मुख्यमंत्री योजनादूत योजना मिळवा महिन्याला रु.10000

महाराष्ट्र शासनाने ह्या 2024 साली अनेक लोकहिताच्या योजना आणलेल्या आहेत . ह्यातील मुख्यमंत्री योजनादूत हि नुकतीच सरकारने योजना जाहीर केली आहे . माझी लाडकी बहीण आणि माझा लाडका भाऊ योजनेंनंतर आपण मुख्यमंत्री योजनादूत योजनेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत .

मुख्यमंत्री योजनादूत योजना काय आहे ?

महाराष्ट्र सरकारने शासन आपल्या दारी हि योजना राबवली आहे . मुख्यमंत्री योजनादूत योजना हि शासन आपल्या दारी योजनेचा विस्तारित भाग आहे . समाजामध्ये बदल घडविण्याचा ज्यांचा उद्देश आहे अशा युवकांनी ह्या योजनेमध्ये भाग घेऊ शकता . मुख्यमंत्री योजनादूत योजना मार्फत राज्यातील 50,000 युवकांना इंटर्नशिप ची संधी मिळणार आहे .

मुख्यमंत्री योजनादूत योजना पात्रता

मुख्यमंत्री योजनादूत योजना पात्रता
  • अर्जदार हा १८ ते ३५ वयोगटातील असावा.
  • अर्जदाराचे शिक्षण कोणत्याही शाखेच्या पदवी पर्यंत झालेले असावे .
  • उमेदवाराला संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे .
  • स्वतःकडे अद्यायावत मोबाईल असणे आवश्यक आहे .
  • उमेदवार महाराष्ट्राचा नागरिक असावा .
  • उमेदवाराचे बँक अकाउंट व आधार कार्ड असणे आवश्यक असून ते लिंक असायला हवे .

मुख्यमंत्री योजनादूत योजना फायदे

  • प्रति महिना रु . 10000 इंटर्नशिप स्टायपेंड रूपात मिळवण्याची संधी
  • प्रत्यक्ष कामाचा अनुभव
  • शिकण्याबरोबर कौशल्य विकासाची संधी
  • सरकारी कामकाजाचा अनुभव या संधी मार्फत मिळणार आहे
  • राज्यातील 50000 युवकांना ह्या योजनेचा फायदा घेता येणार आहे .

मुख्यमंत्री योजनादूत योजनेसाठी कसा अर्ज करावा? How to apply for Mukhyamantri Yojanadoot

  • मुख्यमंत्री योजनादुत योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही Official Website ला भेट देऊ शकता .
  • वरील वेबसाईट वर भेट देऊन नोंदणी बटन वर क्लिक करून माहिती भरू शकता .

हे देखील वाचा : 

माझा लाडका भाऊ योजना 2024 : पात्रता, कागदपत्रे, वेबसाईट

लाडकी बहीण योजना