लोकमान्य बाळ गंगाधर टिळक मराठी निबंध

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक (Lokmanya Bal Gangadhar Tilak ) हे स्वातंत्र्य चळवळीतील पहिले नेते होते. ह्या लेखामध्ये आपण त्यांच्या जीवनावर आधारित मराठी निबंध लिहिणार आहोत. महात्मा गांधींनी लोकमान्य टिळकांना आधुनिक भारताचा निर्माता असे म्हटले आहे.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक मराठी निबंध

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक मराठी निबंध

“स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच” अशी सिहगर्जना करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरीमधील चिखली या गावात झाला. त्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते. त्यांचे शिक्षण पुणे या शहरात झाले. शाळेमध्ये खूप हुशार, कुशाग्र होते. गणित विषयात ते खूप लोकप्रिय होते, कोणतेही गणित सोडवायला दिले कि सगळ्यात आधी सोडवून दाखवायचे.

एका दिवशी टिळकांच्या वर्गांमध्ये मधल्या सुट्टीत काही मुलांनी एकमेकांना वाटून शेंगा खाल्ल्या आणि त्याचे टरफल वाटेल तिथे टाकून दिलेलेत. थोडया वेळानी तास सुरु झाल्यावर वरगंडे गुरुजी आले. त्यांनी वरग्रामदे आल्यानंतर सगळीकडे पडलेली पाहून सर्वाना विचारले कि शेंगा कोणी खाल्ल्या होत्या. तेव्हा कोणीच उत्तर दिले नाही, मग नंतर गुरुजींनी सर्वाना ते टरफल उचलायला सांगितले. सगळेजण टरफल गोळा करत होते, पण टिळक तिथेच शांत बसलेले. मग गुरुजींनी टिळकांना विचारलं कि तू का टरफल गोळा करत नाहीस. मग टिळक म्हणाले “गुरुजी मी शेंगा खाल्ल्या नाहीत म्हणून मी टरफल उचलणार नाही.” यावर गुरुजी म्हणाले “असं होय मग मगाशी मी विचारलेलं तेव्हा का शांत बसलेलास, आता सांग कोणी हे टाकलेलं?” मग टिळक म्हणाले “गुरुजी मला कोणाची चहाडी करायची नाही, म्हणून मी शांत बसलेलो” यावर गुरुजी चिडून टिळकांना बोलले एक तर शेंगा कोणी खाल्ल्या ते तू सांग, नाहीतर ते टरफल उचल. यातील जर काहीच करणार नाहीस तर वर्गातून बाहेर जा.” टिळकांनी आपलं दप्तर घेतलं व वर्गातून बाहेर आले. टिळकांनी त्यांच्या मित्रांची चहाडी पण केली नाही आणि न केलेल्या चुकीची शिक्षा हि भोगली नाही.

टिळक १६ वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. टिळकांनी १८७७ मध्ये डेक्कन मध्ये गणित या विषयात B.A ची डिग्री केली. नंतर त्यांनी M.Aअर्ध्यातच सोडून दिले आणि L.L.B केली. डिग्री पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पुण्यामध्ये एका शाळेत गणित विषय शिकवण्यास सुरुवात केली. नंतर त्यांनी ती शाळा सोडून दिली आणि नवीन शाळा सुरु केली.

कालांतराने टिळकांनी हे सगळं सोडून दिले आणि पॉलिटिक्स मध्ये गेले. १८९० मध्ये त्यांनी इंडियन नॅशनल काँग्रेस जॉईन केले. १९०५ मध्ये जेव्हा बंगाल चा बटवारा झाला तेव्हा टिळक, लाला लचपत राय आणि बरेच लीडर्स समोर आले, आणि म्हणाले जर आता आपण काही केलं नाही तर भारताची पण विभागणी होईल. मग त्यावेळेला लोकांना आपले मत कस पोहोचवायचं त्यासाठी त्यांनी ‘केशरी’ आणि ‘मराठी’ हे न्युजपेपराची स्थापना केली.

