अमेझॉन वरील या स्वस्त वस्तू खरेदी करून घर सजवा नव्या पद्धतीने!

अमेझॉन वरील या स्वस्त वस्तू खरेदी करून घर सजवा नव्या पद्धतीने!

दिवाळीची लगबग तर सर्वांच्या घरी चालूच असेल, काही जण फराळ बनविण्यात व्यस्त असतील तर काहीजणांचा अजून घर सजविण्यासाठी नविन काय वापरूया हा विचार चालू असेल. नुकताच अमेझॉन चा मोठा सेल येऊन गेला काही जणांनी टेलिव्हिजन सेट तर काहींनी लॅपटॉप खरेदी करून चांगलीच ऑफर लुटली म्हणाले तरी चालेल.

आज ह्या पोस्ट मध्ये मी कोणतीही महागडी वस्तू खरेदी करा असं सांगणार नाहीये तर मी माझ्या घरासाठी निवडलेल्या काही वस्तू आहेत जे मी नुकतेच ऑर्डर केले आहेत व तुम्हालाही आवर्जून या कमी किंमतीतील वस्तू घर सजविण्यासाठी नक्की ऑर्डर करा असे सांगेन. सध्या वेगवेगळे ऑफर चालू असल्याने यांच्या किंमतीत थोडाफार बदल होऊ शकतो.

टॉप ३ वस्तू ज्या तुम्ही घर सजविण्यासाठी खरेदी करू शकता

१. Quace 12 Stars Curtain String Lights | युनिक लाईटमाळ

दिवाळी असो किंवा गणेशचतुर्थी लाईट माळ असल्याशिवाय मजाच नाही. घराला किंवा घराच्या एखाद्या भागाला जरीही लाइटमाळ सोडली असेल तर घरात प्रसन्न वातावरण असल्या सारखे वाटते. मी तुमच्यासाठी एक युनिक लाइटमाळ शोधली आहे ज्यामध्ये तुम्ही पणत्या, फुले व स्टार्स च्या आकाराचे LED घेऊ शकता. एखाद्या भिंतीला, गॅलरीत, किंवा पडद्यावर हे लाईट्स सोडले तर खूप मस्त दिसेल यात शंकाच नाही. याला रेटिंग देखील चांगली आहे व किंमतही तितकी जास्त नाहीये.

किंमत : रु. ५००

Buy on Amazon

२. Mosaic Glass Votive Tealight Candle Holders । कॅण्डल होल्डर

दुसरी पसंती मी दिली आहे फॅन्सी कॅण्डल होल्डर ला. बाजारात अनेक प्रकारचे कॅण्डल होल्डर मिळतात पण त्या सर्वांमध्ये मला हे होल्डर विशेष वाटले. आपल्याला बाजरात मेन पणत्यांचे जे पाकीट मिळते त्या पणत्या यामध्ये लावल्या तरी चालतील. प्रकाश हा ह्यातील छिद्रांमधून बाहेर जात असल्याने पायरीवर किंवा बाल्कनी स्पेस मध्ये खूप छान दिसेल. दारात रांगोळी काढून मध्यभागी हे होल्डर ठेवल्यास उठूनही दिसेल.

किंमत : रु. २७५

Buy on Amazon

३. Plastic Hanging Style Electronic Diya । पणत्यांचे तोरण

एकावर एक पणत्या, तेही तोरण.. मला तर हे बघूनच पसंत पडले. हे इलेक्ट्रॉनिक असल्याने आपण दरवाजाला तोरणासारखे किंवा देवघरात/ पूजेच्या ठिकाणी लटकवू शकता. ह्यात तुम्हाला १० पणत्या असतील व प्रत्येक पणतीला ७ LED bulb मिळतील. हे दिसायला खूप मस्त दिसणार हे नक्की. याची किंमत वरील वस्तूंपेक्षा जास्त जरी असली तरी यामध्ये आपल्याला वस्तू देखील त्याप्रमाणात आहे.

किंमत : रु.१५००

Buy on Amazon

वरील वस्तूंपैकी बहुतांश वस्तू आपल्याला गणपती तसेच इतर सणांना देखील वापरण्या योग्य आहेत. पणत्यांचे तोरण हे आपण गणपती उत्सव तसेच दसऱ्याला देखील वापरू शकतो त्यामुळे वरील वस्तू या पैसे वसूल होण्यासारख्या आहेत. अधिक डिल्स जाणून घेण्यासाठी MarathiPro या आमच्या वेबसाईटला जरूर भेट देत रहा.

5/5 - (1 vote)

Chetan Jasud

मी एक पूर्ण-वेळ डिजिटल मार्केटर आणि अर्धवेळ ब्लॉगर आहे ज्याला लिहायची, प्रवासाची तसेच या टेकनॉलॉजीच्या युगात अपडेटेड राहायची आवड आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *