झाडे लावा झाडे जगवा निबंध Zade Lava Zade Jagva Essay in Marathi

झाडे लावा झाडे जगवा निबंध Zade Lava Zade Jagva Essay in Marathi

झाडांचे आपल्या आयुष्यात असामान्य महत्व आहे. याच विषयावर आधारित झाडे लावा झाडे जगवा निबंध मराठीमध्ये (Zade Lava Zade Jagva Essay in Marathi) आपल्यासाठी घेऊ आलो आहोत. आवडल्यास आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका.

झाडे लावा झाडे जगवा निबंध (Zade Lava Zade Jagva Essay in Marathi)

झाडे लावा झाडे जगवा निबंध Zade Lava Zade Jagva Essay in Marathi
झाडे लावा झाडे जगवा निबंध Zade Lava Zade Jagva Essay in Marathi

वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे ।
पक्षी ही सुस्वरे आळविती ॥१॥
येणे सुखे रुचे एकांताचा वास ।
नाही गुण दोष अंगा येत ॥ध्रु.

खरेच निसर्गाचा अविभाज्य भाग म्हणजे झाडे. ही झाडे आपले सगेसोयरेच असतात, कारण झाडांमुळे खूप काही फायदे या सजीवसृष्टीला मिळतात. त्यामुळे आपण सर्वानी एकजुटीने राहून झाडांचे संरक्षण केले पाहिजे. मनुष्याला जीवन जगण्यासाठी झाड अतिशय महत्वपूर्ण साधन आहेत. मनुष्यच प्रत्येक सजीवाला जीवन जगण्यासाठी वृक्ष खूप महत्वाची भूमिका पार पडतात. जसे आपले सगेसोयरे, नातेवाईक, मित्र आपल्याला निरनिराळ्या संकटातून वाचवत असतात तसेच हि झाडे सुद्धा आपले नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण करतात. एका तर्हेने ते आपले पालनपोषण करतात असे म्हणावयासही हरकत नाही. म्हणून आपल्यालाही त्यांच्या संरक्षणासाठी तेवढाच जागरूक आहे.

प्राचीन काळापासून वृक्ष मानवाच्या उपयोगी पडत आहेत. पूर्वी माणूस जंगलातच राहत असे त्यामुळे जंगलातूनच मानवाच्या अनेक गरज भागात असत. वृक्ष हे मानवाला फळ, फुल, भोजन, औषधी वनस्पती, इंधन प्राप्त करून देतात. पूर्वी माणसाला घालायला कपडे नसत तर माणूस झाडाच्या फांद्यांचे कपडे बनवून स्वतःचे संरक्षण करत असत. पूर्वी माणूस कंदमुळे खात असे ती झाडांपासूनच मिळालेली असत. हिंस्त्र प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी मानव जंगलात वानवा पेटवत असे त्यामध्ये तो झाडाचाच वापर करत होता. त्यानंतर हत्याराचा शोध लागला. ती हत्यारे काही प्रमाणात झाडाच्या लाकडापासूनच बनवली जात असत. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे झाडे पूर्वीपासूनच आपल्याला शुद्ध हवा प्रदान करत आहेत आणि स्वतः हानिकारक असलेला कार्बनडीऑक्सिड शोषून घेतात.

सुरुवातीपासूनच झाडांनी मनुष्याला जीवन जगण्यासाठी आवश्यक अन्न, वस्त्र, निवारा आणि ऑक्सिजन इत्यादी गोष्टी दिल्या आहे. एवढेच नव्हे तर पृथ्वीवर आज जे काही आहे ते झाडांमुळेच आहे. लहान झाडांपेक्षा लांब आणि परिपक्व झाडे जास्ती उपयोगी असतात. घनदाट झाडे कार्बन जास्ती शोषून घेतात, पावसाच्या पाण्यापासून संरक्षण करतात, उन्हाळ्यामध्ये मोठी सावली उपलब्ध करून देतात आणि उष्णतेचा ताप थोडा कमी करतात. हवेत गारवा निर्माण करतात. एका एकर मध्ये लावलेले झाड वीस माणसांसाठी एका वर्षाचा ऑक्सिजन तयार करतात.

झाडे लावा झाडे जगवा निबंध Zade Lava Zade Jagva Essay in Marathi
झाडे लावा झाडे जगवा निबंध Zade Lava Zade Jagva Essay in Marathi

ज्या ठिकाणी जास्ती झाडे असतात तिथे गर्मी, आणि थंडी असे दोन्हीही ऋतू नियंत्रित राहतात, अतिवृष्टी आणि अति उष्णता देखील झाडांमुळेच टाळता येते. बऱ्याच जीवघेण्या रोगांवर झाडाचा पालापाचोळा, मुळे,खोड, पाने, फुले अतिशय उपयोगी असतात. ते औषधाचे काम करत असतात. जगभर या वनस्पतीवर संशोधन चालू आहे. भारतात तर आयुर्वेदात अशा अनेक वनस्पतीची नवे सांगितली आहे आणि त्याचा वापर कसा करावा हे देखील सांगितले आहे. सूर्यापासून येणार अतिनील किरणे पृथ्वीवर येण्यापासून झाडे काही प्रमाणात अडवतात.

मानव झाडांपासून बऱ्याच गोष्टी मिळवतो जसे कि, रबर, माचीस आणि कागद या वस्तू तयार करतो. मानवाने झाडांच्या लाकडापासून दरवाजे, खिडक्या आणि विविध प्रकारची खेळणी तयार केली जातात. झाडांच्या विविध फुलांचा उपयोग सजावटीसाठी, सौंदर्यासाठी केला जातो. तसेच पुष्पौषधीचा उपयोग अनेक आजार बरे करण्यासाठी होतो. फुलांपासून अर्क बनवून आजारी असलेल्या माणसाला दिल्याने अराम पडतो. आपण जे मध खातो ते सुद्धा मिळण्यासाठी झाडाचा काही वाट असतो. फुलांवर मधमाश्या बसतात आणि त्या मध तयार करताना फुलांमधील रस शोषून घेतात. पाण्यामधील होडी बनवण्यासाठी झाडांचा वापर होतो.

एखादे बीज रुजवले की त्याचे रोप बनते. झाड निर्मिती हि फळांमधील बियांपासून होत असते. काही झाडे हि त्यांच्या फांद्यांपासून पुन्हा निर्माण होत असतात. झाडे पूर्ण होण्यासाठी खूप वर्षांचा कालावधी जात असतो. त्यासाठी त्यांना तोंडाने हे अत्यंत चुकीचे आहे. त्यासाठी सुयोग्य जमीन, खत आणि पाणी याची आवश्यकता भासते. झाडे हालचाल करणारे सजीव हे श्वासाची आदानप्रदान करतात असे म्हटले जाते तरी काही वावगे ठरणार नाही. माणूस जो श्वास घेतो तोच झाडापासून मिळतो. निसर्गचक्रात शुद्ध हवेची कमतरता झाडे भरून काढतात. झाडे ज्या प्रदेशात जास्ती प्रमाणात असतात त्या प्रदेशात खूप पाऊस पडतो. याचा अर्थ म्हणजे झाडांसाठी पाण्याची आवश्यकता असते आणि झाडांमुळे त्या प्रदेशात पाऊसाचे वातावरण सतत निर्मिले जाते म्हणून दुष्काळी भाग जर आपल्याला समृद्ध करायचा असेल तर खूप खूप झाडे लावणे आवश्यक आहे. झाडांवर पशु पक्षी आपले घर बांधतात त्यासाठी ते झाडाच्या फांद्यांचा उपयोग करतात. काही प्राणी स्वतःचे रक्षण करण्यासाठी झाडामागे लपतात. म्हणूनच ज्या ठिकाणी जास्ती झाडे असतात त्या ठिकाणी खूप पशुपक्ष्यांचा किलबिलाट असतो. झाडांचा अजून एक फायदा म्हणजे झाडांमुळे जमीन सुपीक बनते तसेच झाडे मातीला घट्ट धरून ठेवतात आणि पुराच्या वेळी माती वाहून नेण्यास रोखण्याचे काम करतात त्यामुळे मातीची धूप होत नाही. पर्यावरण संतुलन आणि पाऊस नियमित होणे यामध्ये झाडांचे अतिशय महत्वाचे आहे म्हणजे पूर्ण जलचक्र झाडांवर अवलंबून आहे. त्यासाठी झाडे न तोडणे , वृक्षलागवड करणे अशा महिमा आपल्या आजूबाजूला राबवल्या जातात. बऱ्याचशा योजना सरकार देखील आणते.

या धकाधकीच्या जीवनामध्ये जगाची लोकसंख्या वाढत चालली आहे. वाहनांची वर्दळ वाढली आहे. प्रदूषण वाढले आहे. उन्हाळा, पावसाळा, थंडी सारखे ऋतू पण आता आपल्या निसर्गाप्रमाणे हवे तसे होत नाहीत. कारण झाडे नष्ट होत चालली आहे. त्यांची जागा इमारती, कारखाने यांनी घेतली आहे. ज्याने पर्यावरणाचे अमाप नुकसान होत आहे. आणि नको तसे आजार पसरत आहे. ‘झाडे लावा झाडे जगवा’ हे बोलणे खूप सोपे आहे पण झाडे लावून त्यांचे संरक्षण करणे हे काही सोपी गोष्ट नसते. रोपाला लहान मुलासारखे सांभाळावे लागते. ते मोठी झाल्यावर त्यांची काळजी नसते पण लहान असतानाच त्याला आधाराची गरज असते. रस्त्याचे रुंदीकरण करण्याचा नावाखाली पन्नास वर्षे जुनी असलेली झाडे बांधकाम साहित्य व फर्निचरसाठी कापली जात आहेत. ग्रामीण भागात त्यामुळेच हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होत आहे तसाच तो शहरी भागातही आहे.

‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा संकल्प फक्त आपल्या राज्यात अथवा देशात आहे असे नाही. संयुक्त राष्ट्रानेदेखील हा कार्यक्रम हाती घेतला आहे. युनायटेड नेशन्स इन्व्हायर्नमेंट प्रोग्रॅम या संस्थेने २००८ साली जगभरात एक अब्ज झाडे लावण्याचा संकल्प केला आणि त्यात १६६ देशांनी भाग घेतला. जगातील विविध सरकारे आणि सामाजिक संस्थांच्या सहकार्याने त्या वर्षी तीन कोटी झाड लावण्यात अली आणि तो संकल्प अजून पळाला जात आहे.

एक झाड माणसाला लहापणीच्या पांगुळगाड्यापासून ते आराम खुर्चीपर्यंत तसेच वार्धक्यातील हातातील काठी पासून स्मशानातील लाकडापर्यंत साथ देते. आपण किती झाडे लावली याचा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे. आपण आज जी फळे खात आहोत ती कोणी लावली हे आपल्याला माहिती आहे, ती आपल्या आजोबानी लावली आहेत तेव्हा कुठे आपण ती चाखतो आहोत. त्यामुळे आपणही झाडे लावण्यात पुढाकार घेतला पाहिजे. झाडांचे नीट संगोपन केले पाहिजे. म्हणजे आपली पुढची पिढी अशी त्या झाडाची फळे चाखेल आणि अभिमानाने सांगेल कि आमच्या पालकांनी हे झाड लावले आहे. आजकाल मुलांना शाळा कॉलेज मध्ये शिकवले जाते, वायू प्रदूषण टाळण्यासाठी झाडे लावा. त्यामुळे मुले त्याबद्दल जागरूक झाले आहेत. बालभारती च्या पुस्तकात एक अनंत भावेंची कविता आहे. ‘एक झाड लावू मित्रा, त्याला पाणी घालू ,मोठे झाल्यावर त्याच्या सावलीत खेळू’ अशाप्रकारे मुलांवर वृक्षारोपणाचे संस्कार केले जाते.

शहरातील झाडे जवळ जवळ संपल्यात जमा आहेत. ती झाडे जर आपण आज लावली नाहीत तर भविष्यात आपली पुढची पिढी आपल्याला विचारतील कि फळ कुठे लागतात, झाडे कुठे असतात. म्हणून आंबा, चिंच, बोर, पेरू, निंब, बाभूळ अशी अनेक प्रकारची झाडे आपल्या आजूबाजूला लावा. कारण ती भविष्यात खूप उपयोगी पडणार आहेत. सर्वच सरकारने केले पाहिजे असे नाही आपणही पुढाकार घेऊन झाडे लावली पाहिजेत. माणूस पण वेगळाच आहे. झाडांपासून बनलेल्या पानावर लिहितो कि झाडे तोडू नये. जरी आपल्याला घर बांधायचे असेल तर आधी दुसरीकडे झाडे लावून त्याचे पालपोषण केले पाहिजे असे नियम सरकारने केले आहेत. घरात मुलगी जन्माला अली कि सरकार काही झाडे परिवाराला भेट म्हणून देतात म्हणजे मुलगी मोठी होईपर्यंत झाडेपण मोठी होतात. शक्यतो ही झाडे फळझाडे असतात. तसेच आपणही ठरवले पाहिजे कि घरात एक मूल जन्माला आले कि त्याच्या नावाने झाड लावायचे. अशानेच झाडाचे संवर्धन होऊ शकते. आपण सर्वानी झाडे लावा हा संदेश सगळ्यांपर्यंत पोहोचवला पाहिजे.

‘झाडे लावा, जीवन वाचवा, या धरती चे स्वर्ग बनवा’, ‘ झाडे हि माणसाचे मित्र, उगारु नका शास्त्र’, हाक देतसे धरती आई’, जातन करूया वनराई, ‘ आता चालवा एकाच चळवळ; लावा वृक्ष; करा हिरवळ’ अशी आणि अनेक प्रकारच्या घोषणा देऊन प्रभातफेरी काढून लोकजागृती करण्यासाठी शाळा पुढाकार घेत आहेत.

छायामन्यस्य कुर्वन्ति तितिष्ठन्ति स्वयं मातपे फलन्यायपी प्राथय वृक्षा सत्पुरुषासारखे एवं
जगाच्या भावनेने सुद्धा उन्हात उभे राहतात, पण इतरांना सावली देतात; ज्यांची फळे-फुले दुसऱ्यांसाठी असतात. असे त्यागमय जीवन जगणारे वृक्ष एखाद्यास सत्पुरुषासारखे भासतात. या गुरुरूपी पुरुषाचे सानिध्य आबालवृद्धांना, सामान्य जणांना व त्याचबरोबर सत्पुरुषांना लाभावी वाटते म्हणून ऋषिरूपी मुनींनी रानावनात वस्ती करून निसर्गाच्या सानिध्यात अध्ययन, अध्यापन आणि तपश्चर्या करत असत.

आशा आहे कि तुम्हाला झाडे लावा झाडे जगवा निबंध मराठी मध्ये ( Zade Lava Zade Jagva Essay in Marathi ) आवडला असेल. ह्या होळी निबंध मराठीत बद्दल आपले अभिप्राय खाली कमेंट मध्ये जरूर कळवा. तसेच खालील इतर विषयांवरील निबंध वाचायला विसरू नका.

इतर विषयांवरील निबंध आणि भाषणे :

१. शिक्षक दिन भाषण (Teachers Day Speech in Marathi)

२. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मराठी निबंध (Best: Independence Day Essay in Marathi)

३. निबंध: कोरोना महामारी (Corona Essay in Marathi)

४. छत्रपती शिवाजी महाराज माहिती मराठी मध्ये

५. पावसाळा निबंध मराठीमध्ये (Essay on Rainy Season in Marathi)

६. निबंध: रंगपंचमी (रंगपंचमी Essay in मराठी)

७. माझा आवडता प्राणी मराठी निबंध Best Essay on my favourite animal in Marathi

८. माझी आई निबंध मराठी (Top 3 Essay on my mother in Marathi)

९. माझी शाळा निबंध मराठी (Best My School Essay in Marathi for Class 6 to 9)

१०. दिवाळी निबंध मराठी मध्ये Best Essay on Diwali in Marathi

इतर

मराठी भाषण कसे करावे? मराठी भाषणासाठी लागणाऱ्या 11 महत्वाच्या टिप्स!..

1/5 - (2 votes)

Chetan Jasud

मी एक पूर्ण-वेळ डिजिटल मार्केटर आणि अर्धवेळ ब्लॉगर आहे ज्याला लिहायची, प्रवासाची तसेच या टेकनॉलॉजीच्या युगात अपडेटेड राहायची आवड आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *