YouTube वरील व्हिडियो डाउनलोड करण्याच्या 2 सोप्या पद्धती

YouTube वरील व्हिडियो डाउनलोड करण्याच्या 2 सोप्या पद्धती

YouTube ही जगातील टॉप वेबसाईट्स पैकी एक असून वेळ घालविण्याच्या बाबतीत युट्युब दुसऱ्या क्रमांकावर आहे. लोक या वेबसाईटवर यावरील दर्जेदार व्हिडीओ मुळे आवर्जून आपला वेळ घालवितात. युट्युब आपल्याला त्यावरील व्हिडियो पहाण्याची, व्हिडियो अपलोड करण्याची सोय उपलब्ध करून देतेच सोबत ठराविक व्हिडियो साठी मोबाईल अँप मध्येच डाउनलोड करण्याची सोय देखील उपलब्ध करून दिलेले आहे. पण, युट्युब वरून जर आपल्याला व्हिडियो आपल्या मोबाईल मध्ये किंवा कॉम्पुटर मध्ये डाउनलोड करण्याचा ऑप्शन मात्र दिलेला नाही. त्यामुळे YouTube वरून व्हिडियो कसा डाउनलोड करावा हे आपण पाहूया…

YouTube वरून मोबाईल मध्ये व्हिडियो डाउनलोड करण्याची पद्धत

मोबाईल वरून युट्युबचे व्हिडियो डाउनलोड करण्यासाठी तुम्ही खालील २ पर्याय वापरू शकता.

थर्ड पार्टी अँड्रॉइड अप्लिकेशन वापरून

इंटरनेटवर असे भरपूर अँड्रॉइड ऍप्लिकेशन्स आहेत ज्याचा वापर करून आपण व्हिडियो डाउनलोड करू शकतो. सध्याचा ट्रेंड पहाता विडमेट अँप प्रसिद्ध आहे. व्हिडियो शेयर साठी पर्याय असतो (खालील फोटो मध्ये पहा) तो वापरून आपण इंस्टाग्राम, फेसबुक तसेच इतर प्रसिद्ध प्लॅटफॉर्म वरून आपण व्हिडियो डाउनलोड करू शकतो.

YouTube video kse download krayche
मोबाईल YouTube अँप व्हिडियो च्या खाली शेयर ऑप्शन असतो तिथे क्लिक करून खाली दाखविल्याप्रमाणे पर्याय निवडावा
युट्युब व्हिडियो डाउनलोड
शेयर बटन वर क्लिक केल्यावर हे ऑप्शन दिसतील, त्यातील वीडमेंट अँप च्या ऑप्शन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतो.

YouTube वरून कॉम्पुटर मध्ये व्हिडियो डाउनलोड करण्याची पद्धत

कॉम्पुटर वर YouTube वरील व्हिडियो डाउनलोड करण्याची पद्धत देखील सोप्पी आहे. तुम्ही YouTube वेबसाईट वर व्हिडियो पहात असते वेळी ब्राऊजर मध्ये तुमच्या लक्षात आले असेल कि प्रत्येक व्हिडियो ला विशिष्ट URL म्हणजे लिंक असते. इंटरनेटवर अशी काही संकेस्थळे आहेत जिथे तुम्ही हि लिंक कॉपी करून पेस्ट केल्यास व्हिडियो पटकन डाउनलोड करता येईल.या

या व्यतिरिक्त आणखी एक सोप्पी पद्धत आहे जिचा वापर करून पटकन व्हिडियो डाउनलोड करू शकता. जेव्हा आपण ब्राऊजर मध्ये युट्युब व्हिडियो बघत असते वेळी एक लिंक येत असते त्या लिंक च्या सुरुवातीला ‘ss’ असे टाईप करून सर्च केल्यास तुम्ही व्हिडीओ डाउनलोड वर जाल, तिथे तुम्ही व्हिडियो क्वालिटी निवडून व्हिडियो डाउनलोड करू शकता.

युट्युब व्हिडीओ डाउनलोड

अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या टिप्स वरील पोस्ट्स वाचण्यासाठी ‘MarathiPro‘ या आमच्या मराठी ब्लॉग ला भेट देत रहा.

यासंबंधित इतर पोस्ट्स:

बिटकॉइन काय आहे? बिटकॉइन ची किंमत इतकी जास्त का आहे?

कॉम्पुटर वर व्हॉट्सॲप वापरण्याच्या 2 सोप्प्या पद्धती

रु. 500 च्या आतील Best इयरफोन्स – हेडफोन्स

Chetan Jasud

मी एक पूर्ण-वेळ डिजिटल मार्केटर आणि अर्धवेळ ब्लॉगर आहे ज्याला लिहायची, प्रवासाची तसेच या टेकनॉलॉजीच्या युगात अपडेटेड राहायची आवड आहे.

One thought on “YouTube वरील व्हिडियो डाउनलोड करण्याच्या 2 सोप्या पद्धती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *