वर आणि वधूसाठी
जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने …. रावांचे नाव घेते बायको या नात्याने
1
सोन्याचे ताट,चंदनाचा पाट, पंचपंक्वानांचा थाटमाट...
रावांचा नाव घेते सोडा माझी वाट
2
दिवसापाठी रात्र येते हा पाठशिवणीचा खेळ…रावांचा वृक्ष तेथे माझे जीवन वेल
3
श्री गणेश आहे शिव पार्वती चा पुत्र,
….रावांच्या नावाचे घालते मंगळसुत्र
4
सायंकाळच्या वेळी मनस्कार करते देवाला
…… चे नाव घेताना आनंद होतो मनाला
5
रूप्याच्या वाटीत सोन्याचा चमचा
……. चे नाव घेऊन आशिर्वाद मागते सर्वांचा
6
सुख समाधान, शांती तेथे देवाची वस्ती
……….ना आयुष्य मागते माझ्यापेक्षा जास्ती
7
निळ्या-निळ्या आकाशात शोभून दिसतात चंद्र-तारे
………रावांच्या संगतीने उजळले जीवन सारे
8
संगमरवरी देवळात बसवली रामाची मूर्ती
…… रावाशी लग्न झाले, झाली इच्छापूर्ती
9
चांदीच्या तबकात ठेवले नवसाचे पेढे . …..रावांच्या दर्शनाने मन झाले वेडे
10
वाचा १५०+ उखाणे
marathipro.com