१९०२ ते १९०३ या साली पुण्यात प्लेग या रोगाने थैमान घातले होते, दुर्दैवाने एकाच आठवड्यात टिळकांचा चुलतभाऊ आणि भाचा प्लेगला बळी पडला, त्याच आठवड्यात त्यांचा मोठा मुलाचा देखील प्लेगमुळे मृत्यू झाला.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक – मराठी निबंध

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक - मराठी निबंध

बाळ गंगाधर टिळक हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक महान नेता, समाजसुधारक आणि पत्रकार होते. त्यांना “लोकमान्य” हा किताब जनतेनेच दिला. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच!” हे त्यांचे प्रसिद्ध घोषवाक्य भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा आत्मा बनले. बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी येथे झाला. ते लहानपणापासूनच हुशार, जिद्दी आणि देशभक्तीने भारलेले होते. पुणे येथे त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आणि गणित विषयात विशेष प्रावीण्य मिळवले.

टिळकांनी शिक्षणानंतर समाजाच्या जागृतीसाठी पत्रकारिता आणि राजकारणाचा मार्ग स्वीकारला. त्यांनी ‘केसरी’ (मराठीत) आणि ‘मराठा’ (इंग्रजीत) हे वृत्तपत्रे सुरू करून ब्रिटिश सरकारच्या अन्यायकारक धोरणांचा विरोध केला.

त्यांनी राष्ट्रीय एकात्मतेसाठी गणपती उत्सव आणि शिवजयंती उत्सव सुरू केले. या उत्सवांमुळे लोक एकत्र येऊन स्वातंत्र्यलढ्याच्या विचारधारेत सामील झाले.

टिळक हे ‘लाल-बाल-पाल’ या तिकडीतील एक महत्त्वाचे नेते होते. त्यांनी होमरूल चळवळ सुरू केली, जी लोकांमध्ये स्वराज्याची आस जागवणारी ठरली. ब्रिटिशांनी त्यांना कैदेत टाकले आणि मंडालेच्या तुरुंगात सहा वर्षे पाठवले. त्या काळात त्यांनी ‘गीतारहस्य’ हे महान ग्रंथलेखन केले.

टिळक हे फक्त राजकीय नेते नव्हते, तर समाजसुधारणेसाठीही ते पुढे होते. त्यांनी महिलांचे शिक्षण, बालविवाह निर्मूलन आणि अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले.

लोकमान्य टिळक यांनी आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण देशासाठी अर्पण केला. १ ऑगस्ट १९२० रोजी त्यांचे निधन झाले, परंतु त्यांचे विचार आजही प्रत्येक भारतीयाच्या हृदयात जिवंत आहेत. त्यांच्या कार्यातूनच पुढे स्वातंत्र्यलढा अधिक तीव्र झाला आणि भारत १९४७ मध्ये स्वतंत्र झाला.

“टिळकांचे विचार आजही आपल्याला प्रेरणा देतात. त्यांच्या कार्याचा आदर्श ठेवून आपणही समाज आणि देशाच्या प्रगतीसाठी योगदान देऊ या!” 🚩

इतर विषयांवरील निबंध आणि भाषणे :

१. शिक्षक दिन भाषण (Teachers Day Speech in Marathi)

२. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मराठी निबंध (Best: Independence Day Essay in Marathi)

३. निबंध: कोरोना महामारी (Corona Essay in Marathi)

४. छत्रपती शिवाजी महाराज माहिती मराठी मध्ये

५. माझा आवडता नेता निबंध-हिंदुहृदय सम्राट श्री. बाळासाहेब ठाकरे

६ . New Rakshabandhan Essay in Marathi । रक्षाबंधन मराठी निबंध

७ . माझा आवडता खेळाडू-महेंद्रसिंग धोनी मराठी निबंध

८ . वाढती लोकसंख्या Loksankhya Vadh : मराठी निबंध