Zip meaning in Marathi बघायचाच असेल तर आपल्याला हा शब्द कुठे वापरला जातो हे जाणून घेऊया, तुम्ही Zip हा शब्द पोस्ट कार्ड, कुठेतरी पत्ता लिहिते वेळी किवा वाचतेवेळी ऐकला असेल. तसेच हा शब्द कॉम्पुटर वाहणाऱ्या लोकांकडून देखील ऐकला असेल . तर आपण ह्या पोस्ट मध्ये Zip म्हणजे काय ? तसेच Zip Code आणि Zip File म्हणजे काय हे पाहुयात.
1. Zip Code म्हणजे काय? (Zip Code चा मराठी अर्थ)
Zip Code म्हणजे “Zone Improvement Plan” याचा संक्षिप्त रूप आहे. हे एका विशिष्ट ठिकाणासाठी असलेले संख्यात्मक कोड असते, जे टपाल वितरण प्रक्रिया सोपी आणि वेगवान करण्यासाठी वापरले जाते. आपण Online काहीतरी मागविणार असाल तर Pin Code किंवा झिप Code असा हमखास ऑप्शन असतोच .
भारतामध्ये Zip Code म्हणजे काय?
भारतात, Zip Code ऐवजी PIN Code (Postal Index Number) वापरला जातो. हा 6 अंकी कोड असतो, जो देशभरातील प्रत्येक ठिकाणासाठी वेगळा असतो. प्रत्येक गावाला किंवा मोठे शहर असेल तर प्रत्येक निर्धारित भागासाठी विशिष्ट कोड दिलेला असतो .
Zip Code चे महत्त्व:
- टपाल, कुरिअर किंवा पार्सल योग्य पत्त्यावर पोहोचण्यासाठी मदत होते.
- बँकिंग, ई-कॉमर्स आणि विविध ऑनलाइन सेवांसाठी आवश्यक असतो.
- सरकारी कागदपत्रांमध्ये पिन कोड वापरणे बंधनकारक असते.
उदाहरण:
📌 मुंबईचे काही Zip Codes (PIN Codes):
- चर्चगेट – 400020
- दादर – 400028
- अंधेरी – 400058
2. Zip File म्हणजे काय? (Zip File चा मराठी अर्थ
Zip File ही एक प्रकारची संगणकीय फाइल फॉरमॅट आहे, जी अनेक फाइल्स एकत्र संकुचित (Compressed) करून एकाच फाइलमध्ये साठवते.
Zip File चे फायदे:
- मोठ्या फाइल्स लहान आकारात रुपांतरित करता येतात.
- अनेक फाइल्स एका फोल्डरमध्ये एकत्र करून पाठवणे सोपे होते.
- डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी पासवर्ड संरक्षित करता येतो.
Zip File कशी ओपन करायची?
Zip फाइल उघडण्यासाठी Windows, Mac आणि मोबाइल डिव्हाइसेसवर विविध सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत.
📌 Windows आणि Mac: WinRAR, 7-Zip, WinZip
📌 Android आणि iPhone: ZArchiver, RAR
उदाहरण:
समजा, तुम्हाला 10 फोटो ईमेलद्वारे पाठवायचे आहेत. जर प्रत्येक फोटो 5MB चा असेल, तर एकूण साइज 50MB होईल. पण जर तुम्ही त्यांना Zip करून पाठवलं, तर फाइलचा आकार 10-20MB होऊ शकतो.
हेदेखील वाचा:
Gorgeous meaning in Marathi | Gorgeous म्हणजे काय?
Quarter Meaning in Marathi | Quarterly meaning in Marathi
Designated & Designation meaning in Marathi
Marathi meaning of Spouse | Spouse meaning in Marathi