रु. 500 च्या आतील Best इयरफोन्स – हेडफोन्स

रु. 500 च्या आतील Best इयरफोन्स – हेडफोन्स

आज पर्यंत मी सॅमसंग, सोनी आणि अनेक कंपन्यांचे कमी किमतीतील तसेच जास्त किंमत असणारे इयरफोन देखील वापरून पहिले आहेत. त्यापैकी नुकतेच एका भारतीय कम्पनीचे इयरफोन उत्कृष्ट असल्याचे निदर्शनास आले. सुरुवातीला मी अगदी कमी किंमत असलेल्य म्हणजे अगदी रु. ३०० पेक्षा कमी किंमत असलेला हेडफोन वापरून पाहिला, हा इयरफोन किमतीच्या मानाने खूपच चांगला होता. पण कालांतराने त्याची वायर खराब झाली त्यामुळे मी तो ४-५ महिन्यांनी बदलण्याचा निर्णय घेतला. पहिल्या हेडफोन नन्तर मागविलेल्या हेडफोन हा क्वालिटीच्या बाबतीत खूपच चांगला निघाला. दोन्ही हेडफोन हे बजेट नुसार उत्कृष्टच होते. चला तर पाहूया ते दोन्ही हेडफोन कोणते होते आणि त्यामध्ये कोणता बदल जाणवला.

माझ्या मते boAt Bassheads 100 हा हेडफोन सॅमसंग च्या रु. ४५० ला मिळणाऱ्या हेडफोन टक्कर देऊ शकतो. मी पूर्वी सॅमसंग चा रु.४५० ला येणाऱ्या इअर पॅक हेडफोन चा वापर केला आहे पण त्याला इतकी क्वालिटी नाहीय जितकी या boAt Bassheads १०० मध्ये आहे. याची किंमत सॅमसंगच्या हेडफोन पेक्षा कमीच आहे. 

तुम्हाला हा हेडफोन रु. 379 ला अमॅझॉन वर मिळेल. 

यामध्ये विशेष असे काय आहे बघूया 

१. PVC केबल/वायर  : हा हेडफोन PVC केबल सोबत येतो जो एक मेकात अडकत नाही.

२. स्पष्ट आवाज: ह्यामध्ये विशेष असे काय आहे समजले नाही पण मी बाईक वरून प्रवास करते वेळी कॉल वर वगैरे बोलायचो तेव्हा समोरच्याला(कॉलरला) अजिबात समजायचे नाही कि मी बाईक वर आहे. समोरच्या अगदी स्पष्ट आवाज जायचा, गाड्यांचा व इतर कर्कश आवाज हे आपोआप कमी होत असत.

तोटे :

१. वायर PVC जरी असली तरी ती जास्त काळासाठी टिकेल अशी नाही आहे.

मी दुसऱ्या वेळेस घेतलेला इयरफोन मला खूप आवडला. याच्या वायरची क्वालिटी आणि आवाजाची क्वालिटी एकदम उत्तम आहे आणि दिसायला देखील प्रीमियम दिसतो. इयरफोन च्या माईक मधून स्पष्ट आवाज समोरच्याला जातो. तसेच कानातही योग्य प्रकारे फिट बसतो.

वैशिष्ट्ये :

१. PVC केबल/वायर  : हा हेडफोन PVC केबल सोबत येतो जो एक मेकात अडकत नाही.

२. एक वर्षाची वारंटी

३. सोबत अतिरिक्त इअर बड्स येतात

दोन्हीही इयरफोन दिसायला प्रीमियम दिसतात तसेच आवाजाची क्वालिटी देखील उत्कृष्ट आहे.

Chetan Jasud

मी एक पूर्ण-वेळ डिजिटल मार्केटर आणि अर्धवेळ ब्लॉगर आहे ज्याला लिहायची, प्रवासाची तसेच या टेकनॉलॉजीच्या युगात अपडेटेड राहायची आवड आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *