निबंध: कोरोना महामारी [3 New+PDF] Corona Essay in Marathi

निबंध: कोरोना महामारी [3 New+PDF] Corona Essay in Marathi

कोरोना महामारी वर निबंध (Corona Essay in Marathi -लहान मुलांसाठी)

जानेवारी.. फेब्रुवारी… मार्च… आता फक्त दोन महिने राहिले होते आणि मग उन्हाळी सुट्टी चालू होणार होती.
सुट्टीमध्ये कुठे फिरायला जायचं,कोणते खेळ खेळायचे, कोणकोणत्या मित्र मैत्रीणीना भेटायचं अशा एक ना अनेक गोष्टींची सुनियोजित यादी मनामध्ये आधीच तयार झाली होती. आता वार्षिक पेपर चालू होण्यासाठी थोडेच दिवस राहिले होते आणि अभ्यासाची भरपूर तयारी सुद्धा चालू होती.

इतक्यात टीव्ही वरती एक बातमी सारखी झळकू लागली.. “जागतिक कोरोना महामारी.. “भारतात कोरोनाचा शिरकाव” सुरवातीला या बातमीची काहीच भीती वाटली नाही. पण थोड्याच दिवसात कोरोना रुग्णांची संख्या इतकी वाढू लागली की सर्वत्र लॉकडाऊन जाहीर करावा लागला. सर्वजण आप आपल्या घरी बंद झाले. आमची शाळा बंद झाली, बाबांच ऑफिस बंद झालं, त्यामुळे सगळे खूप खुष झाले. रोज वेगवेगळ्या रेसिपी तयार होऊ लागल्या. कॅरम, पत्ते, बुद्धिबळाचे डाव रंगू लागले. जुने फोटो खेळणी यांची शोधाशोध सुरू झाली.

सुरवातीला खूप धमाल केली. परंतु नंतर घरामध्ये कोंडून ठेवल्या सारखं वाटू लागलं. बाहेर मैदानातील खेळांची आठवण यायला लागली. मित्रांची भेट न झाल्यामुळे अस्वस्थ वाटू लागलं होत. एका जागी घट्ट बांधून ठेवल्यासारख वाटू लागलं. यानंतर खूप भयानक परिस्तिथी झाली. लोकांना खाऊच्या आणि रोजच्या वापराच्या वस्तू आणण्यासाठी सुद्धा बाहेर पडणं अवघड झालं. जे रोजकामाई करून खाणारे लोक होते त्यांना पोटभर अन्न मिळणे सुद्धा मुश्किल होऊन गेलं. पण अश्या परिस्थितीत सुद्धा पोलीस लोकांच्या सुरक्षेसाठी आणि डॉक्टर लोकांच्या आरोग्यासाठी दिवसरात्र खंबीरपणे कोरोनाशी लढा देत होते.स्वतःच्या आरोग्याची कोणतीच काळजी न करता जनतेच्या सेवेसाठी हे लोक गुंतून गेले होते. या अशा भयंकर परिस्थितीमध्ये कोणताही देव मदतीला नव्हता तर पोलीस कर्मचारी, डॉक्टर, नर्स,सफाई कामगार,शेतकरी हे लोकचं देव बनले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्थानिक प्रशासन लोकांचं मनोबल वाढवण्याचा पूर्ण प्रयत्न करत होते. सोशल मीडिया च्या माध्यमातून काळजी घेण्यासाठी आणि लोकांची भीती घालवण्यासाठी लोकांना संबोधित करत होते.सोशल distancing आणि मास्कचा वापर सर्वांसाठी खूप महत्त्वाचा बनला होता. लवकरच आपण या संकटातून बाहेर पडू अशी आशा आता सर्वांना लागली होती.

विद्यार्थी सुद्धा आता चिंतेत होते. तस पाहायला गेलं तर शाळेला सुट्टी मिळालेली सर्वांना आवडते. पण ४..६ महिन्यांची सुट्टी आता नकोशी वाटू लागली.कंटाळा वाटणारी शाळा सुद्धा आता आठवू लागली होती.आपण त्रास आणि कंटाळा म्हणून ज्या गोष्टींकडे पाहतो कदाचित वेळ गेल्यानंतर त्याच गोष्टींच्या आठवणीत आपलं मन जास्त रमत.कोरोना मुळे लोकांना अश्या गोष्टींची जाणिव अगदी जवळून झाली.

Covid Essay in Marathi
Corona Essay in Marathi | Corona Mahamari Essay in Marathi

आमच्या शेजारी एक वयोवृद्ध आजी- आजोबा राहत होते. दोघेच राहत असल्याने त्यांना औषधे आणि किराणा या गोष्टी आणण्यासाठी लोकांची मदत लागत होती.सर्वजण त्यांना मदत करत होते. पण वेगवेगळ्या लोकांच्या संपर्कात आल्याने आजोबांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यांची मुले सुद्धा त्यांच्या जवळपास नसल्याने ते दोघे खूप घाबरुन गेले. त्यांना आता कोणीच मदत करण्यासाठी पुढे येत नव्हतं. त्यांना मिळणारी सर्व मदत बंद झाली.मग माझ्या बाबांनी त्यांना मदत करण्याचं ठरवलं.

त्यांना हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यापासून ते त्यांना रोज न चुकता जेवणाचा डबा पोहचवण्या पर्यंत सर्व मदत बाबा करत होते. माझे बाबा त्यांच्या या मोठ्या संकटात त्यांचा खूप मोठा आधार बनले. त्यांना सुद्धा तो आधार त्यांच्या मुलांप्रमाणे वाटला. आणि आजोबा एका महिन्यातच कोरोना वर मात करून सुरक्षितपणे घरी परतले. माझ्या मनात बाबांबद्दलचा आदर द्विगुणित झाला.त्या परिस्तिथी मध्ये सुद्धा तो माझ्यासाठी खूप मोठा आनंदाचा क्षण होता. जर आपण एकमेकांस सहाय्य केले तर आपण या कोरोना ला नक्की हरवू शकतो यावर माझा पक्का विश्वास बसला.

अगदी आजच्या दिवसापर्यंत सुद्धा कोरोना चे संकट / कोरोना महामारी अजून पूर्णपणे नाहीसे झालेले नाही. सुदैवाची बाब अशी की आता या महामारी वर लस शोधण्यात सरकारला यश आलं आहे. तरी जोपर्यंत आपल्याला लस मिळत नाही तोपर्यंत आपण काळजीचे सर्व नियम पाळले पाहिजेत.लोकांनी या संकटातून शिकलं पाहिजे की आपण निसर्गाच्या नियमांचा दुरुपयोग केला तर आपल्यावर संकट येणारच आहे. मानवता हा धर्म मानून आपण निसर्गाची आपण पूजा केली पाहिजे. त्याने आपल्याला भरभरून दिलं आहे त्याचा योग्य आणि व्यवस्थित वापर केला तर आपण प्रत्येक संकट परतवून लावू शकतो. याच सर्व गोष्टींचा पुरस्कार करून आपण कोरोना आपल्या आयुष्यातून हद्दपार करू अशी मला आशा वाटते आणि आपण या मोहिमेत नक्कीच यशस्वी होऊ.

कोरोना महामारी आणि ताळेबंदी -मराठी निबंध (Corona Essay in Marathi)

कोरोना महामारी निबंध Corona nibandh
Corona Essay in Marathi | Corona Mahamari Essay in Marathi

आजपर्यंत अनेक महामारी येऊन गेल्या. डेंग्यू, चिकगुनिया, प्लेग या सारख्या आजारांबद्दल खूप ऐकले देखील होते पण माझ्या सारख्या नव्या पिढीतील युवकांसाठी हा पहिलाच महामारीचा अनुभव आहे. घरातील वृद्ध मंडळींच्या म्हणण्यानुसार एखाद्या महामारीमुळे संपूर्ण जग थांबण्याची ही जगातील पहिलीच वेळ आहे. त्यांची अशी महामारी पूर्वी कधीच पाहिली नव्हती.

चीन पासून गूढ रित्या चालू झालेली  ही भयंकर महामारी बघता बघता अमेरिका, ब्राझील, इटली, फ्रांस सोबत सम्पूर्ण जगाला आपल्या संक्रमणात कैदच केले होते. यातून भारतही बचावला नाही. 2020 च्या फेब्रुवारी-मार्च महिन्यात सुरू झालेली ही महामारी 2021 सालपर्यंत पर्यंत अजूनही तशीच आहे. पण गम्मत अशी की, ज्या देशापासून सुरुवात झालेली ही कोरोना महामारी त्या देशात आता मोजकेच संक्रमित राहिले आहेत. इटली सारख्या प्रगत देशात जिथे वैद्यकीय सेवा जगात अव्वल मानली जाते ती देखील या महामारीपुढे हतबल झालेली दिसून आली. हे संक्रमण रोखावे तरी कसे याचे सुरुवातीला कोणत्याच सरकारला कल्पना नव्हती, यावरील औषधे तर खूप दूरचा विचार होता. काही देशांनी यावर उपाय म्हणून लॉकडाऊन हा पर्याय म्हणून निवडला.

जगातील अनेक कँपन्यांनी लस तयार करण्यासाठी पुढाकार घेतला आहे यामध्ये काही भारतीय फार्मा कँपन्यांचा देखील समावेश आहे. काही संशोधकांच्या मते हा विषाणू चीनच्या एका लॅब मध्ये कृत्रिमरीत्या तयार केला आहे असा दावा करण्यात आला. तर चीन सरकारच्या म्हणण्यानुसार हा विषाणू एका वटवाघूळ मुळे निर्माण झाल्याचा रिपोर्ट सादर करण्यात आला. कोरोना महामारी काळामध्ये सरकारी व्यवस्थेचे अक्षरशा तीन तेरा वाजले होते. ब्राझील, इटली सारख्या देशात मृत लोकांचा अंत्यविधी करण्यास देखील विलंब होत होता. एकाच वेळी 40-50 जणांना पुरण्याचे ते दृश्य खूप विचलित करनारे होते.

भारताने देखील कोरोनाच्या पहिल्या लाटेत वेळेत लॉकडाऊन लावल्याने अनेक समस्या टाळता आल्या. पण त्या ताळेबंद मुळे परराज्यातील मजुरांचे खूप हाल झाले. काही लोकांनी मिळेल त्या वाहनांनी आपली घरे गाठली तर काहिजण वाहना अभावी चालत उन्हाची पर्वा न करता आपले घर गाठले. काही जणांच्या कडे तर जाण्यासाठी पैसे देखील उरले नव्हते, अशा या कठीण प्रसंगी काही सेलिब्रिटी सरसावल्या आणि त्यांनी स्वखर्चाने परराज्यातील लोकांना त्यांच्या घरी सुखरूप पोहचविले. या कठीण प्रसंगी भारतातील अनेक उद्योजक तसेच दानशूर व्यक्तीनी सढळ हातानी मदत केली.

कोरोनाच्या या संकटात आम्ही एक महत्वाचा बोध घेतला तो म्हणजे स्वच्छतेचा.. यामध्ये स्वछतेचे महत्व पटल्याने सर्वजण मास्क वापरणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, उघड्यावरील पदार्थांचे सेवन न करणे तसेच सार्वजनिक ठिकाणी उघड्यावरील वस्तुंना स्पर्श न करणे अशा सवयी स्वता अवगत करून घेतेले दिसून येत आहे. तज्ञांच्या मते ह्या महामारीचे परिणाम दीर्घ काळासाठी होणार असून जनतेचे लसीकरण करण्या खेरीज दुसरा पर्याय नाही आहे असे म्हटले जात आहे. भारतातील काही अग्रगण्य फार्मा कम्पन्या यासाठी पुढाकार घेऊन लस तयार करत आहेत. लवकरात लवकर ह्या लसी तयार होऊन लोकांपर्यंत पोहचू दे आणि सर्वजण या Corona महामारीला सम्पवूया अशी आशा करूयात.

कोरोना एक जागतिक महामारी (मराठी निबंध) | Corona Nibandh in Marathi

Corona Nibandh Marahti Korona Mahamari nibandh
Corona Essay in Marathi | Corona Mahamari Essay in Marathi

दूर वाट खडकाळ, अंधारलेले रानोमाळ,
डोळ्यापुढे प्रकाशाचा झोत दिसूदेत,
वाट आहे वळणाची, उताराची चढणाची
ईडा-पीडा,अडसर दूर होऊ दे.

सध्या जग याच अवस्थेतून जात आहे. कोरोना महामारीमुळे सारे जग हलवून सोडले आहे. एक छोटासा विषाणू जो डोळ्याला दिसतही नाही त्याच्यामुळे सारे जग थांबले आहे. डोळ्याला न दिसणाऱ्या या शत्रूसोबत मानवजातीचे युद्ध सुरु आहे. शत्रू दिसत नसताना सुद्धा आपण त्याच्याशी खूप धीराने लढत आहोत. मास्क, सॅनिटायझर हे तर आपले सोबती झाले आहेत. सर्वांपासून लांब राहण्याची एक सवयच होऊन गेलीये. लॉकडाऊन हा नवीन शब्द जणू आयुष्याचा भाग झाला आहे. कोरोना विषाणू काय आहे? कसा होतो, याबाबत अनेक वेळा ऐकून तोंडपाठ झाले आहे. आपण पण या कोरोना चे शिकार तर होणार नाहीत ना? याबाबत सगळे भयभीत झाले आहेत. हा विषाणू चीन या देशातून आल्याचे म्हणले जात आहे. आता हा विषाणू बऱ्याच देशात आपले हातपाय पसरताना दिसत आहे. हा विषाणू फार घातक आहे असे तज्ञाचे म्हणणे आहे.

कोरोना विषाणू डिसेंबर २०१९ च्या पहिल्या आठवड्यात नवीन कोरोना विषाणू सापडला. हा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित होतो. कोरोनाची साथ पसरू लागली तशी सगळीकडे लॉकडाऊन ची बातमी यायला लागली. सगळ्यांनी स्वतःला घरात कोंडून घेतल. जग एकदम ठप्प झाल. सुरुवातीला सर्वांनी खूप धमाल केली. नवीन पदार्थ बनव, पुस्तके वाच वगैरे पण नंतर घरामध्ये कोंडून ठेवल्यासारखा वाटू लागलं. काही लोकांचे घरून काम करणे सुरु झाले. पण घरून काम करतानाही बऱ्याच अडचणींचा सामना त्यांना करावा लागत होता. लोकांची चिडचिड वाढली. नेहमी आराम हवा असे वाटणाऱ्या लोकांना या आरामाचा कंटाळा आला. लोकांना तुरुंगात असल्याची भावना यायला लागली. सगळीकडे रुग्णवाहिकेच्या आवाजाने लोक भयभीत व्हायला लागले. रोज वापराच्या गोष्टींसाठीसुद्धा आणण्यासाठी घराबाहेर पडायला बंदी झाली होती. पशु पक्षी निवांत निसर्गात फिरत होते आणि माणसाला त्याच्याच घरात बंद केले होते.
या महामारीमध्ये मोठ्यांची जशी गैरसोय झाली तशीच लहानांचीही झाली. मोठ्यानं परिस्थितीची जाणीव असते पण लहानांना समजून सांगणे अवघड असते. लहान मुलेही घरात राहून अगदीच कोमेजून गेली. बाहेर मैदानी खेळांची त्यांना आठवण यायला लागली. मित्रांची भेट न झाल्याने अस्वस्थ वाटू लागत होता. एका जागी घट्ट बांधून ठेवल्यासारखा वाटू लागलं. विद्यार्थी सुद्धा चिंतेत होते तसे पाहायला गेले तर शाळेला सुट्टी मिळालेली सर्वांना आवडते. पण हि इतक्या जास्ती काळाची सुट्टी आता नकोशी वाटू लागली.

कंटाळा वाटणारी शाळा सुद्धा आता आठवू लागली. काही काळानंतर मोबाईल वर शाळेचे तास सुरु झाले. पण एका जागी बसून इतका वेळ मोबाईल वर बसल्यावे त्याचे व्यसन जडेल कि काय याची चिंता पालकांना जाणवू लागली. काही गरीब मुलांकडे मोबाईल, इंटरनेट अशी साधनेही न्हवती. पण शिकण्याची जिद्द असल्यामुळे त्या समस्येवरही त्यांनी मात केली. आर्थिकदृष्टया सुदृढ असणाऱ्या मुलांच्या पालकांनी लगेच नवीन मोबाईल, टॅब, इंटरनेट कनेक्शन ची सोय केली. जे पालक मोबाईल घेऊ नको असे ओरडत होते तेच आता पाल्याच्या हातात मोबाईल द्यायला लागले.
एक वर्ष आपण विचित्र मानसिकतेतून गेलो आहोत. वाटलं झालं आता सारे पूर्व पदावर येऊन सुरळीत सुरु होईल, पण कुठे काय. कोरोना आपले हातपाय पसरू लागलाय. याचे भयंकर परिणाम ज्याला आपण सध्या अनुभवतोय. अनेक क्षेत्र बाधित त्या प्रमाणेच शिक्षण प्रक्रिया पूर्णपणे कोलमडून गेली. एक पिढीचा भविष्य पूर्णपणे अंधारमय झालाय. गेल्या जून पासून शाळेची घंटा वाजलीच नाही. मधल्या काळात थोडा शाळा सुरु करण्यासाठी प्रयत्न झाला पण म्हणावं इतका यशस्वी नाही होऊ शकला. या वर्षी सुद्धा जून कोरडाच गेला. गजबजलेल्या मुलांचा किलबिलाट ऐकता आलाच नाही. शिक्षण सुरु शाळा बंद यासाठी अनेक पर्याय काढले गेले. त्यातीलच ऑनलाइन शिक्षण. पण त्याच्या दुसऱ्या बाजूचा विचार करता ज्ञानापेक्षा गोंधळ जास्त अशी परिस्थिती पाहायला मुलाला. नेट समस्या, मुलांचे भावविश्व आणि त्यांचे भवितव्य याचा विचार करता खरेच समोर अंधार दिसतो. लहान मुलांचा विचार करता डोळे, कान आणि सतत मोबाईल याचा होणार दुष्परिणाम याचा विचार झाला नसावा असे वाटते. मग यावर उपाय काय तर सारखा मोबाईल हातात देण्यापेक्षा वाचन, लेखन, श्रावण या बेसिक कौशल्यावर भर दिल्यास काही फायदा होईल.
परीक्षा हा कळीचा मुद्दा यावर्षी जास्ती गाजला. परीक्षा नाही, पुढच्या वर्गात प्रवेश दिला गेला. या निर्णयामुळे मूळ वरच्या वर्गात गेली खरी पण त्यांना आवश्यक ज्ञान मिळाले नाही. संकल्पना नीट समजल्या नाहीत तर पुढच्या वर्गात जाण्याचा काय उपयोग. आणि सगळ्यात महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे आज नोकरी व्यवसाय हा प्रश्न गंभीर असताना असे शिक्षण असेल तर त्याचा कितपत उपयोग होऊ शकतो याबद्दल शंका आहे. काहीच न होण्यापेक्षा काहीतरी व्हावे म्हणून प्रयत्न ठीक. पण त्याच्या दूरगामी परिणामांचा विचारही तितकाच महत्वाचा असतो. खरंच कोरोना महामारी ने दशा केली हि मात्र काळ्या दगडावरची रेखा नक्कीच.
कोरोनामुळे अर्थव्यवस्थाही ढासळलेली आहे. जिथे उत्पादनच होत नाहीए तिथे बाजारात पैसे येणारच कुठून. स्थलांतरित कामगारांची अवस्था याहूनही वाईट झाली. घरापासून लांब आणि रोजंदारीची कामे बंद त्यामुळे त्यांची खूप तारांबळ उडाली. सरकारने बऱ्यापैकी मदत केली. लोकांना विनामूल्य रेशन देणे, काहींच्या बँकेमध्ये पैसे टाकणे, कोरोनाचे उपचार विनामूल्य करणे अशा आणि अनेक योजना सरकारने आणि प्रशासनाने राबवल्या. डॉक्टर्स आणि पोलीस रात्रंदिवस आपल्यासाठी राबले. स्वतःच्या जीवाची प्रवाही ना करता त्यांनी अहोरात्र रुग्णांची सेवा केली.

कोरोना महामारीमध्ये देव काही करू शकला नाही पण या माणसातल्या देवाने मानवजातीसाठी खूप काही केले आहे.
आता जग थोडे सावरत आहे. या महामारीमधून जग पटरीवर येत आहे. थोडे निर्बंध आहेत पण काही प्रमाणात शिथिलता दिली गेली आहे. पण आपल्याला मास्क आणि सामाजिक अंतर पाळणे गरजेचे आहे. तरच या महामारीचा समूळ नाश होईल. जग नक्कीच पुन्हा पूर्वीसारखे होईल पण आपण आपले वागणे नीट ठेवले तर. आपण स्वतःला काही नियम घालून घेतले, जीवनशैली थोड्या प्रमाणात बदलली तर नक्कीच आपण इथूनपुढे अशा संकटांना तोंड देण्यासाठी सक्षम होऊ.

कोरोना एक जागतिक महामारी PDF । Corona Essay in Marathi PDF

इतर पोस्ट्स

Best Marathi Ukhane for Female | Marathi Ukhane for Male (150+)

इतर विषयांवरील निबंध आणि भाषणे :

१. शिक्षक दिन भाषण (Teachers Day Speech in Marathi)

५. पावसाळा निबंध मराठीमध्ये (Essay on Rainy Season in Marathi)

७. माझी आई निबंध मराठी Essay on my mother in Marathi

८. इंग्रजीमधील BFF म्हणजे काय? Meaning of BFF in Marathi

Rate this post

Chetan Jasud

मी एक पूर्ण-वेळ डिजिटल मार्केटर आणि अर्धवेळ ब्लॉगर आहे ज्याला लिहायची, प्रवासाची तसेच या टेकनॉलॉजीच्या युगात अपडेटेड राहायची आवड आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *