कॉम्पुटर वर व्हॉट्सॲप वापरण्याच्या 2 सोप्प्या पद्धती

कॉम्पुटर वर व्हॉट्सॲप वापरण्याच्या 2 सोप्प्या पद्धती

आजच्या युगात व्हॉट्सॲप वापरणे हि गरज बनली असून हे आजकाल मोबाईल मधील मूलभूत अप्लिकेशन बनले आहे. व्हॉट्सॲप मोबाईल वर वापरण्या सोबत कधी कधी अशी वेळ येते कि आपल्याला व्हॉट्सॲप वर आलेल्या फोटो किंवा कागदपत्रांची प्रिंट काढायची असते. अशावेळी आपण मोबाईल वरून प्रिंट काढायची असेल तर अनेक तांत्रिक अडचणी भासतात. यासाठी जर तुम्ही व्हॉट्सॲप तुमच्या लॅपटॉप किंवा कॉम्पुटर वर वापरणार असाल तर व्हॉट्सॲप ने आपल्यासाठी २ मार्ग उपलब्ध करून दिले आहेत.

कॉम्पुटर वर व्हॉट्सॲप वापरण्याच्या पद्धती:

१. डेस्कटॉप अप्लिकेशन इंस्टॉल करून

या पद्धतीत आपल्याला कॉम्पुटर वर व्हॉट्सॲप चे डेस्कटॉप व्हर्जन असलेले अप्लिकेशन इन्स्टॉल करावे लागते. यासाठी डेस्कटॉप साठी अप्लिकेशन तुम्हाला व्हॉट्सॲपच्या अधिकृत संकेतस्थळावरून डाउनलोड करावे लागेल. अप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करून डाउनलोड करा- डाउनलोड व्हॉट्सॲप डेस्कटॉप अप्लिकेशन

व्हॉट्सॲप Whatsapp on Computer

डाउनलोड केल्यांनतर आपल्याला बारकोड स्कॅन करण्याचा ऑप्शन येईल.

Whatsaap Software
व्हाट्सअँप इन्स्टॉल केल्या नंन्तर हि स्क्रीन येईल

या नंतर आपल्याला आपला मोबाईल मधील Whatsapp अँप मध्ये जाऊन सगळ्यात वर तीन डॉट असलेल्या मेनू वर क्लिक करून Whatsapp Web वर क्लिक केल्यावर एक स्कॅनर येईल, त्याने हा कोड स्कॅन करावा लागेल.

२. थेट वेब ब्राऊजर मधून व्हाट्सअप उघडणे

दुसऱ्या पद्धतीत व्हाट्सअप आपल्याला एक सोपी पद्धत सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. यामध्ये फक्तं आपल्यला अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपल्याला मोबाईल मधील अप्लिकेशन च्या मदतीने बार कोड स्कॅन करावा लागेल. हि पद्धत वापरण्यासाठी खालील स्टेप्स चा वापर करू शकता.

Whatsapp Web Marathi

१. अधिकृत संकेस्थळावर व्हाट्सअप च्या वेब व्हर्जन पेज ला भेट द्या. (गुगलवर तुम्ही ‘Whatsapp Web’ शब्दाने सर्च केल्यास देखील आपल्याला हे वेब व्हर्जन सापडेल.

२. या पेजला उघडल्यास थेट पहिल्या पद्धतीत दाखविल्या प्रमाणे स्कॅन साठी कोड येईल तो मोबाईल वरून स्कॅन केल्यावर आपले व्हाटसअँप आपण कॉम्पुटरवर वापरू शकाल.

Whatsapp अँप वरून प्रिंट कशी काढावी

जर तुमच्या घरी प्रिंटर असेल तर तुम्ही व्हाट्सअँप वेब वरून थेट प्रिंट देऊ शकता. यासाठी तुम्हाला आलेली फाईल डाउनलोड करून त्यावर क्लिक करून प्रिंट द्यावी लागेल. कधी कधी आपण बाहेर असताना देखील प्रिंट काढायची गरज भासते, अशावेळी तुम्ही एखाद्या नेट कॅफेला भेट देऊन तिथे व्हाट्सअँप वेब ओपन करून प्रिंट काढू शकता. पण काम झाल्यावर कम्प्युटर वरून व्हाट्सअँप लॉगऑऊट करायला विसरू नका.

खालील लेख वाचायला विसरू नका

१. बिटकॉइन काय आहे? बिटकॉइन ची किंमत इतकी जास्त का आहे?

२. रु. 500 च्या आतील Best इयरफोन्स – हेडफोन्स

अशाच टेक्नॉलॉजी वर आधारित माहितीसाठी याब्लॉग मराठी ब्लॉगला वारंवार भेट द्या.

Chetan Jasud

मी एक पूर्ण-वेळ डिजिटल मार्केटर आणि अर्धवेळ ब्लॉगर आहे ज्याला लिहायची, प्रवासाची तसेच या टेकनॉलॉजीच्या युगात अपडेटेड राहायची आवड आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *