Best Republic Day Speech in Marathi | 26 January Marathi Speech

Best Republic Day Speech in Marathi | 26 January Marathi Speech

Republic Day Speech in Marathi | 26 January Marathi Speech । प्रजासत्ताक दिन भाषण मराठी

खूप विद्यार्थ्यांची विनंती होती कि Republic Day म्हणजेच भारताचा प्रजासत्ताक दिन यावर भाषण पोस्ट करावे. याच विनंतीचा मान राखून या पोस्ट मध्ये प्रजासत्ताक दिन विशेष मराठी भाषण या ब्लॉग मध्ये पोस्ट करत आहे.

Republic Day । 26 January Marathi Speech | प्रजासत्ताक दिन भाषण मराठी मध्ये । Republic Day Speech in Marathi
26 January Marathi Speech | प्रजासत्ताक दिन भाषण मराठी मध्ये । Republic Day Speech in Marathi

भरतखंडे नरदेह प्राप्ती ।
हे तो परम भाग्याची संपत्ती ।।

भारत नावाच्या आकाराने मोठ्या आणि खंडप्राय असणाऱ्या देशात आपला जन्म झाला हे आपले परम भाग्य मानणाऱ्या प्रत्येक भारतीयाला प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.

आज २६ जानेवारी. हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन किंवा गणतंत्र दिवस म्हणून साजरा करतो. अनेक राष्ट्रीय सणांपैकी एक असा हा सण जो प्रत्येक भारतीय अभिमानाने साजरा करतो. आपला देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटिश राजवटीतून मुक्त झाला. तरीपण भारत हा ब्रिटीश कॉमनवेल्थ म्हणजेच ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली समान हितसंबंध असलेल्या राष्ट्रांच्या गटात होता. आपल्याकडे आपले असे स्वतःचे काही नियम म्हणजेच संविधान नव्हते. मग एक निश्चय करून भारताच्या संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी महान लोक सरसावले त्यात होते बाबासाहेब आंबेडकर, अल्लादी कृष्णा स्वामी अय्यर आणि इतर दिग्गज मंडळी. हे एक प्रचंड मोठे आव्हान च होते कारण इतक्या मोठ्या देशासाठी नियम बनवणे हे काही सोप्पे नव्हते.

इथे अनेक धर्म पंथ एकत्र नांदत होते. दोन वर्षात अनेक सभा घेतल्या. वेगवेगळ्या तज्ज्ञ व्यक्तींची मते घेतली. अनेक बैठकी झाल्या नंतर राज्यघटना तयार झाली. आपली घटना तयार होण्यासाठी २ वर्षे, ११ महिने, १८ दिवस लागले. २६ नोव्हेंबर १९४९ साली आपली घटना स्वीकारली गेली. ३०८ सदस्यांनी संविधानावर स्वाक्षरी केली आणि २६ जानेवारी १९५० पासून राज्यघटनेचा अंमल सुरु झाला. भारत एक प्रजासत्ताक आणि सार्वभौम राष्ट्र बनला.

आपला भारत देश जगात सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र आहे. आणि आपले संविधान म्हणजेच राज्यघटना देखील जगातील सर्वात प्रदीर्घ अशी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. राज्य घटना अमलात आल्याचा दिवस म्हणून २६ जानेवारी हाच दिवस का निवडला असावा बरे ? असा प्रश्न साऱ्यांच्या मनात आलाच असेल. तर तो दिवस निवडण्यामागे एक ऐतिहासिक महत्व होते ते म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस च्या डिसेंबर, १९२९ मधील लाहोर येथे झालेल्या अधिवेशनाच्या ठरावानुसार १९३० मध्ये हाच २६ जानेवारी दिवस संपूर्ण स्वराज्य दिवस म्हणून साजरा करण्यात आला होता.

प्रजासत्ताक अस्तित्वात आल्यानंतर संसदीय लोकशाहीच्या चौकटीत भारताने बऱ्याच गोष्टी सध्या केल्या आहेत. आशिया- आफ्रिका मधील बरेच देशांची स्वातंत्र्योत्तर वाटचाल सुरळीत झालेली नाही जितकी आपली झाली. कुठे लडखडती लोकशाही तर कुठे निव्वळ लोकशाही पांघरलेला मुखवटा अशी अवस्था आहे. पण आपल्या या विशाल आणि खंडप्राय देशात अनेक गुंतागुंतीच्या आणि ज्वलंत समस्या असूनदेखील आपले प्रजासत्ताक टिकले आणि बहरले याचे श्रेय जाते साऱ्या देशबांधवांना.

न्याय, स्वातंत्र्य, समता ही मूल्य आपले संविधान आपल्याला शिकवते. आपण हि मूल्य अगदी मनापासून जोपासली आहेत. यातूनच प्रजासत्ताक लोकशाही राष्ट्र म्हणून भारताचा नावलौकिक आज जगभग झाला आहे. बंधुता, लोकशाही या मूल्यांवर भारतीयांनी निष्ठा दाखवून त्या उराशी बाळगल्या. आपली राज्यघटना अस्तित्वात येणे हीच हे मोठी क्रांतिकारी घटना होती. आम्ही भारताचे लोक या सरनाम्याने सुरुवात होणाऱ्या आपल्या संविधानाने आज ७३ वर्षे पूर्ण केलेली आहेत. भारत हा लोकशाही प्रदान देश आहे याचा नेमका अर्थ काढायचा झाल्यास तो हाच कि, आठेक राज्य करणारी व्यक्ती हि कोणती राजा नाही. वंशपरंपरागत इथे कोणीही सर्वश्रेष्ठ नाही. लोक सर्वश्रेष्ठ आहेत आणि त्या लोकांनीच निवडून दिलेली व्यक्ती हि सर्वोच्च स्थानी बसेल. लोकांनी, लोकांसाठी केलेले राज्य म्हणजेच लोकशाही.

भारतीय संविधानाने आपल्याला मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये दिलेली आहेत. आपला देश ज्या आदर्शांवर चालतो त्याचा आपण सन्मान केला पाहिजे यासाठी या दिवसाचे खूप महत्व आहे. या दिवशी संपूर्ण देशभरात उत्साह दिसून येतो हा दिवस सगळ्या नागरिकांसाठी अभिमानाचा दिवस आहे. हा दिवस नुसता साजरा करण्यासाठी नसून तर हा दिवस प्रतिज्ञा घेण्याचा देखील आहे. प्रतिज्ञा हि कि मी आपल्या मूल्यांचा कधीही विसर पडू देणार नाही. संविधानाचा आणि ते बनविणाऱ्या व्यक्तींचा आदर कारेन. हीच शिकवण आपल्याला आपल्या पुढच्या पिढीकडे पोहोचवायची आहे.

26 January Marathi Bhashan | प्रजासत्ताक दिन भाषण

26 January Marathi Bhashan | प्रजासत्ताक दिन भाषण । Republic Day Speech in Marathi

26 January Marathi Bhashan | प्रजासत्ताक दिन भाषण

२६ जानेवारी हि दिवस भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भारताला त्याचे स्वतःचे असे संविधान मिळाले. ज्याद्वारे भारत कोणाच्याही अधिपत्याखाली कोणाचेही नियम न पाळता स्वतःच्या नियमावर राज्यकारभार करू शकेल अशी राज्यघटना घटनाकारांनी तयार केली. २६ जानेवारी १९५० पासून आपल्या संविधानाप्रमाणे आपला राज्यकारभार चालू झाला. या दिवसापासून भारतात प्रजेची सत्ता सुरु झाली. हा दिवस भारतात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी समारंभाचा मुख्य कार्यक्रम हा भारताची राजधानी दिल्ली येथे साजरा केला जातो. यामध्ये सर्व राज्ये सहभाग घेतात. आपल्या लोकशाही चे दर्शन या माध्यमातून साऱ्या जगाला दाखवले जाते. भारताच्या सर्व क्षेत्रातील वैभवाचे दर्शन घडवणारी मोठी मिरवणूक यावेळी काढली जाते. सर्वात मोठ्या लोकशाही प्रजासत्ताकाच्या सोहळा पाहण्यासाठी विविध देशातील पाहुण्यांना आमंत्रित केले जाते. दरवर्षी वेगवेगळ्या देशातील राष्ट्राध्यक्ष किंवा मोठ्या पदावरील व्यक्तींना प्रमुख पाहुणे म्हणून दिल्लीला निमंत्रण दिले जाते. सैन्याचे भव्य संचलन राष्ट्रपतीभवनाजवळील विजय चौकापासून ऐतिहासिक लाल किल्ल्यापर्यंत जाते. या संचलनाची जगात एक ओळख आहे ती म्हणजे ‘जगातील सर्वांत भव्य आणि विविधरंगी संचलन’. त्यामुळे ही गोष्ट देशी- विदेशी पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरत आहे.

गणतंत्र दिवस म्हणजेच प्रजासत्ताक दिनादिवशी राष्ट्रपती भवन, संसद भवन, सर्वोच्च न्यायालय, साऊथ आणि नॉर्थ ब्लॉक यांसारख्या ठिकाणी इमारतींवर रोषणाई केली जाते. शाळा महाविद्यालयांत देखील सकाळची प्रभात फेरी काढली जाते. विद्यार्थी शाळेच्या गणवेशात शाळेत हजेरी लावतात आणि प्रभारित फेरी मध्ये सहभागी होऊन ‘भारत माता कि जय’, ‘वंदे मातरम’ अशा घोषणा देत असतात. प्रभात फेरीवरून आल्यावर राष्ट्रगीत, प्रतिज्ञा म्हणली जाते. आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये सुरवातीला दिलेला सरनामा म्हणजे ‘आम्ही भारताचे लोक’ अशी सुरुवात असणारी प्रतिज्ञा घेतली जाते. त्यानंतर देशभक्तीपर गाणी गायली जातात. मुले कवायती करतात आणि झेंड्याला मानवंदना देतात. त्यानंतर मुलांना खाऊचे वाटप केले जाते.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती राष्ट्राला उद्देशून संदेश देतात. त्याचबरोबर ते केंद्राच्या विविध सेवांमधील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुरस्कार जाहीर करतात. प्रतिकूल परिस्थितीत अतुलनीय शौर्य गाजविलेल्या १६ वर्षाखालील मुलांचा प्रजासत्ताक दिनाच्या आधी विविध प्रकारचे राष्ट्रीय शौर्य पुरस्कार जाहीर केले जातात. संचालनाच्या सुरुवातीला इंडिया गेट येथील अमर जवान ज्योती येथे देशाच्या सीमांचे संरक्षण करताना शहिद झालेल्या जवानांना पंतप्रधान संपूर्ण देशाच्या वतीने आदरांजली वाहतात. राजधानीमध्ये विविध देशांचे चित्ररथ सहभागी होतात. राज्ये आपापल्या देशाची सांस्कृतिक विविधता दाखवतात. राजधानीतील प्रजासत्ताक दिन सोहळ्याचा समारोप २९ जानेवारीला सायंकाळी ‘ बिटिंग द रेट्रीट’ या समारंभाने होतो. नवी दिल्लीतील विजय चौकात होणाऱ्या समारंभात राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधानांसह विविध महत्वाच्या पदांवरील व्यक्ती आणि विविध देशांचे राजदूत उपस्थित असतात.

आपले देशात असणाऱ्या विविध संस्कृतींचे कलादर्शन या सोहळ्या मार्फत दर्शवले जाते. सैन्याच्या संचलनातून त्यांचा वक्तशीरपणा, शिस्त या गोष्टींची झलक दिसते. संस्कृतीच्या विविध रंगांची उधळण होताना दिसते. आपापसातले मतभेद बाजूला सारून वैविध्य दाखवण्याची संधी या सोहळ्यानिमित्त मिळते. या सोहळ्यामध्ये भारताच्या राष्ट्रपतींपासून सामान्य माणसापर्यंत सारे या सोहळ्यात सहभागी असतात त्यामुळे हा खऱ्या अर्थाने भारतीय लोकशाहीचा सोहळा ठरतो. सारा समारंभ पाहताना अंगावर शहरे येतात आणि अभिमानाने उर भरून येतो. आज या Republic Day म्हणजेच प्रजासत्ताक दिनाच्या मी पुन्हा एकदा सर्वाना शुभेच्छा देते आणि माझे भाषण इथेच संपविते. जय हिंद, जय भारत!

२६ जानेवारी दिवशी भारतात विशेष काय असते?

२६ जानेवारी १९५० या दिवशी पारतंत्र्यातून मुक्त होऊन भारतीय राज्यघटना अंमलात आली. हा दिवस भारतात गणतंत्र दिवस म्हणजेच प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.

प्रजासत्ताक दिन २६ जानेवारीला का साजरा केला जातो?

कारण याच दिवशी आपली राज्यघटना अंमलात येऊन भारत एक गणतंत्र राष्ट्र बनले होते. संपूर्ण भारतात हा दिवस Republic Day म्हणून साजरा केला जातो.

इतर विषयांवरील निबंध आणि भाषणे :

१. शिक्षक दिन भाषण (Teachers Day Speech in Marathi)

२. मराठी भाषण कसे करावे? मराठी भाषणासाठी लागणाऱ्या 11 महत्वाच्या टिप्स!..

३. निबंध: कोरोना महामारी (Corona Essay in Marathi)

४. छत्रपती शिवाजी महाराज माहिती मराठी मध्ये

५. पावसाळा निबंध मराठीमध्ये (Essay on Rainy Season in Marathi)

६. निबंध: रंगपंचमी (रंगपंचमी Essay in मराठी)

७. माझी आई निबंध मराठी Essay on my mother in Marathi

८. Speech in Marathi for Send Off | Top 5 Best Farewell Speech

इतर लेख

१. Best Marathi Ukhane for Female | Marathi Ukhane for Male (150+)

२. Bestie म्हणजे काय? Bestie meaning in Marathi

३. Bestie म्हणजे काय? Bestie meaning in Marathi

४. Marathi meaning of Spouse | Spouse meaning in Marathi

Rate this post

Chetan Jasud

मी एक पूर्ण-वेळ डिजिटल मार्केटर आणि अर्धवेळ ब्लॉगर आहे ज्याला लिहायची, प्रवासाची तसेच या टेकनॉलॉजीच्या युगात अपडेटेड राहायची आवड आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *