माझा आवडता खेळाडू-महेंद्रसिंग धोनी मराठी निबंध

माझा आवडता खेळाडू-महेंद्रसिंग धोनी मराठी निबंध

माझा आवडता खेळाडू हा मराठी निबंध ह्या लेखात लिहण्याचे कारण कि सध्या वर्ल्डकपचा सिझन चालू आहे. नुकताच फिफाचा वर्ल्डकपही झाला. त्यामुळे मला वाटले कि माझा आवडता खेळ किंवा माझा आवडता खेळाडू ह्या विषयांवर निबंध लिहुयात.

माझा आवडता खेळाडू मराठी निबंध- महेंद्रसिंग धोनी

माझा आवडता खेळाडू मराठी निबंध- महेंद्रसिंग धोनी
माझा आवडता खेळाडू मराठी निबंध- महेंद्रसिंग धोनी

क्रिकेट जगतातील एक अभूतपूर्व आणि अविस्मरणीय नाव म्हणजे महेंद्रसिंग धोनी म्हणजेच आपला माही. खरंतर भारतीय संघाचा सर्वोत्तम कर्णधार महेंद्रसिंग धोनी आज आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत नाही कारण त्याने निवृत्ती घेतली आहे. पण आजही तो करोडो चाहत्यांच्या मनात घर करूनआहे. आजही माही आयपीएलमध्ये चेन्नईच्या टीमसोबत खेळताना आम्हाला दिसतो.तुम्हाला माहित असेलच की महेंद्रसिंग धोनी ज्याची फिनिशिंग स्टाईल सर्वांना आवडते.आज भारतातील सर्व खेळाडू धोनीला आदर्श मानतात. आणि त्यांच्याकडून सल्ला घेऊन काम करतात. विशेष म्हणजे धोनी हा भारताचा एकमेव असा कर्णधार होता ज्याने भारतीय संघाला सर्व ट्रॉफी मिळवून दिल्या.

धोनीची फलंदाजीची आक्रमक वृत्ती सर्वांनाच आवडते.धोनीचे हेलिकॉप्टर शॉट प्रत्येक खेळाडूने मारण्याचा प्रयत्न केला.धोनी शेवटच्या चेंडूपर्यंत संघासाठी झगडायचा आणि जो सामना हातातून निसटला तोही सामना धोनी जिंकुन दाखवायचा,त्याच्या याच कौशल्यामुळे महेंद्रसिंग धोनी आज जगातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून परिचित आहे. खरं सांगायचं झालं तर धोनी कधीही हार मानत नाही. उदाहरणार्थ, चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना किंवा आफ्रिकेविरुद्धचा सामना ज्यामध्ये भारताने विजय मिळवला.त्यावेळी धोनीच्या वेगवान स्टंपिंगने कोण प्रभावित झाले नाही.धोनीने 1 सेकंदापेक्षा कमी वेळात स्टंप उडवले.हा विक्रम आजपर्यंत जगात कोणीही मोडू शकलेले नाही.

महेंद्रसिंग धोनी लहानपणी सर्व खेळ खेळायचा. सुरुवातीला त्यांचा आवडता खेळ फुटबॉल होता.ज्यामध्ये तो गोलरक्षक असायचा.पण त्याची प्रतिभा पाहून त्याच्या प्रशिक्षकाने त्याला क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला.माहीने ते अंगीकारले आणि क्रिकेटकडे जीव झोकून दिला. सुरुवातीला क्रिकेटमध्ये फारशी कामगिरी करता आली नाही.पण जगाला मात्र एक वेगळ्या शैलीचा कर्णधार आणि खेळाडू मिळाला होता.

खरंतर वयाच्या १८ व्या वर्षी त्याच्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात झाली.रणजीमध्ये चांगली कामगिरी करूनही त्याला भारतीय संघात संधी मिळत नव्हती, कारण त्यावेळी सचिन, सेहवाग, गंभीर, द्रविड, युसूफ असे अनेक खेळाडू असल्यामुळे संघात स्थान मिळवणे सोपे नव्हते.पण त्यावेळी 2007 मध्ये दिग्गजांनी विश्वचषक खेळण्यास नकार दिल्याने तरुणांना संधी मिळाली आणि माहीला या युवा संघाचा कर्णधार बनवण्यात आले.आणि इतकंच नव्हे तर धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने विश्वचषक जिंकला.यानंतर धोनीने भारतीय संघाची धुरा सांभाळली. या विश्वचषकात युवराज सिंग आणि गौतम गंभीर यांची चांगली कामगिरी पाहायला मिळाली. 2011 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये धोनीने 28 वर्षांनंतर पुन्हा एकदा भारताला विजेतेपद मिळवून दिले.

माहीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आशिया चषक, विश्वचषक आणि इतर अनेक यश मिळवले.भारतीय संघाला अजूनही धोनीसारख्या खेळाडूची गरज आहे. धोनी अजूनही भारतीय खेळाडूंना मार्गदर्शन करतो.भारताने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली 2007 मध्ये झालेल्या विश्व T20 स्पर्धा जिंकल्या, त्यानंतर धोनी आपल्या भूमीवर 2011 विश्वचषक जिंकून भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार बनला. न्यूझीलंडसह अनेक देशांच्या परदेश दौऱ्यांवर त्यांनी आपल्याच भूमीवर मालिका जिंकून आपली प्रतिभा आणि कार्यक्षम नेतृत्व दाखवून दिले.

माहीच्या नेतृत्वाखाली भारताने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये सर्वोच्च स्थान मिळवले. विश्वचषक 2011 च्या अंतिम सामन्यात धोनीच्या नाबाद 91 धावांच्या खेळी आणि सहा षटकारांसह विजयाचे क्षण दीर्घकाळ स्मरणात राहील.या सामन्यासाठी तो सामनावीर म्हणूनही निवडला गेला. या विजयासह भारत दोन विश्वचषक जिंकणारा इंडीज आणि कांगारू संघानंतरचा तिसरा संघ ठरला आहे. धोनीने आपल्या खेळाच्या जोरावर अनेक यश मिळवले, ज्यासाठी त्याचा गौरवही करण्यात आला. 2008 मध्ये त्याला वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला होता. तोपर्यंत हा बहुमान मिळवणारा धोनी पहिला भारतीय खेळाडू होता.

खरंतर धोनी हा हा मैदानात खुप शांत असतो आणि म्हणूनच त्याला आपण कॅप्टन कुल म्हणून सुद्धा ओळखतो.रेल्वेत टीसी ची नौकरी ते जगातील सर्वोत्तम कर्णधार हा प्रवास जर साध्य करायचे असेल तर जगात धोनी शिवाय दुसरा पर्याय च नाही ही वस्तुस्थिती आहे.आजही धोनीची लोकप्रियता इतकी आहे की त्याला मैदानात बघण्यासाठी लोक त्याची आतुरतेने वाट बघत असतात. खरंच या खेळाडूने कर्तृत्व तर खूप गाजवलं पण करोडो लोकांच्या मनात स्वतःच एक वेगळं घर निर्माण करून गेलं हे मात्र नक्की.

असेच नवनवीन आणि वैशिष्ट्यपूर्ण लेख वाचण्यासाठी MarathiPro या आमच्या वेबसाईट ला नक्की भेट द्या, इथं तुम्हाला ते मिळतं जे कुठंच नाही मिळत..!

इतर विषयांवरील निबंध आणि भाषणे :

१. शेतकरी जगाचा पोशिंदा,शेतकरी निबंध मराठीमध्ये Essay on Farmer

२. माझा आवडता नेता निबंध-हिंदुहृदय सम्राट श्री. बाळासाहेब ठाकरे

३. झाडे लावा झाडे जगवा निबंध Zade Lava Zade Jagva Essay in Marathi

४. छत्रपती शिवाजी महाराज माहिती मराठी मध्ये

५. Essay on Pollution in Marathi । प्रदूषण- एक जागतिक समस्या

3/5 - (2 votes)

Chetan Jasud

मी एक पूर्ण-वेळ डिजिटल मार्केटर आणि अर्धवेळ ब्लॉगर आहे ज्याला लिहायची, प्रवासाची तसेच या टेकनॉलॉजीच्या युगात अपडेटेड राहायची आवड आहे.