भारतामधून क्रिप्टोकरन्सी मध्ये गुंतवणूक कशी करायची?

भारतामधून क्रिप्टोकरन्सी मध्ये गुंतवणूक कशी करायची?

मागील काही दिवसांपासून बिटकॉइन आणि इतर क्रिप्टोकरन्सी ट्रेंडिंग विषयांमध्ये आहे. बिटकॉइन ला आजच्या काळात डिजिटल गोल्ड म्हणून ओळखले जाते. भारतामधून क्रिप्टोकरन्सी मध्ये गुंतवणूक कशी करायची? हे जाणून घेण्या अगोदर तुम्हाला बिटकॉइन म्हणजे काय? हे माहित असायला हवे जर नसेल तर तुम्ही माझी बिटकॉइन काय आहे? बिटकॉइन ची किंमत इतकी जास्त का आहे? हि पोस्ट वाचू शकता. ह्या पोस्टमध्ये आपण भारतातून क्रिप्टोकरन्सी कशी खरेदी करावी तसेच रु. १०० ची मोफत क्रिप्टो करन्सी कशी मिळवावी हे पाहूया.

भारतामधून क्रिप्टोकरन्सी मध्ये गुंतवणूक कशी करायची?


क्रिप्टोकरन्सी खरेदी करण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टी

जसे शेअर्स खरेदी करण्यासाठी आपल्याला डिमॅट अकाउंट काढावे लागते तसेच क्रिप्टोकरन्सी खरेदी करण्यासाठी आपल्याला एक्स्चेंज वर अकाउंट काढावे लागते. जसे आपल्याला डिमॅट अकाउंट साठी पैसे द्यावे लागतात तसे आपल्याला क्रिप्टोकरंसी एक्स्चेंज वर अकाउंट काढण्यासाठी पैसे द्यावे लागत नाही. हे अकाउंट आपण विनामूल्य काढू शकतो. अकाउंट काढल्यानंतर आपल्याला रु.१०० ची क्रिप्टोकरंसी मोफत स्वरूपात मिळते.

क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंज वर अकाउंट काढण्यासाठी तुम्हाला KYC साठी खालील गोष्टी लागतील.

१) आधार कार्ड

२) पॅन कार्ड नम्बर

३) बँक अकाउंट नंबर

क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंज काय असते? त्यावर खाते कसे काढावे?

क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज हि एक वेबसाईट किंवा मोबाईल अप्लिकेशन असते ज्यावर सर्व क्रिप्टोकरन्सी लिस्ट केलेले असतात. जसे NSE आणि BSE वर वेगवेगळे शेयर्स लिस्ट असतात तसेच वेगवेगळ्या एक्स्चेंज वर कमी जास्त क्रिप्टोकरन्सी लिस्ट असतात. प्रामुख्याने सध्या बिटकॉइन, इथेरियम, तेथर, रिप्पल, कार्डानो, बिटकॉइन कॅश हे अग्रस्थानी आहेत. जवळपास सर्वच एक्स्चेंज वर ह्या क्रिप्टोकरन्सी असतात.

क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंज वर खाते काढण्यासाठी खालील स्टेप्स वापरा

१) मोफत अकाउंट काढण्यासाठी Bitbns ह्या संकेस्थळाला भेट द्या किंवा खालील बटन वर क्लिक करून आपली माहिती भरा.

वरील बटणवर क्लिक केल्यानंतर आपल्याला खालील चित्राप्रमाणे (इमेज १) दिसेल, ह्यामध्ये आपला इमेल आयडी टाका (टाकला नाही तरी चालेल) व Next Step या बटणवर क्लिक करा. त्यांनंतर आपल्याला इमेज २ सारखे पेज दिसेल, इथे मात्र तुम्हाला तुमच्या सम्पूर्ण डिटेल्स ऍड कराव्या लागणार आहेत व इथे भरलेल्या ईमेल आयडीवर आपल्याला OTP येईल तो व्हेरिफाय करावा लागेल.

भारतामधून क्रिप्टोकरन्सी मध्ये गुंतवणूक कशी करायची?
इमेज १,२

२) आपल्या ईमेल ला OTP येतो तो OTP इथे नमूद करून Verify या बटणवर क्लिक केल्यांनतर इमेज ४ प्रमाणे दिसेल तिथे खालील दाखविलेल्या x चिन्हाला क्लिक करून स्किप करू शकता.

भारतामधून क्रिप्टोकरन्सी मध्ये गुंतवणूक कशी करायची?
इमेज ३,४

३) या नन्तरची आपली स्टेप असेल अकाउंट व्हेरिफाय करणे. इमेज ६ मध्ये दाखविल्याप्रमाणे प्रोफाइल मेनू वर क्लिक करा.

क्रिप्टोकरन्सी मध्ये गुंतवणूक
इमेज ४,५

४) प्रोफाइल मेनू वर क्लिक केल्यांनतर आपल्याला आपली KYC अपूर्ण असल्याचे दिसेल. त्यावर क्लिक करून सर्वात आधी मोबाईल नम्बर टाकून OTP द्वारे व्हेरिफाय करा.

क्रिप्टोकरन्सी मध्ये गुंतवणूक मराठी
इमेज ५,६

५) KYC शेवटची पायरी असेल ती म्हणजे आपली आयडेंटिटी व्हेरिफाय करणे.

क्रिप्टोकरन्सी मराठी
इमेज ७

आयडेंटिटी व्हेरिफिकेशन साठी आपल्याला PAN कार्ड च्या दोन्ही बाजू तसेच आधार कार्ड व्हेरिफाय करून घ्यावे लागते. तसेच पैसे काढण्यासाठी आपले बँक अकाउंट व्हेरिफाय करून घ्यावे लागते, यासाठी फक्त अकाउंट धारकाचे नांव, अकाउंट नम्बर व आय एफ सी नम्बर द्यावा लागतो. (बँक अकाउंट नम्बर दिल्याने आपल्या खात्यातील पैसे वगैरे कमी होणे असे प्रकार यात होणार नाही, हे फक्त पैसे काढण्यासाठी दिलेले असते).

रु.१०० ची मोफत क्रिप्टोकरन्सी कशी मिळवायची

वरील सगळ्या स्टेप्स पूर्ण केल्यानंतर किमान १-२ तासात आपले अकाउंट व्हेरिफाय होईल. यांनतर आपल्याला रु.१०० चे BNS टोकन मिळतील जे आपण बिटकॉइन, इथेरियम किंवा इतर कोणत्याही करन्सी सोबत एक्सचेंज करू शकतो किंवा ते विकूही शकतो. आलेले पैसे जर अकाउंट वरून काढायचे असतील तर तुम्ही विथड्रॉव रिक्वेस्ट करू शकता.

एक्स्चेंज मध्ये कमीत कमी किती व कसे पैसे भरायचे

जर तुम्ही Bitbns वर आणखी क्रिप्टोकरन्सी खरेदी करून गुंतवणूक करणार असाल तर कमीतकमी तुम्ही रु.१०० भरू शकता. यासाठी एक्सचेंज ने वेगवेगळे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. त्यामध्ये UPI ट्रान्सफर (गुगल पे, फोन पे, पेटीएम), IMPS, बँक ट्रान्सफर तसेच P२P हि नवीन पद्धत देखील उपलब्ध करून दिली आहे.

भारतात क्रिप्टोकरन्सी खरेदीला मान्यता आहे का?

सध्या भारतात क्रिप्टोकरन्सी खरेदी करणे कायदेशीर मान्य नसले तरी अमान्य देखील नाहीये. भारत सरकार यावर बंदी घालण्याचा विचार करत आहे पण सध्या तरी यावर बंदी नाहीये. तसेच नुकतेच या विषयावर झालेल्या बैठकीत सांगण्यात आले आहे कि जरी बंदी झाली तरी लोकांना यामधील पैसे काढून घेण्यासाठी वेळ देण्यात येईल.

टीप: क्रिप्टोकरन्सी मार्केट हे स्टोक मार्केट पेक्षा जास्त अस्थिर असते, यामध्ये परतावा भरपूर मिळत जरी असला तरी यामध्ये रिस्क देखील तितकीच आहे. त्यामुळे रिस्क मॅनेजमेंट या नुसार ठेवण्याचे मी आपल्याला सुचविण.

खालील प्रश्न उत्तरे आपल्याला नक्कीच उपयोगी पडतील.

Chetan Jasud

मी एक पूर्ण-वेळ डिजिटल मार्केटर आणि अर्धवेळ ब्लॉगर आहे ज्याला लिहायची, प्रवासाची तसेच या टेकनॉलॉजीच्या युगात अपडेटेड राहायची आवड आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *