाचे प्रतीक मानले जाते. अशा अनेक घटनांच्या वर्णनाने इतिहास भरलेला आहे. ज्यामध्ये मातांनी विविध प्रकारची दुःखे सोसत आपल्या मुलांसाठी सर्वस्व अर्पण केले. त्यामुळेच आईचे हे नाते आजही जगातील सर्वात आदरणीय आणि महत्त्वाचे नाते मानले जाते.
आई आपल्याला जन्म देते, यामुळेच जगातील प्रत्येक जीव देणार्‍या वस्तूला आई ही संज्ञा देण्यात आली आहे.आपल्या आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात आपल्या सुख-दुःखात कोणी आपली सोबती असेल तर ती आपली आई असते. संकटसमयी आपण एकटे आहोत हे आई आपल्याला कधीच जाणवू देत नाही. या कारणास्तव आपल्या जीवनात आईचे महत्त्व नाकारता येत नाही.

आई हा असा शब्द आहे, ज्याच्या महत्त्वाबाबत बोलले तरी कमीच आहे. आईशिवाय आपण आपल्या आयुष्याची कल्पनाही करू शकत नाही. आईचे मोठेपण यावरून कळू शकते की माणूस भगवंताचे नाव घ्यायला विसरला तरी आईचे नाव घ्यायला विसरत नाही. आईला प्रेम आणि करुणेचे प्रतीक मानले जाते. जगभर दु:ख सोसूनही आईला आपल्या मुलाला उत्तम सुखसोयी द्यायच्या असतात.आई आपल्या मुलांवर खूप प्रेम करते, जरी ती स्वतः उपाशी झोपली तरी ती आपल्या मुलांना खायला विसरत नाही. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात आईची भूमिका शिक्षकापासून ते पालनपोषणापर्यंत महत्त्वाची असते. म्हणूनच आपण नेहमी आपल्या आईचा आदर केला पाहिजे कारण देव आपल्यावर रागावला असेल पण आई आपल्या मुलांवर कधीही रागावू शकत नाही. यामुळेच आईचे हे नाते आपल्या आयुष्यात इतर सर्व नातेसंबंधांपेक्षा महत्त्वाचे मानले गेले आहे.

खरं सांगायचं झालं तर आपल्या जीवनात जर कोणाला सर्वात जास्त महत्त्व असेल तर ती आपली आई आहे कारण आईशिवाय जीवनाची कल्पनाच करता येत नाही. यामुळेच मातेला पृथ्वीवर देवाचे रूप मानले जाते. म्हणूनच आईचे महत्त्व समजून घेऊन तिला नेहमी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बायको, मुलगी, सून अशी किती नाती एक स्त्री आपल्या आयुष्यात खेळते माहीत नाही, पण या सगळ्या नात्यांपैकी सर्वात जास्त आदर मिळतो तो म्हणजे आईचं नातं. मातृत्व हे एक बंधन आहे जे शब्दात सांगता येत नाही. आपल्या मुलाला जन्म देण्याबरोबरच त्याच्या संगोपनाचीही आईच काळजी घेते. काहीही झाले तरी आईची आपल्या मुलांबद्दलची ममता कधीच कमी होत नाही, तिला स्वतःपेक्षा तिच्या मुलांच्या सुखसोयींची जास्त काळजी असते.

आपल्या मुलाचे रक्षण करण्यासाठी आईमध्ये सर्वात मोठ्या संकटांना तोंड देण्याचे धैर्य असते. स्वत: आईला कितीही दुःख झाले तरी ती आपल्या मुलांवर कुठलाही उष्मा येऊ देत नाही. या कारणांमुळे पृथ्वीवर आईला ईश्वराचे रूप मानले गेले आहे आणि म्हणूनच ही म्हणही खूप लोकप्रिय आहे की, “देव सर्वत्र उपस्थित राहू शकत नाही, म्हणून त्याने आईची निर्मिती केली आहे.

माझी आई माझ्या आयुष्यात अनेक महत्त्वाच्या भूमिका बजावते, ती माझी शिक्षिका आणि मार्गदर्शक तसेच माझी सर्वात चांगली मैत्रीण आहे. जेव्हा मी संकटात असतो, तेव्हा ती माझ्यात आत्मविश्वास निर्माण करते. आज मी माझ्या आयुष्यात जो काही आहे तो फक्त माझ्या आईमुळे आहे कारण माझ्या यश आणि अपयशात ती माझ्या सोबत होती. मी तीच्याशिवाय माझ्या आयुष्याची कल्पनाही करू शकत नाही, म्हणूनच मी त्यांना माझे चांगले मित्र मानतो.माझी आई माझ्या जीवनाचा आधारस्तंभ आहे, ती माझी गुरू आणि मार्गदर्शक तसेच माझी सर्वात चांगली मैत्रीण आहे. माझ्या सर्व अडचणी, दु:ख आणि संकटात ती माझ्या पाठीशी उभी राहते आणि आयुष्यातील हे अडथळे पार करण्यासाठी मला बळ देते, तिने सांगितलेल्या छोट्या-छोट्या गोष्टींनी माझ्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणला आहे. हेच कारण आहे की मी माझ्या आईला माझा आदर्श आणि सर्वोत्तम मित्र देखील मानतो.

आपल्या आईने आपल्याला दिलेली शिकवण आपले आदर्श जीवन घडवण्यासाठी खूप महत्त्वाची आहे कारण लहानपणापासूनच आई आपल्या मुलाला नीतिमत्ता, सदाचार आणि नेहमी सत्याच्या मार्गावर चालणे यासारख्या महत्त्वपूर्ण शिकवण देते. आयुष्यात जेव्हा आपण आपला मार्ग चुकतो तेव्हा आपली आई आपल्याला नेहमी योग्य मार्गावर आणण्याचा प्रयत्न करते. आपल्या मुलाने चुकीच्या गोष्टी कराव्यात असे कोणत्याही आईला वाटत नाही.

आपल्या सुरुवातीच्या आयुष्यात, आपल्या आईने आपल्याला अशा अनेक आवश्यक शिकवणी दिल्या आहेत, ज्या आपल्याला आयुष्यभर उपयोगी पडतात. म्हणूनच आदर्श जीवन घडवण्यात आईचे मोठे योगदान मानले जाते.जेव्हा मी कोणत्याही कामात अयशस्वी होतो तेव्हा माझ्या आईने माझ्यामध्ये अधिक आत्मविश्वास निर्माण केला. जेव्हा जेव्हा मला कोणतीही अडचण येते तेव्हा माझ्या आईने ती अडचण दूर करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. ती फार शिकलेली स्त्री नसली तरी तिच्या आयुष्यातील अनुभवातून मिळालेले ज्ञान हे अभियंता किंवा प्राध्यापकाच्या युक्तिवादापेक्षा कमी नाही. आजही ती मला काही ना काही शिकवू शकते कारण मी कितीही मोठा झालो तरी आयुष्याच्या अनुभवात मी नेहमीच तिच्यापेक्षा लहान असेन. खरं तर माझी आई माझी सर्वोत्तम शिक्षिका आहे आणि तिने दिलेले प्रत्येक शिक्षण अमूल्य आहे.

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या प्रेरणेचा स्रोत असतो आणि त्यातून तो आपल्या जीवनातील ध्येय साध्य करण्यासाठी आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रेरणा घेतो. कुणाच्या आयुष्यात त्याचा शिक्षक त्याचा प्रेरणास्रोत असू शकतो, तर कुणाच्या आयुष्यात यशस्वी माणूस त्याचा प्रेरणास्रोत असू शकतो, पण माझ्या आयुष्यात मी माझ्या आईलाच माझा सर्वात मोठा प्रेरणास्त्रोत मानतो.

माझ्या आयुष्यात माझे ध्येय साध्य करण्यासाठी आणि नेहमी पुढे जाण्यासाठी मला प्रेरणा देणारी व्यक्ती आहे. माझी आई माझ्या प्रेरणास्त्रोत देखील आहे कारण बहुतेक लोक समाजात प्रसिद्धी आणि नाव मिळविण्यासाठी काम करतात परंतु आई कधीच विचार करत नाही की तिला आपल्या मुलांना त्यांच्या आयुष्यात यशस्वी करायचे आहे. ती जे काही काम करते, तिला स्वतःचा कोणताही स्वार्थ नसतो. यामुळेच मी माझ्या आईला पृथ्वीवरील देवाचे रूप मानतो.

माझी आई । Majhi Aai Essay in Marathi/ Nibandh

Majhi Aai Nibandh | Essay on my Mother in Marathi Languge
माझी आई निबंध मराठी


आईची थोरवी वर्णन करताना महात्मा गांधी म्हणतात, ‘एक चांगली आई शंभर शिक्षकांहून श्रेष्ठ असते!’ साने गुरुजी म्हणतात, ‘ आई मुलाला जे अंगाई गीत गाते, त्याला पाळण्यात हलवताना, मांडीवर निजवताना, कुशीत थोपटताना ज्या गोड गोड ओव्या म्हणते त्या सारा आयुर्वेद सामावलेला असतो.’ महान व्यक्तींना घडवणाऱ्या अशा माता होत्या. त्या मातांपैकी एका मातेचा आवर्जून उल्लेख करावा वाटतो तो म्हणजे जिजाऊ मातेचा. हिंदवी स्वराज्याच्या स्थापने बरोबर साऱ्या विश्वातील मातांवर स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांचा नाश करण्याचा आदर्श निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवरायांना जिजाऊ मातेनेच सावरले ना? साने गुरुजींवर त्यांच्या आई खूप चांगले संस्कार केले. साने गुरुजी म्हणतात, “अशी माझी आई होती. तिनेच मला घडवले, माझ्या हृदयात उदात्त विचार रुजवले. साऱ्या मानवजाती विषयीच्या प्रेमाचे, करुणेचे,कधीही न आटणारा निर्झर निर्माण केला तिने माझ्या अंतःकरणात. आज मी जो आहे तो तिने मला जसा घडविले तसा.” तुकाराम महाराजांनी आईची थोरवी गायली आहेत. ते म्हणतात, “जगातील इतर माणसे प्रेम करतील, वात्सल्य दाखवतील, जवळ करतील पण त्यात त्यांचा स्वार्थ दडलेला असतो. दुसऱ्याचे हित होण्यात त्यांची भूमिका स्वतःच्या हिताय बांधलेली असते पण आईची भूमीका अशी नसते.
आई! प्रेमाचा अथांग सागर ! मुलांच्या जीवनाला आकार देणारी वात्सल्यमूर्ती. कधी रागावणारी, मारणारी, खस्ता खाणारी! पण मुलांच्या भल्यासाठी अखंड झटणारी. आईचे प्रेम, तिने केलेले संस्कार, तिच्या शिकवणुकीचा चार शब्द या साऱ्याचा आपल्या जडणघडणीत किती मोठा वाट असतो. हि शिदोरी जीवनाच्या सोबतीला असते. संघर्षाच्या, सुख-दुःखाच्या कसोटीत प्रसंगात मोलाची ठरते. आईला “आई” म्हणून हाक मारणे याहून दुसरी थोर हाक नाही. ईश्वराच्या प्रेमाची कल्पना आणून देणारी जर कोणी असेल तर ती म्हणजे माता होय. ‘ न मातुः परम दैवतः’ म्हणजे आईसारखे दुसरे दैवत नाही.
आई कधीकधी रागावते, कधीकधी चार फटाके मारते. पण ते मुलाच्या चांगल्यासाठी असते. ती ओरडते मारते पण नंतर ती त्यापेक्षा जास्ती लाड करते. मुलाचे अनेक अपराध आई आपल्या पोटात घालते. पुष्कळ वेळा मनुष्याचा मोठेपणा त्याच्या आईवडिलांवर अवलंबून असतो. पाळण्यात असतानाच, आईच्या अंगाखांद्यावर खेळात असताना पुढील जीवनाच्या विकासाचे बी पेरले जात असते. आई देह देते, मनही देते जन्माला घालणारी तीच आणि ज्ञान देणारी तीच.
ज्याच्याजवळ आई आहे तो या जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. म्हणतात ना, “ स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी” हे अगदी खरा आहे. तुम्ही या सर्व जगाचा मालक बानू शकता पण तुमच्याजवळ आई नसेल तर तुम्ही सर्व काही असूनसुद्धा भिकारी असल्यासारखा आहे. त्यासाठी आपण जिवंतपणी आपल्या आईची काळजी घेतली पाहिजे. तिच्या म्हातारपणी तिला आधार दिला पाहिजे. तिला काय हव नको ते पहिल पाहिजे.
आई माझा गुरु, आई माझा कल्पतरू
सौख्याचा सागरू , आई माझी
प्रीतीचे माहेर, अमृताची धार
मांगल्याचे सार, आई माझी
आईची माया उबदार असते. तिच्या कुशीत आपल्याला हायसे वाटते. आपल्या स्वप्नांना जागवत ती रात्रभर जागी असते. आई फक्त श्री गणेशा किंवा अ आ इ ई शिकवत नाही तर मुलाच्या आयुष्याचा श्री गणेश तीच करते. बोलायला शिकवते, चालायला शिकवते, लिहायला शिकवते, वागायला शिकवते खरा म्हणजे तिने चांगले संस्कार करून ती जगण्याची एक दृष्टी मुलाला देते. “वडिलांविषयी लिहिताना आभाळाएवढा कागद पुरत नाही, अन आई विषयी लिहिताना समुद्र एवढी शाई..” ही उक्ती एकदम खरी आहे. आई वडिलांची थोरवी खूप अगाध आहे. शब्दात मांडता येणार नाहीत आणि कधीही त्याची परफेड करता येणार नाही.
आजकाल मुलं परदेशात निघून जातात. म्हाताऱ्या आई वडिलांना एकट्याला मायदेशात सोडून जातात. पैसे पाठवून देतात पण त्यांची साथ देत नाहीत वर्ष वर्ष आईवडिलांकडे येत नाहीत. ज्या मुलांना आई मोठा करते तिलाच आजकाल मुलं बोलतात कि “ आई कुठे काय करते, आई तर घरातच असते” पण घरातील काम हे काही सोपे काम नसते आणि ते आव्हान ती हसत खेळात पेलते . त्यात ती कोणाच्या मदतीची अपेक्षा न करता.
घर सुटतं पण आठवण कधीच सुटत नाही जीवनात आई नावाचं पान कधीच मिटत नाही. सारा जन्म चालून पाय जेव्हा थकून जातात. शेवटच्या श्वासाबरोबर आई हेच शब्द राहतात. पायाला ठेच लागली कि पहिला शब्द तोंडात येतो तो “आई ग” मग आई धावत येऊन औषध लावते. आपल्याला जवळ घेते. तिच्या पंखाखाली मग सगळे दुःख विसरल्यासारखे होते. बाबा ओरडले तर जवळ आई घेते. आपल्याला त्रास झाला कि आईचे डोळे आपोआप पाणावतात. आपल्या आईचे उपकार जर आपल्याला फेडायचे असतील तर तिच्या कष्टाचे चीज करणे आपले कर्तव्य आहे हे जाणले पाहिजे. तिच्यासाठी आपले आयुष्य दिले पाहिजे कारण आपल्या जीवनात कोणीही आले तरी आईची जागा तिची तिलाच द्यावी. तीच अपमान करू नये. काही चुकला तर लगेच माफी मागावी तिच्याशी अबोला धरू नये. कारण तिचा आहे जिच्यामुळे तुम्ही जग बघत आहेत. आई तुम्हाला इतरांपेक्षा नऊ महिने जास्ती ओळखत असते हे नेहमी ज्ञानात राहूद्या. आपण आपल्या आईसाठी एवढ तरी नक्कीच करू शकतो.
“दिला जन्म तू, विश्व हे दाविलेस
किती कष्ट माये सुखे साहिलेस ,
जिण्यालागी आकार माझ्या दिलास ,
तुझ्या वंदितो माउली पाउलास!”

माझी आई मराठी निबंध । Majhi Aai Marathi Nibandh

Majhi Aai Essay | Majhi Aai Nibandh

माझी आई हा विषय माझा खूप आवडता विषय! कारण आपण सर्वकाही बोलतो पण आईविषयी बोलायचं राहूनच जातं…. आई म्हणजे सर्वकाही असतं आपल्यासाठी कारण आपल्या छोट्या विश्वात तीच सारं काही असते अगदी सकाळपासून रात्री झोपलो तरीही . आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही ! खरंच आत्मा आणि ईश्वर यांचा सुरेख संगम म्हणजेच असते “आई”, काळजीवाहू ,कोमल प्रेमाचं फुल असते आई, घराची शान असते आई, आयुष्यातील मानाचं पान असते आई ! माझी आई एक गृहिणी आहे जी अगदी छान पणे आम्हा सर्वांना सांभाळते. काम आटोपून फावल्या वेळात तिचे छंद जोपासते. तिची कलाकुसर, विणकाम, संस्कारांची ठेवण, वाचन, आधुनिक वैचारिक क्षमता, बागकाम हे सारं काही मला तिच्याकडून शिकायला मिळत आणि ते मलाही आवडतं. माझी आई नेहमी म्हणते, ‘दुसऱ्यावर अवलंबून राहणं ही सर्वात मोठी अपराधीपणाची भावना आहे,जे काही असेल ते स्वतःच करावं भलेही चुकलं तरी चालेल,त्यातून शिकावं’ .

माझी आई हा विषय समोर आला आणि निरागस चेहरा समोरून तरळून गेला, उभं राहिलं ते अस्तिव जे सातत्याने झटत असतं आपल्या कुटुंबासाठी,कर्तव्यासाठी. खरंच जर विचार केला तर आई हे एक सरळ अस्तित्व आहे का? याच उत्तर नाही असंच आहे, सकाळपासून रात्री झोपेपर्यंत कष्ट करते, घरातल्यांची काळजी घेते, आई कोण असते?

अंधळ्याची दृष्टी असते आई! लंगड्याची धाव असते आई! पांगळ्याची चाल असते आई! मुक्याचे बोल असते आई! आई काय नसते कुरूप लेकराच सौंदर्य असते आई! जीवनाचा आधारस्तंभ असते आई! अंगणातील तुळस, दिव्यातील वात, घरातला प्रकाश असते आई! आई लेकरांसाठी सर्व काही करते. ती असते म्हणून घराला घरपण असतं. ती असते म्हणून जगण्याची उमेद मिळते. कधीही नाकारत नाही जी असते फक्त सकारात्मक, शांत, स्तब्ध व्यक्तीत्व, उभारी देणारी व्यक्ती म्हणजे असते आई. आई म्हणजे एक अशी व्यक्ती जी स्वतःही नेहमी उत्साही असते त्यामुळे घरचं वातावरण नेहमीच प्रसन्न राहतं.

घर सांभाळताना संतुलन राखते ते उत्कृष्ठ गृहमंत्री म्हणून! बचतीचा मंत्र जपून जमा खर्च चोख ठेवते ते अर्थमंत्री बनून!

स्वयंपाक उत्तम सुगरणीचा वसा घेउन, अन्नपूर्णेची उपासना करून, अन्नधान्याचा मान राखून कुटुंबियांना शिकवते ते कृषिमंत्री बनून!
२४/७ घर नीट नेटकं ठेवते ते संरक्षण मंत्री बनून! स्वतः धीट राहून समस्याना तोंड देते ते महिला सक्षमीकरण दाखवून देण्यासाठी, मुलांना शिक्षणाचे महत्व पटवून सांगते ती शिक्षण मंत्री बनून! भरपूर सूर्यप्रकाश वापरून त्या ऊर्जेचा पुरेपूर वापर करून घेते ते ऊर्जामंत्री बनून! मुलांवर चांगल्या प्रकारे,शुद्ध भावनेने संस्कार करते ती पालकमंत्री म्हणून! आपल्या संस्कृतीचं भान जपते ती सांस्कृतिक कार्यकारी मंत्री बनून! घरच्यांचं आरोग्य जपते ते एक वैद्यकीय मंत्री बनून! अन्यायाविरुद्ध आवाज उठवते ते सामाजिक न्याय मंत्री म्हणून! अंगणात,परसात,घरी वृक्षारोपण व संवर्धन करते ते पर्यावरण मंत्री बनून! प्राण्यांची निगा राखून त्यांची काळजी घेते ती पशुसंवर्धन मंत्री म्हणून! सामाजिक भान जपत वाहतूक कायदा जपून सक्षमतेने प्रवास करते ती परिवहन मंत्री बनून! इतकं मोठं मंत्रिमंडळ सांभाळते आणि निभावण्याची खरंच जिची क्षमता असते ती असामान्य व्यक्ती म्हणजे “आई”!

एक अद्वितीय मातृत्व, आदर्श पत्नी, सर्वगुणसंपन्न सून ,शालीनतेची आरास अशी लेक आणखीन बऱ्याच नात्यांचे मोती ओवत एक माळ बनवून तिचा घट्ट धागा जो ते मोती विस्कटू देत नाही असा धागा म्हणजे असते आई! प्रेम म्हणजे काय जीच्याकडे पाहूनच कळते आणि जाणिवेचा वसा जपणारी अशी ती माता.

अशाच वेगवेगळ्या विषयांवर निबंधाचा संग्रह मिळविण्यासाठी वेबसाईटवर वेळोवेळी भेट देत रहा. तसेच आमच्या फेसबुक अकाउंट ला फॉलोव करण्यास विसरू नका तसेच निबंध आवडल्यास आपल्या मित्रांना शेयर जरूर करा.

इतर विषयांवरील निबंध आणि भाषणे :

१. शेतकरी जगाचा पोशिंदा,शेतकरी निबंध मराठीमध्ये Essay on Farmer

२. माझा आवडता नेता निबंध-हिंदुहृदय सम्राट श्री. बाळासाहेब ठाकरे

३. झाडे लावा झाडे जगवा निबंध Zade Lava Zade Jagva Essay in Marathi

४. छत्रपती शिवाजी महाराज माहिती मराठी मध्ये

५. Essay on Pollution in Marathi । प्रदूषण- एक जागतिक समस्या

Rate this post

Chetan Jasud

मी एक पूर्ण-वेळ डिजिटल मार्केटर आणि अर्धवेळ ब्लॉगर आहे ज्याला लिहायची, प्रवासाची तसेच या टेकनॉलॉजीच्या युगात अपडेटेड राहायची आवड आहे.

One thought on “माझी आई निबंध मराठी (Top 4 Essay on my mother in Marathi)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *