Speech in Marathi for Send Off | Top 5 Best Farewell Speech
एखाद्या ऑफिस मधून किंवा शाळेतून शेवटचा निरोप घेणे कठीणच असते. आपला काही आठवणी त्या त्या ठिकाणांना जुडलेले असतात. अशा प्रसंगी आपल्या भावना शब्दात मांडणे तसे कठीणच असते. तरीही आपल्याला योग्य प्रकारे मांडता येउदे म्हणून आम्ही थोडक्यात निरोप समारंभ भाषण । Speech in Marathi for Send Off | Farewell speech in Marathi language हि पोस्ट घेऊन आलो आहोत. आवडल्यास शेयर करायला विसरू नका.
- Speech in Marathi for Send Off | Farewell speech in Marathi language
- Send off speech in Marathi 10th class | १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभ
- Farewell Speech in Marathi by Teacher | Send off speech for students by teacher in Marathi सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकाचे मनोगत
- Send off Speech in Marathi language for teacher by student निवृत्त होणाऱ्या आवडत्या शिक्षकांचा निरोप समारंभ
- Farewell Speech in Marathi for Colleague / office farewell speech in marathi सहकारी मित्राचा निरोप समारंभ
- Retirement Farewell Speech in Marathi सेवानिवृत्ती निरोप समारंभ भाषण Nirop Samarambh Bhashan in Marathi
Speech in Marathi for Send Off | Farewell speech in Marathi language
Send off speech in Marathi 10th class | १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभ
इंग्रजीमध्ये एक विचारधारा आहे ती अशी की,
Our ways may change but not our hearts
Our life may lend us apart but our memories will link up together
अगदी या उक्तीप्रमाणे आठवणी कायम सोबत राहतात माणसे किती लांब असली तरी.
हीच विचारधारा मनात रुजवत, सर्व गुरुजनांना सदर प्रणाम करून, महाविद्यालयातील या वटवृक्षाच्या सावलीमध्ये आलेला एक छोटासा पक्षी आज निरोप देण्यास उभा आहे. इथे बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांची अवस्था माझ्यापेक्षा वेगळी नाही. सर्वांची अवस्था हि सासरी जाणाऱ्या नववधूप्रमाणे झालेली आहे असे वाटते. प्रत्येकाची शरीरे जरी इथे असली तरी माने मात्र कुठेतरी लांब अशा जुन्या स्मृतींना, आठवणींना उजाळा देण्यात, जागे करण्यात गुंग झालेली आहेत. खरेच! किती अविस्मरणीय होता नाही हा प्रवास!
शाळेत अगदी पाळणाघरामध्ये माझ्यासारख्या मातीच्या गोळ्याचे आगमन झाले. खरेच तेव्हा सारे मातीचा गोळाच होते. त्याची छान मूर्ती बनवण्याचे दिव्या काम या आपल्या महाविद्यालयावर होते. ते त्यांनी लीलया पेलले. या मातीच्या गोळ्याला कधी प्रेमाचा स्पर्श देऊन तर कधी शिक्षेरूपी दिव्यात तापवून एका मूर्तीचे रूप दिले.
माझी जशी शारीरिक उंची वाढली तशी माझी मानसिक उंची देखील वाढवण्याचे काम माझ्या गुरुजनांनी केले. गुरुजनांनी फक्त माझ्या अभ्यासातील विषयांशीच माझी मैत्री जमवली नाही तर, जगात कसे वागायचे, हे देखील शिकवले. दहा वर्षात या सुरवंटाचे रूपांतर फुलपाखरात झाले.
आज शाळा सोडताना खूप वाईट वाटत आहे, शाळेविषयी खूप आपुलकी आहे. एवढी वर्षे शिक्षकांनी खूप सांभाळून घेतले आहे. १० वी च्या विद्यार्थ्यांच्या सर्व परीक्षा संपल्या कि, शाळा-शाळांमधून निरोप समारंभ सुरु होतात आणि विद्यार्थीदेखील जोरदार तयारी करतात. पण हे सगळे करित असताना आम्हा मुलांच्या मनात संमिश्र भावना असतात. नवीन कॉलेज विषयी विशेष तर वाटतेच पण आपली शाळा सोडणार आणि त्या सुरक्षित वातावरणातून बाहेर पडणार याची रुखरुख मनामध्ये चालू राहते.
सुरवंटाचे झाले फुलपाखरू,
सर्वत्र लागले भराऱ्या मारू.
नवे जग, नव्या आशा,
शोध घेण्याची जबर मनीषा
या शाळेने लावले वळण,
त्यावर करू यशाची चढण.
शाळेचे शिक्षक आपल्यासाठी खूप कष्ट घेतात हे मला मी जेव्हा सातवीत असताना शिक्षक दिनादिवशी शिक्षक झालो होतो तेव्हा समजले. त्या अवघ्या तीन-साडे-तीन तासात शिक्षकांचे कष्ट, त्यांच्या प्रयत्न लक्षात आले. आणि म्हणूनच ठरवलं कि सागरात पोहण्याचा आत्मविश्वास देणाऱ्या शाळेचे आभार मानण्याची आजची सुवर्ण संधीच आहे.
नव्या क्षितिजांना साद घालताना जुन्या क्षितिजांना अभिवादन करणे, त्यांचे आशीर्वाद घेणे हि आपली संस्कृती आहे. म्हणूनच, या संस्कृतीचा पाईक असणारा मी हि काट्याप्रमाणे बोचणारी स्मृतीची फुले मनात साठवण शालेय विद्यार्थी म्हणून या स्टेजवरचे माझे शेवटचे भाषण देताना माझ्यासाठी झटणाऱ्या सर्व ज्ञात अज्ञात शिक्षकांना, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शतशः अभिवादन करतो आणि विश्वास देतो कि, या मंदिरात उभारलेल्या पायावर माझी उत्तम माणूसरुपी इमारत नक्कीच उभी राहील आणि माझ्या यशाचा, सत्कार्याचा सुगंध या शाळेला प्रफुल्लीत करेल.
एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद.
Farewell Speech in Marathi by Teacher | Send off speech for students by teacher in Marathi सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकाचे मनोगत
नमस्कार, आज माझा या शाळेतून निवृत्तीचा दिवस आहे. मी शारदा महाविद्यालयाच्या शिक्षक पदावरून निवृत्त होत आहे आणि माझा शेवटचा निरोप घेण्यासाठी आज इथे तुम्ही सारेजण जमलं आहेत त्यासाठी मी तुमचे प्रथमतः आभार मानतो आणि माझे मनोगत मांडायला सुरुवात करतो.
मी शारदा महाविद्यालयात गेल्या १५ वर्षांहून अधिक काळ शिक्षक या पदावर कार्यरत आहे आणि आता माझा या संस्थेशी कधीही न संपणारा संबंध सुद्धा खूप विकसित झाला आहे. त्यामुळे मी फक्त या पदावरून मुक्त होत आहे. पण माझी कर्तव्य मी नेहमीच पार पडत राहीन. माझा शाळेतील प्रवास खरोखरच उत्साहपूर्ण आणि समृद्ध करणारा होता. या साऱ्या प्रक्रियेत माझ्या पाठीशी सारा सहकारी वर्ग, माझे विद्यार्थी, माझा परिवार सोबत राहिला त्यांचे मी खूप आभार मानतो.
मी येथे माझ्या सर्व विद्यर्थ्यांचा उल्लेख करू इच्छितो ज्यांनी केवळ त्यांच्या शिक्षण क्षेत्रातच चांगली कामगिरी बजावली नाही तर इतर कामांमध्येही उत्कृष्ठ अशी कामगिरी बजावली असून मी आमच्या शाळेतील मुलांच्या व शिक्षकांच्या पाठिंब्याशिवाय मी येथे पोहोचलो नसतो. आज मी जे काही आहे ते फक्त तुमच्या सर्वांमुळेच आहे.
आज मला माहिती नाही कि मी आपले हृदय जिंकू शकलो आहे कि नाही, परंतु एक गोष्ट मी नक्की सांगू शकतो की, आपण सर्वानी जे प्रेम दिले आहे त्यामुळे मी अगदी भारावून गेलो आहे. तुम्हा सर्वांचे प्रेम मात्र मी नक्की जिंकून घेतले आहे आणि याचा मला सार्थ अभिमान आहे. आयुष्यात काहीतरी पुण्य कर्म केले म्हणून मला या शाळेने आपलेसे केले. आज मला इथून जाताना खूप काही मिळत आहे. जो मन सन्मान या महाविद्यालयाने मला दिला आहे तो मी कधीही विसरू शकणार नाही. शाळेसाठी मी नेहमी तत्पर असेन हा माझा दिलेला शब्द मी अखेरपर्यंत पाळेन.
शेवटी मी एवढेच म्हणेन कि, खूप वेगात जात राहा, जिंकत राहा आणि आयुष्य काहीतरी मोठे आणि चांगले मिळवण्यासाठी कायम उत्साही राहा. माझ्या सर्व प्रिया विद्यर्थ्याचे उज्ज्वल भविष्य आणि माझ्या कर्मचारी आणि शिक्षक यांच्या समृद्ध कारकिर्दीसाठी मी देवाला प्रार्थना करतो.
आपण सर्वांचे मनापासून आभार! धन्यवाद.
Send off Speech in Marathi language for teacher by student
निवृत्त होणाऱ्या आवडत्या शिक्षकांचा निरोप समारंभ
निवृत्त होणाऱ्या आवडत्या शिक्षकांचा निरोप समारंभ
सुरुवातीलाच सरांना उद्देशून एक हिंदीतील काही वाक्य बोलू इच्छितो,
जो धैर्यता का पाठ पढाये, वही सच्चा गुरु कहलाये।
संकट मै हसना सिखाये, वही सच्चा गुरु कहलाये।
पग पग पर परछाई सा साथ निभायें,वही सच्चा गुरु कहलाये।
जिसे देखकर आदर से सर झुक जाए,वही सच्चा गुरु कहलाये।
ज्ञानदानाचे कार्य करुन सेवेला पूर्णविराम देण्याऱ्या गुरुजनवर्गाला निरोप देताना मन गर्वाने भरून येते. गेली कित्येक वर्षे महाराष्ट्राच्या विविध भागात ज्ञानदानाचे कार्य करून, कित्येक पिढयांना सुजाण, सुसंकृत बनवणारे श्री. शिंदे सर यांचा आ सेवानिवृत्ती समारंभ. कर्तृत्व, दातृत्व अन नेतृत्वाने नटलेल्या एक आदर्शवत व्यक्तीचा आज सेवानिवृत्ती समारंभ आहे. खरेतर हा नुसता निवृत्ती सोहळा नसून, विद्यार्थ्यांसाठी झटणाऱ्या, आयुष्यभर इतरांना मार्गदर्शन करणाऱ्या, प्रोत्साहन देणाऱ्या सरांचा आणि त्यांच्या प्रामाणिक कार्याचा गौरव आहे. शिक्षक आणि विदयार्थी यांच्यातील अतूट नात्याचा हा गौरव आहे.
शिंदे सरांची शिकवण्याची पद्धत आणि एकूणच प्रभावशाली व्यक्तिमत्वामुळे विद्यार्थ्याला प्रिय आहेत. आम्हा प्रत्येक विद्यार्थ्यांच्या जीवनात आपले स्थान अत्यंत अढळ आणि अटळ आहे. तुम्ही आमचे शिक्षक होतात हे आमचे भाग्यच समजतो मी. नेहमी हसतमुख असणारे सर साऱ्या गोष्टी खूप रंजक पद्धतीने समजून सांगत. मुलांनी कोणताही प्रश्न विचारला तरी त्याचे उत्तर त्यांच्याकडे असायचे. सर प्रेमाने शिकवत पण कधीकधी छडी काढून शिक्षा पण देत असत.
शिक्षक तो असतो जो विद्यार्थ्यांच्या मनात कायम आदराचे स्थान निर्माण करतो. माझ्या मनात सरांबद्दल आदरयुक्त प्रेम आणि आदरयुक्त भीती हि आहे. ते नेहमीच माझे मनोबल आणि आत्मविश्वास वाढवतात त्याच्याशी बोलल्यावर एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. ते माझे पालक बनून मायेने काळजी घेत;माझ्या यशात आनंदाश्रू ढाळताना आणि माझ्या अपयशात दुःखी होताना पहिले आहे, अनुभवले आहे. लोखंडाचे सोन्यात रूपांतर करणारा परीस मी कधी पहिला नाही, कदाचित तो काल्पनिकही असेल, पण चालत-बोलता परीस मी पहिला आहे, ते म्हणजे आमचे शिंदे सर.
सरांचा आज या शाळेतील शेवटचा दिवस असेल. उद्यापासून ते आम्हाला शिकवायला नसतील. त्यांची कमी नेहमी भासेल. पण सर तुम्हाला आम्ही मुले कधीही विसरू शकणार नाही. आम्ही तुम्हाला कधीही विसरू शकणार नाही सर. तुम्ही केलेले संस्कार आम्ही कधीही विसरणार नाही. आणि तुम्ही दिलेल्या मार्गावरूनच आम्ही जाऊ हे आमचे वाचन आहे तुम्हाला. सर तुम्ही आमचे प्रेरणा स्थान आहात.
मला इथे अवश्य एक वाक्य सरांनसाठी म्हणावे वाटते कि,
ज्ञान ज्यांचा मान, अन प्रतिभा ज्यांची सोबती।
उत्तुंग कर्तृत्वापुढे त्यांच्या, सारे झुकून सलाम करती।।
मी तुम्हाला तुमच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे मनोगत इथेच थांबवतो.
Farewell Speech in Marathi for Colleague / office farewell speech in marathi
सहकारी मित्राचा निरोप समारंभ
सहकारी मित्राचा निरोप समारंभ
नमस्कार, मी——-. जसे कि आपण सर्व जाणून आहोत कि आपले सहकारी मित्र मि.जोशी यांचा आज निरोप समारंभ आहे आणि त्यासाठी आपण सारे त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी इथे जमलो आहोत. मी.जोशी हे माझ्या सर्वात चांगल्या सहकार्यांपैकी एक आहेत, आणि ते आज विदेशात दुसरी कंपनी जॉईन करण्यासाठी जात आहेत. आज जोशी यांच्या निरोप समारंभात बोलताना मला कठीण जात आहे कारण आपल्या हृदयाच्या जवळ असणाऱ्या व्यक्तीला निरोप देणे हे खूप कठीण काम असते.
जोशी हे माझ्या अनेक वर्षांचे सोबती आहेत. अनेक जबाबदाऱ्या आम्ही खूप खंबीरपणे एकत्र पेलल्या आहेत. अनेक प्रकल्पांवर आम्ही एकत्र काम करून ते यशस्वी करून दाखवले आहेत. आम्ही खूप सारे क्षण सोबत घालवले आहेत हे क्षण, या आठवणी माझ्या मनात कायम घर करून राहतील.
जोशी हे महत्वाकांक्षी व्यक्ती आहेत आणि याचा कंपनीला आणि त्यांच्या सहकार्यांना सार्थ अभिमान आहे. त्यांची विदेशात जाण्याची तयारी हि त्यांच्या महत्वाकांक्षी असण्याचाच भाग आहे. त्यांच्या याच महत्वाकांक्षीपणामुळे आपण आपली कंपनी काही महत्वाचे प्रकल्प पार करू शकली आहे जे की अशक्यप्राय होते. पण जोशींनी एकदा ठरवले तर ते कोणाचे ऐकत नाहीत हे आम्हाला एव्हाना तोंडपाठ झालेले आहे. तुमचे कठीण परिश्रम आणि कामाविषयी निष्ठा खरोखरच प्रशंसनीय आहे. तुम्ही आम्हा सर्वांसाठी एक प्रेरणास्रोत आहेत आणि यापुढेही राहाल.
काही व्यक्ती या अत्तराच्या कुपीसारख्या असतात, त्या तुमच्याजवळ असोत किंवा नसोत त्यांच्या आठवणीचा सुगंध नेहमी तुमच्या आयुष्यात दरवळत राहतो. त्याचप्रमाणे जोशी यांच्याकडून शिकलेल्या बऱ्याच गोष्टी आपल्यासोबत राहणार आहेत. त्यांचा प्रेमळ स्वभाव, सहकार्यांना समजून घेण्याची त्यांची सवय, प्रत्येक गोष्ट सोपी करून सांगण्याचे त्यांचे कौशल्य या गोष्टी आम्हाला सतत आठवत राहतील. माणसाने सतत शिकत राहिले पाहिजे असे जोशींचे नेहमी म्हणणे असायचे. त्यामुळेच ते दरवेळी नवीन नवीन गोष्टी शिकत असतात.
त्यांच्यात सर्वाना एक विद्यार्थी दिसायचा जो सतत उत्सुकतेने प्रश्न विचारून शिक्षकांना भंडावून सोडत असे. कोणत्याही गोष्टीमागे काहीतरी वैज्ञानिक कारण असते अशा मताचा जोशी पुरस्कार करत. जोशी स्वभावाने शांत आणि पाय नेहमी जमिनीवर असणारा माणूस. अतिशय हुशार पण त्या हुशारीचा कधीच बाऊ जोशींनी केला नाही. साधी राहणी आणि उच्च विचार सरणी या विचाराचे पुरस्कर्ते होते असे म्हणले तरी वावगे ठरणार नाही.
शेवटी मी एवढेच म्हणेन कि,
निरोपाचा क्षण नाही, शुभेच्छांचा सण आहे
पाऊल बाहेर पडताना रेंगाळणारे मन आहे।
निरोपाच्या क्षणी एका डोळ्यात हसू अन दुसऱ्यात आसु
मन नितळ नितांत आठवणीत
आम्ही जातो मम ग्रहासी देवा निरोप द्यावा सख्याहरी।।
Retirement Farewell Speech in Marathi सेवानिवृत्ती निरोप समारंभ भाषण Nirop Samarambh Bhashan in Marathi
आदरणीय अतिथी माझे सहकारी आणि सर्व मित्रमंडळींना नमस्कार. आजच्या या सेवानिवृत्ती कार्यक्रमात आपण सर्वांचे स्वागत आहे. आज आपण सर्वानी मला दोन शब्द बोलण्याची संधी दिलीत त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो.
आजही मला २५ वर्षांपूर्वीचा मी आठवतो. या कंपनीमध्ये नवखाच लागू झालो होतो. सारे काही नवीन होते. मला कंपनीमध्ये रुळायला थोडा वेळ लागला होता पण माझ्या वरिष्ठ सहकार्यांनी मला समजून घेऊन सहकार्य केले आणि आज २५ वर्षानंतर या कंपनीतला हा माझा शेवटचा दिवस उजाडला. खरे ते हे वर्ष कसे सारले हे मला समजलेच नाही. तुम्हा सर्वांसोबत माझ्या आयुष्यातील सर्वात चांगले क्षण घालवले आहेत. आणि आनंदाची गोष्ट आहे की, तुम्ही सर्वानी प्रत्येक कार्यात मला साथ देत माझे कर्तव्य पार पाडण्यासाठी योग्य वातावरण उपलब्ध करून दिले.
आज आपली कंपनी उच्च आणि लाभदायक स्थितीमध्ये आहे आणि तुम्हा सर्वांमुळे व्यवस्थापित आहे. म्हणून आज मलाही वाटत आहे कि मला सेवानिवृत्त होण्यासाठी ही योग्य वेळ आहे. आता अन्य तरुण मंडळींनी तसेच मेहनती सहकार्यांनी पुढे येऊन या कंपनीचे कामकाज सांभाळायला हवे.
तुम्हा सर्वांसोबत काम करताना नेहमी उत्साहाने काम व्हायचे. या कार्यकाळात मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. फक्त वरिष्टांकडूनच नाही तर माझ्यापेक्षा लहान असणाऱ्याकडूनही खूप गोष्टी मी आत्मसात करून घेतल्या. या गोष्टींनी मला माझ्या व्यावसायिक तसेच खाजगी आयुष्यातही खूप मदत केली. या कंपनीमुळे मला खूप जिवाभावाचे मित्र आप्तेष्ट मिळाले. या सर्वांकडून मला वेळेचे महत्व, इमानदरी, कामाचे कौशल्य आणि समूहात काम करण्याची कला शिकायला मिळाली. या सर्वांचे मी आभार मानतो. आणि अशीच साथ मला इथूनपुढेही द्यावीत अशी इच्छा व्यक्त करतो.
मी निवृत्त जरी होत असलो तरी या कंपनीशी असलेले माझे नते अतूट आहे. भविष्यात कधीही कंपनीला माझी गरज पडली तर मी अवश्य धावत येईन हा माझा शब्द आहे.
माझे एकाच स्वप्न आहे कि, आपली कंपनी दिवसेंदिवस यश मिळावीत राहो. आपल्या कंपनीला सर्व कर्मचाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांना आपल्या कंपनीवर खूप गर्व आहे. मी तुम्हा सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो आणि अशी कामना जातो की, तुम्ही सर्वजण आपापल्या जीवनात यश प्राप्ती करो. कंपनीतील तरुण मंडळींना शिकण्यासाठी खूप काही आहे. म्हणून आपले लक्ष नेहमी कामावर केंद्रित असुद्या. भविष्यात तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.
शेवटी मी एवढेच म्हणेन,
निरोप आपला घेताना मम कंठ दाटुनी आला ।
गत काळातील आठवणींचा पूर लोचनी आला ।।
कोण कोठले आलो आपण एक छत्राखाली ।
पूर्वीची पुण्याई म्हणुनी भेट आपली झाली ।।
भव्य असा हा निरोप घेता हृदय हेलावले ।
आनंदाश्रू दाटून येत मन सैर भैर झाले ।।
धन्यवाद.
मराठीप्रो हि वेबसाईट मराठी लोकांसाठी तसेच विद्यार्थ्यांसाठी Wikipedia च आहे. अशाच अनेक प्रकारच्या मराठी भाषणे तसेच नविन निबंधाचे अपडेट मिळविण्यासाठी या वेबसाईटला सबस्क्राईब करा. स्क्रीनवर येत असलेल्या पॉप-अप ला सबस्क्राईब केल्यास तुम्हाला निबंध किंवा भाषणे पोस्ट केल्यावर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल.
इतर विषयांवरील निबंध आणि भाषणे :
१. शिक्षक दिन भाषण (Teachers Day Speech in Marathi)
२. व्हॅलेंटाईन आणि 21 व्या शतकातील नाती (निबंध)
३. निबंध: कोरोना महामारी (Corona Essay in Marathi)
४. छत्रपती शिवाजी महाराज माहिती मराठी मध्ये
५. पावसाळा निबंध मराठीमध्ये (Essay on Rainy Season in Marathi)
६. निबंध: रंगपंचमी (रंगपंचमी Essay in मराठी)
७. माझी आई निबंध मराठी Essay on my mother in Marathi
इतर
१. इंग्रजीमधील BFF म्हणजे काय? Meaning of BFF in Marathi
मी एक पूर्ण-वेळ डिजिटल मार्केटर आणि अर्धवेळ ब्लॉगर आहे ज्याला लिहायची, प्रवासाची तसेच या टेकनॉलॉजीच्या युगात अपडेटेड राहायची आवड आहे.
खूप मस्त माहिती दिली, ही माहिती निरोप समारंभात नक्कीच कामी येईल.