Bestie (बेस्टी) हा आपल्या फ्रेंड सर्कल मध्ये सर्रास वापरला जाणारा शब्द. सध्याच्या पिढीमध्ये सोशल मीडियावर Bestie हा शब्द खूप वापरला जातो. ह्या पोस्टमध्ये आपण Bestie म्हणजे काय? Bestie meaning in Marathi बघणार आहोत.
इंग्रजीमधील Bestie म्हणजे काय?
Bestie meaning in Marathi
Meaning of Bestie in Marathi | Bestie शब्दाचा मराठी अर्थ
Bestie (बेस्टि) चा स्पष्ट अर्थ मराठीमध्ये जिवलग मित्र किंवा सर्वोत्कृष्ठ मित्रांपैकी अव्वल असा अर्थ होतो. Bestie म्हणून फक्त सर्वोत्कृष्ट व्यक्तीलाच संबोधले जाते ज्याचे आपल्या आयुष्यात मैत्रीच्या नात्यात महत्वाचे स्थान आहे. सोशल मीडियावर बेस्टी या शब्दाचा खूप वापर केला जातो. बेस्टी वर आधारित जोक्स तसेच मिम्स बनविले जातात.
Bestie या शब्दाचा वापर कुठे करावा?
Bestie (बेस्टी) या शब्दाचा वापर तरुण पिढी जास्त प्रमाणात वापरते. एखाद्या जिवलग मित्राला किंवा मैत्रिणीला संबोधून बोलले जाते. Bestie हा समानलिंगी असू शकतो किंवा विरुद्धलिंगी देखील असू शकतो. Bestie हा शब्द वापरण्यास लिंगाचे (Gender) चे कोणतेही बंधन नसते.
Childhood Bestie meaning in Marathi
Childhood Bestie (चाईल्ड हूड बेस्टी) चा मराठी मध्ये अर्थ लहानपणीचा जिवलग मित्र/मैत्रीण असा होतो. Childhood Bestie हे नाते खूप अनोखे असते. लहानपणापासून खेळले, बागडलेल्या मित्रांना देखील Childhood Friends असे संबोधले जाते पण Childhood Bestie म्हणवून घेणे खूप स्पेशल असते.
My/ Mine Bestie meaning in Marathi
माझा जिवलग मित्र, सर्व मित्रांपैकी हा सगळ्यात पक्का दोस्त तसेच माझा आवडता मित्र असे सम्बोधण्यासाठी My / Mine Bestie असे म्हणतात. मित्रावरील हक्क दाखविण्यासाठी देखील Mine Bestie हे शब्द वापरले जातात.
Tag your Bestie meaning in Marathi
हल्ली सोशल मीडिया प्लॅटफॉर्म चा वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. तरुण पिढी दिवसातून एकदा तरी फेसबुक, ट्विटर,इंस्टाग्राम सारख्या प्लॅटफॉर्म वर थोडा वेळ का असेना भेट देतातच. अशा प्लॅटफॉर्म वर Tag your bestie असे पोस्ट तुम्हाला नक्कीच पहायला मिळाले असतील. तुमच्या मित्र मैत्रिणींना कमेंट मध्ये टॅग करायला लावण्यास सांगितले जाते. काही पोस्टचा मजकूर आपल्या bestie शी मिळते जुळते असल्यास प्रेक्षक स्वतःहून पोस्टमध्ये टॅग करतात.
अशाच पद्धतीचे English मधील महत्वाच्या शब्दांचे मराठीत अर्थ पहाण्यासाठी ‘इंग्रजी प्रो‘ कॅटेगरी ला भेट द्या.
संबंधित इतर पोस्ट